लाल डबीतला पाच अवरणांखाली लपलेला मोती ?

Submitted by अवल on 28 December, 2011 - 09:18

परवा एक वेगळेच फळ पाहायला मिळाले. तळहाताच्या ओंजळीत मावेल इतके!

2_9.jpg1_8.jpg

मध्यातून हळूच उकलले अन

3_9.jpg

आणि पूर्ण उघडले

4_4.jpg

नाही मी नाही अ‍ॅरेंज केली द्राक्ष यात Happy निसर्गाची जादू पहा, फळाच्या टरफलाला ही काळी छोटी फळं लगडलीत.

ही सगळी छोटी फळं काढली तेव्हा हे टरफलही कित्ती सुंदर दिसले

5_1.jpg

त्यातले काळे छोटे फळ सोलले. वरचे हे लाल अवरण, त्याच्या आत काळे पांतळ साल, त्या आत पांढरे नाजूक साल, आतले काळे टणक अवरण, त्या आतले स्किन कलरचे पांतळ साल काढले अन, त्यातून निघाला हा मोती !

6_3.jpg

अन हा संपूर्ण सोललेला मोती !

8_1.jpg

माझी मैत्रीण कम मावशी जुनागडला गेल्या होत्या. तिथे त्यांना हे फळ दिसले. वेगळे म्हणून त्यांनी लगेच चौकशी केली. तेव्हा त्या फळवाल्याने हे पिस्त्याचे फळ आहे असे सांगितले. त्यांनी लगेच डझनभर खरेदी केली. आल्यावर आम्हा सगळ्यांना दाखवली. मी नेटवर सर्च केलं पण मला काही या फळाची माहिती सापडली नाही. पिस्त्याचे फळ नेटवरती खुपच वेगळे आढळले. कोणी माहिती द्याल का हे कसले फळ आहे ? चव मात्र अगदी पिस्त्यासारखीच आहे. अगदी थोडा फरक वाटतोय. पिस्ता अन काजू यांच्या मधली काहीशी. जागू, दिनेशदा आणि माहितगार प्लिज मदत करा ना .

गुलमोहर: 

आमच्या वाडीत असलेल्या झाडालाही अशीच फळे येतात पण ती खात नाहीत आम्ही त्या वृक्षाला देवदार म्हणतो मला माहीत नाही की ते खरोखरच देवदार आहे की नाही.

भन्नाट प्रकरण आहे हे! पहिल्यांदाच पाहिले>> मी पण.
आणि म्हणुनच नेत वर जर सर्च केल तर याच्या काही प्रतिमा अशा मिळाल्या.

fitida.jpg

खरतर तुमच्या सगळ्यांप्रमाणे मलाही हे फळ आवडलेच आहे, पण या फोटो कडे बघुन मात्र छोटे छोटे प्राणी खाण्यासाठी तोंड उघडुन बसलेत असाच भास होतोय नाही.

तू दिलेल्या फोटोमधे मला भरपूर वात्रट कार्टी खिदळत बसली आहेत असं वाटलं.>> हो. तसही वाटतयच.
मला म्हणायच होत की या फोटो मधे ते कोणत्याही अँगलने फळ नाही वाटत.. नाही का?

Pages