टोमॅटो -शेव भाजी

Submitted by राजुल on 14 December, 2011 - 06:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ते ३ लाल टोमॅटो, १/४ वाटी बारीक शेव, २ चमचे फोडणी करता तेल,हळद, हिंग,१/४ चमचा जीरे, १ चमचा लाल ति़खट, १/२ चमचा धनेजीरे पावडर, ४ पाकळ्या लसूण बारिक ठेचून, कडिपत्ता, कोथिंबिर, मीठ चवीनूसार, साखर ३ चमचे, १/२ वाटी पाणी

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल गरम करावे. जीरे, हिंग, कडिपत्ता, हळद घालुन फोडणी करावी. त्यात टोमॅटो घालून वरून लाल तिखट, ठेचलेले लसूण, धनेजीरे पावडर, मीठ, साखर घालून ढवळून घ्यावे. सर्व एकजीव शिजल्यावर १/२ वाटी पाणी घालून ऊकळल्यावर गॅस बंद करावा. भाजी डिश मधे काढून वरून शेव घालावी. गरम फुलक्या बरोबर फारच मस्त लागते. बच्चे कंपनी हि भाजी फार आवडीने खातात.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जण
अधिक टिपा: 

साखर आणि तिखट आपल्या आवडी प्रमाणे टाकावे,पण सर्वसाधारण पणे ही भाजी गोडसर असते.
तसेच शेव पण आपल्या आवडी प्रमाणे कुठलीपण वापरावी.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान