१/२ कि. चिकन, १/२ कि. कांदा, मोहरीचे तेल, ५-६लसणाच्या कुड्या, १ इंच आले, हळद, मीठ,
हिरव्या मिर्च्या २-३, चिकन मसाला, गरम मसाला, २ लसूण सोलून
प्रथन चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला १ चमचा हळद आणि थोडे मोहरीचे तेल चोळून घ्या. सर्व कांदा उभा चिरून घ्या. मिरचीचे लहान-लहान तुकडे करून घ्या आणि आले-लसूणाची पेस्ट करून घ्या.
आता कढईत तेल गरम करून घ्या व त्या तेलात आख्खे लसूण तळून घ्या. (हे काम फार काळजीने करावे. लसूण टाकल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. अस्मादिकांचा एकदा हात भाजल्यापासून मोठया ताटाचा उपयोग ढालीसारखा करतो. )
लसूण काढल्यानंतर तेलात मिरचीचे तुकडे आणि कांदा टाका. ८-१० मिनिटे कांदा परता व त्यातच
चिकन व तळलेले आख्खे लसूण टाका. कढईला खाली न लागेल अशा बेताने हे मिश्रण परतत राहा.
१० मिनिटांनंतर चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये आता आले-लसुणाची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला व अर्धा ग्लास पाणी टाका.
नंतर जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणात पाणी टाकून १५-२० मिनिटांपर्यंत शिजवत राहा.
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते. हा आख्खा लसूण चोखून खायचा.
१.चिकनचे पीस मध्यम आकाराचेच घ्यावेत अगदी लहान असू नयेत.
२. फार ग्रेव्ही ठेऊ नये. (अंगापुरता रस्सा ठेवा. )
दिसायला तर छानच दिसतयं...
दिसायला तर छानच दिसतयं... ़़करून पहायला पाहिजे आता
रेसिपी इन्टरेस्टिंग वाटतीय.
रेसिपी इन्टरेस्टिंग वाटतीय. पण काही गोष्टी समजल्या नाहीत. लसूण आख्खा तळायचा का? तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? की त्याचीच पेस्ट करायचीय ? तसेच चिकन मसाला म्हणजे नक्की कोणता मसाला ते पण सांगू शकलात तर नीट समजेल
लसुण अख्खेच टाकले
लसुण अख्खेच टाकले आहे.....तेही साली सकट्......
चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन? ते खाण्यार्यावर अवलंबुन असेल बहुदा...
कोलेस्ट्रॉल कमी करणार्यांसाठी छान आहे हे. पण, चिकन बाजुला करुन फक्त लसुण खात रहावी लागेल.
तळलेल्या लसणाचे काय करायचे?
तळलेल्या लसणाचे काय करायचे? तो वापरायचा की फक्त तेलात उतरलेला लसणाचा स्वादच इथे अपेक्षित आहे?
लसूण आख्खा तळायचा का?
लसूण आख्खा तळायचा का? लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या का? तळलेल्या लसणाचे काय करायचे?
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते - अरे पण लसुण तर बाहेर ठेवले आहेत ना?
ह्याच्यात न कळण्यासारखे काय
ह्याच्यात न कळण्यासारखे काय आहे?
तेलाला लसणाचा भरपूर वास येतो लसूण काढली तरी. आणि कोंबडीला पुन्हा आले लसूणाची पेस्ट लावलीच आहे ना... छान लागत असेल.
चिकन मसाला >>>>>>>> एव्हरेस्ट
चिकन मसाला >>>>>>>> एव्हरेस्ट चा चिकन मसाला वापरला तरी चालेल.
लसूण आख्खा तळायचा का? तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? की त्याचीच पेस्ट करायचीय ?
>>>>>>>>>>>>> हो लसूण आख्खा तळायचा.
तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? >>>>>>> कांदा व चिकन बरोबर परतत राहायचे.
की त्याचीच पेस्ट करायचीय >>>> नाही. त्यासाठी वर २ लसूण सोलून सांगितले आहेत.
चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन? >>>>>>>>
ह्या रेसीपीमधील हाच सर्वात टेस्टी घटक आहे. तो आख्खा लसूण चोखून खायचा.
आसा, लसणाची अख्खी कुडीच तळुन
आसा, लसणाची अख्खी कुडीच तळुन घ्यायची का?? की पाकळ्या तळुन घ्यायच्या? चित्रात अख्खीच तळलेली दिसत आहे...
आसा, लसणाची अख्खी कुडीच तळुन
आसा, लसणाची अख्खी कुडीच तळुन घ्यायची का?? >>>>>>>> हो, आख्खीच तळायची.
फोटूत दिसतेय कि...
फोटूत दिसतेय कि...>>>>> दिसली
फोटूत दिसतेय कि...>>>>> दिसली हो, पर ये दिल है की मानता नही घरी जर मी कढईत अख्खी कुडी तळायला घातली तर आईची रिअॅक्शन काय असेल याचा विचारच करवत नाहिये कदाचीत तिला तो माझाच आळशीपणा वाटेल
कदाचीत तिला तो माझाच आळशीपणा
कदाचीत तिला तो माझाच आळशीपणा वाटेल >>>>>>>
माझ्या भाऊजींची सुद्धा अशीच प्रतिक्रिया होती. ते म्हणाले लसूण सोलायला वेळ नव्हता काय?
छान रेसीपी आहे. करून पहायला
छान रेसीपी आहे. करून पहायला पाहिजे.
फोटो दिसत नाहीये..
फोटो दिसत नाहीये..
फोटो दिसत नाहीये
फोटो दिसत नाहीये
फोटो??
फोटो??
फोटो दिसत नाहीये
फोटो दिसत नाहीये
माफ करा इतके दिवस इकडे लक्ष
माफ करा इतके दिवस इकडे लक्ष गेले नव्हते. आता फोटो दिसत आहेत.
वेगळं आहे..
वेगळं आहे..
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते>>> आणि चिकनला??
लय भारी जेवायला बोलवाच आता
लय भारी
जेवायला बोलवाच आता
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते>>> आणि चिकनला??
<<<<<<< अर्थात चिकनलासुद्धा
बेफ़िकीर | 27 February, 2012 - 10:28 नवीन
लय भारी
जेवायला बोलवाच आता <<<<<< बेफीजी, नेकी और पुछ-पुछ.
कधीही-कधीही या आणि याच
वेगळी आहे रेसिपी. करुन बघणेत
वेगळी आहे रेसिपी. करुन बघणेत येइल.
वेगळी आहे रेसिपी. करुन बघणेत
वेगळी आहे रेसिपी. करुन बघणेत येइल. >>>>>>>
सिंडरेला, अवश्य करून पाहा आणि कशी झाली तेही कळवा
जबराट !!!!!
जबराट !!!!!
धन्यवाद जयवी -जयश्री अंबासकर
धन्यवाद जयवी -जयश्री अंबासकर
ह्या रेसीपीमधील हाच सर्वात
ह्या रेसीपीमधील हाच सर्वात टेस्टी घटक आहे>>>
छ्ये, मग ते चिकन कशाला घातलय आबासाहेब???
उगी एका कोम्बडीचा जीव वाचेल की.
रेसिपी भारी आहे. शाकाहारी असल्याने खाणार नाही.
छ्ये, मग ते चिकन कशाला घातलय
छ्ये, मग ते चिकन कशाला घातलय आबासाहेब???
उगी एका कोम्बडीचा जीव वाचेल की.
रेसिपी भारी आहे. शाकाहारी असल्याने खाणार नाही.
<<<<<<<< झकास मग ती रेसीपी कोम्बडीशिवाय कर आणि खा. हाकानाका
वॉव्..फारच वेगळी आणी टेस्टी
वॉव्..फारच वेगळी आणी टेस्टी रेसिपी...
वाचताना काही शंका होत्या त्या सर्व प्रतिसाद वाचल्यावर दूर झाल्यात तेंव्हा काही शंकाकुशंका मनात न आणता लौकरात लौकर करण्यात येईल..
वर्षू नील अवश्य करून पाहा आणि
वर्षू नील अवश्य करून पाहा आणि कशी झाली तेही कळवा
चिकन ऐवजी वांग घालून मस्त
चिकन ऐवजी वांग घालून मस्त होते अशी भाजी.
Pages