किरकिर... कुरकुर...

Submitted by सत्यजित on 23 August, 2008 - 13:52

एकदा सगळ्या कीड्यांची रानात भरली सभा
गवतामध्ये पाना मागे धरुन बसले दबा

आला तिकडुन भुंगा त्यानी केला खुप दंगा
चाविन कडकडुन म्हणाला जर घ्याल कुणी पंगा

तिकडुन आली मुंगी हलवत तिची ढुंगी
मुंगळा म्हणाला नाच तिला मी वाजवितो पुंगी

इतक्यात उड्या मारत कोठुन आला नाकतोडा
अंधाराला घाबरलेला वाटत होता थोडा

अंधारात काजवा मात्र मिरवत होता ऐट
लुकलुक हींडत होता ठेउन चड्डीत लाईट

रातकीडा म्हणाला.. मित्रांनो! चला देउया का नारे ?
किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे !

किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे..

किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर...
किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर... Happy

सत्यजित.

गुलमोहर: 

वा ! मस्तच आहे एकदम. मुलांना शिकवतेच आता म्हणायला.

ही ही मस्तच सत्यजित. Happy

सही रे !! मस्तच आहे Happy

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    सत्या, मस्तच हं.
    एक लहानग्यांसाठी पुस्तक काढ. सध्या तुझी सगळी बडबडगीतं माझ्या घरात हिट आहेत Happy

    -प्रिन्सेस...

    लुकलुक हींडत होता चड्डीत ठेउन लाईट Happy

    सत्यजीत, कसलं धमाल आहे हे. खरच पुस्तक काढ रे..... मुलांना हे असलं वाचायला मिळू दे, रे. छानच आहे.

    किरकिर कुरकुर!

    लाईट एकदम भारी राव्..मजा आली.

    फारच कुरकुरीत!! Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
    क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

    अले केवले किले आले... मज्जा आली.... थॅन्क्यु...

    पुस्तक काढु म्हणताय? बर.. बघतो कोणी प्रकाशक मिळतो का? Happy

    किल्यांना पन मज्जा आलिये. थांकु.
    आनि त्या सुलवंट, गोगलगाय आनि फुलपाखलुला का नाई बोलावलं ले तू?

    काट्यानां लाउन जेल शाईन मारतय सुरवंट
    झूरळ जाउन कोपर्‍यात खात बसलय सुंठ

    गोगलगाय म्हणाली, मित्रांनो मी येउन करणार काय?
    तुम्हा सगळ्यांना सहा पाय पण मला एक पण नाय

    तुम्ही सगळे जाल पळुन नी कोणी जाईला उडुन
    मला सोडुन जात म्हणाल बस तुझ्या शंखात दडुन

    फुलांचा लागलाय सेल फुलपाखारांना नाही वेळ
    माशी, मच्छर खाता बसलेत रस्त्यावरची उघडी भेळ Happy

    बाकी सगळे किडे इकडुन तिकडुन पळतायत
    किटकनाशके मारुन मारुन... ही माणस त्यांना छळतायत... Happy वात आणला आहे ह्या माणसांनी....

    निषेद नोंदवा जाहीर सभा... किरकीर.. कुरकूर....

    अरे वा सत्या ! याला म्हणतात प्रतिभा Happy
    ---बाकी सगळे किडे इकडुन तिकडुन पळतायत
    किटकनाशके मारुन ही माणस त्यांना छळतायत.----
    निषेध निषेध किरकिर कुरकुर.

    >>फुलांचा लागलाय सेल फुलपाखरांना नाही वेळ
    माशी, मच्छर खाता बसलेत रस्त्यावरची उघडी भेळ

    सहीच! सत्या खरच पुस्तक काढ लवकर. माझ्या मते हे बालगीत पुस्तकाची छान सुरुवात होवू शकेल आणि शिर्षक - किरकिर कुरकुर!! Happy

    एकदम छान! शेपटीवाल्या प्राण्यांनतर डायरेक्ट हीच सभा भरलेली दिसते. Happy

    तुमच्या बाकीच्या कविताही सगळ्या वाचल्या पाठोपाठ. खूपच छान आहेत. अजून येऊदेत लागोपाठ. Happy

    छान जमली आहे कवीता.

    यावरुन मी मुलाला भरवताना केलेला हायकु शेअर करावासा वाट्ला

    कम लीटिल मना स्विट आणि गोड
    मार खाल्लास की येतिल फोड

    अरे वा तुझा हातखंडा दिसतोय की बालकवितांमधे. मस्त.
    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    सत्या,
    कित्ती सुंदर कविता केलिएस, आज वाचली.. अगदी सुंदर.
    एकदम लहान झाल्यासारखं वाटलं.
    सुचतं कसं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला? Happy

    छानच रे सत्या Happy आवडेश Happy

    एकदम झक्कास आहे कुरकुर !

    खुपच छान! Happy
    आता माझ्य मुलीला म्हणायला शिकवेन ही!
    चालेल ना?

    मस्त रे सत्या. मला एकदम शेपटीवाल्या प्राण्यांची आठवली. Happy काजव्याचा लाईट व शाईन मारणारे सुरवंट झकास.

    कसली ग्गोड कविता आहे !

    किरकिर कुरकुर !! Happy

    सत्याभाय, तुस्सी ग्रेट हो !

    मस्त कविता आहे. "शेपटीवाल्या प्राण्यांची" ची आठवण झाली.