एक मैफिल छानशी - कविता वाचन

Submitted by Kiran.. on 16 December, 2011 - 10:43

नमस्कार मित्रांनो

ऑनलाईन मैफिलीची ही संकल्पना इथं काहीजणांकडे बोलून दाखवली होती. सकारात्मक प्रतिसादामुळे हा बाफ आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय मैफिल अपूर्ण राहणार हे सांगणे न लगे.

मित्रमैत्रिणींनो..
प्रमोद काकांचा उत्साह घ्या.. आणि माईक घेऊन कामाला लागा बरं.. तुम्हाला आवडेल त्या फॉर्म मधे अपलोड करा आणि लिंक मात्र इथे द्या. एकाच पोस्टमधे लिंक आणि मूळ कविताही दिली तर अतिउत्तम !!

करायची सुरूवात ?

गुलमोहर: 

काका
तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे Happy

माझ्या कवितेला (कि वाचनाला) घाबरले वाटतं सगळे ! पुढच्या टाकायला(च) नकोत मग Happy

धन्यवाद सांसं Happy
तुझं पण कविता वाचन छान झालय पण पार्श्वसंगीताच्या बाबतीत देवकाकांशी सहमत. जर ते हवेच असेल तर एखादी हळुवार धून वापर. अगदी बासरी पण चालेल. अजुन मजा येइल Happy

किरणची सगळ्यात इफेक्टीव्ह वाटली.

विशाल्च्या कविता ऐकायलाच मिळाल्या नाहीत Sad काहीतरी एरर येतेय)

देवसाहेबांनी वाचलेलीही छान.

सांसं - वाचन करीत असलेली व्यक्ती थोडी रेकत असल्यासारखी वाटली.

सगळ्यांना धन्यवाद!!

चातक
खरंच छान वाचन केलंस तू. ( माझा लॅपटॉप मात्र हँग झाला डाऊनलोड करून ऐकताना Angry )

विदिपा
अहो साध्या मोबाईलवर रेकॉर्ड केलंय ते. खूप हमिंग येतंय त्यात. माईक विकत घ्यायचा तर खर्च होईल Sad

खतरनाक उपक्रम आहे हा. पण अज्ञान आड येते आहे. कसे काय करावे ते जाणकारास विचारू लग्गेच सहभागी होतो.

सांस ...........छान आहे कविता वाचन........... बॅकग्राउंड संगीत चा आवाज कमी ठेवला असतात तर बरे झाले असते....काही काही ठिकाणी आपला आवाज झाकला जातोय त्यामुळे

सांसं अगदी शंभर रुपयांपासूने हेडसेट(ज्यात माईक आणि हेडफोन एकत्रच असतात) मिळतात...फारसं खर्चिक प्रकरण नाहीये ते.
धन्यवाद विजयशेठ! एकदा आपला आवाजही ऐकण्याची इच्छा आहे...येऊ द्या की तुमच्या कमावलेल्या आवाजात काहीतरी छानसं.
तुम्ही गाणार असाल तर मी रचलेली एखादी रागदारीवरची चाल पाठवतो तुम्हाला. Wink

विशाल्च्या कविता ऐकायलाच मिळाल्या नाहीत >>>>
विदिपा, ईमेल केलीय तुम्हाला. दोन्ही कविता पाठवल्या आहेत. ऐका आणि द्या अभिप्राय Happy

खुप मस्त धागा! अभिनव कल्पना आहे. किरण, धन्यवाद!सर्वांचे काव्यवाचन ऐकले. मैफिल मस्तच रंगलीये. Happy काव्य गायनही चालेल, असे वाटते.
माझा आवडता कवी संदिप खरेची "कसे सरतील सये" ही कविता त्याच्याच पद्धतीने गायचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास जरुर कळवा.

कवितेचे शब्दः

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाची फुलं दोन, रोज राती डोळ्यावर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपीसे, खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?

गुलाबाची फुलं दोन, रोज राती डोळ्यावर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना?

साने
Uhoh

तू पण चातकसारखाच फॉर्मॅट वापरलास :(.
बरं.. आता घरी गेयावर डाऊनलोड करून ऐकते

तू पण चातकसारखाच फॉर्मॅट वापरलास>>>म्हणजे काय? अर्थातच! अगं हा किरण्यके च एकदा म्हणाला होता, चातक आणि मी एकमेकांचे डु आय आहोत म्हणून... विचार त्यालाच... आता डु आय असल्यावर एवढे साम्य तर असणारच ना? Wink Biggrin

साने, मस्त झालय गं तुझं गाणं......
पण....
Proud
देवकी पंडित मोड ऑन : ते श्वासांचं तेवढं बघा जरा. तुम्हाला जमेल नक्की. गाणं किंवा कुठलाही संवाद, कुठलीही ओळ सुरु करण्यापुर्वी एक क्षण होल्ड करायचा असतो. तो क्षण पकडने जमले की तुम्ही झालाच गायक : देवकी पंडित मोड ऑफ
clap-animated-animation-clap-smiley.gif

अच्छा Proud

साने ऐकलं गं आताच
काय सुंदर गायलीयेस गं !!!
मी तर म्हणेन सगळ्यात छान

तुला गाण्याचं चांगलं अंग आहे .. खूपच छान !

आता तुझ्या मागे लागलं पाहीजे .. Wink

धन्स विशल्या, देवकी पंडित आणि त्यांचे सारेगमप मधले शेरे यांची मी फॅन आहे, त्यामुळे तुझा सल्ला आदरपूर्वक स्वीकारत आहे. Happy

अगं संध्या, मी ते लॅपटॉपवर असलेल्या रेकॉर्डिंग फॅसिलिटीने रेकॉर्ड केलंय. ते त्याच फॉरमॅटमध्ये रेकॉर्ड होतंय... (तू पण ना रे चातका? Wink :फिदी:)

मी दम श्वासाबद्दल बोलणार होतो सानीच्या पण म्हटले सगळे म्हणतील हा लेकाचा गाणे शिकलाय म्हणून दुसर्‍यांकडूनही तीच अपेक्षा करतोय Happy

विदिपा, त्यात काय? मला नक्कीच चाललं असतं... Happy

चला, यानिमित्ताने तुम्ही गाणं शिकलाय हे समजलं. मग आता लवकर ऐकवा तुमच्या आवाजात एखादी कविता नाहीतर गझल. Happy

Pages