युसेन "लायटनिंग" बोल्ट!
प्रत्येक ऑलिंपिक्समधे काही अश्या मोजक्या व अमुल्य आठवणी असतात की त्यामुळे ते ऑलिंपिक्स तश्या ठळक आठवणींमुळे आपल्या कायमचे लक्षात राहते.. आणि यंदाचे बैजिंग ऑलिंपिक्सही त्याला अपवाद नाही... या ऑलिंपिक्समधिल.. सगळ्यांच्या मनात कायमच्या घर करुन राहतील अश्या काही ठळक आठवणी म्हणजे या ऑलिंपिक्सचा भव्य दिव्य व अप्रतिम ओपनींग सोहळा... जेसन लिझॅकने ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल शर्यतीत.. फ्रांसच्या ऍलन बर्नाडचा पाठलाग करुन शेवटच्या अर्ध्या मिटरमधे त्याला मागे टाकुन अमेरिकेला व म्हणुनच मायकेल फेल्प्सला..मिळवुन दिलेले सुवर्णपदक.. तसेच खुद्द मायकेल फेल्प्सने त्याच्या १०० मिटर्स बटरफ्लाय शर्यतीत.. केवळ १/१०० सेकंदाने...सर्बियाच्या मिलरेड कॅव्हिकला हरवुन मिळवलेले अशक्य सुवर्णपदक.. व एकंदरीतच मायकेल फेल्प्सचा या ऑलिंपिक्समधे ८ सुवर्णपदके मिळवण्याचा.. न भुतो.. न भविष्यती.. असा पराक्रम!(आणि आपण भारतियांना हे ऑलिंपिक्स कायमचे लक्षात राहील ते अभिनव बिंद्राने.. भारताला मिळवुन दिलेल्या... पहिल्या वहिल्या वैयक्तिक सुवर्णपदकामुळे!)
आणि आजची पुरुषांची २०० मिटर्स धावण्याची शर्यत संपल्यावर हे बैजिंग ऑलिंपिक्स अजुन एका गोष्टीसाठी लोकांच्या कायमचे लक्षात राहील.. आणि ते म्हणजे... जमैकाचा सेंन्सेशनल धावपटू... युसेन बोल्ट्!ज्यांनी ज्यांनी त्याच्या १०० व २०० मिटर्स या दोन्ही शर्यती पाहील्या.. त्यांना त्यांना एक इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर घडताना दिसला आहे... एकाच ऑलिंपिक्समधे १०० व २०० मिटर्स शर्यती जिंकण्याचा पराक्रम यापुर्वीही जेसी ओवेन्स्(१९३६),व्हॅलरी बोरझॉव्ह(१९७२) व कार्ल लुइस(१९८४) यासारख्या ऑलिंपिक्सपटूंनी केलेला आहे पण जमैकाच्या या युसेन बोल्टने.... या दोन्ही शर्यती नुसत्या जिंकल्या नाहीत... तर जुने विश्वविक्रम मोडुन... नाही नाही.. त्या जुन्या विश्वविक्रमांच्या चिंधड्या करुन व त्याच्या बरोबरीने धावणार्या जगातल्या बाकीच्या सगळ्या स्प्रिंटर्सना.. कुठल्या कुठे मागे टाकुन्...जिंकल्या आहेत... त्या दोन्ही शर्यतीत....देअर वॉ़ज ऍब्स्युल्युटली नो काँपीटिशन फॉर हिम फ्रॉम नो...बडि!आय मिन.. नो बडि!ही वॉज सिंपली अ क्लास अपार्ट!
३ दिवसापुर्वीच्या १०० मिटर्स शर्यतीत त्याने ९.६९ सेकंदाचा विश्वविक्रम करुन सगळ्या जगाला येणार्या २०० मिटर्स शर्यतीत काय घडु शकते याची चाहुल दिली होती.. त्या शर्यतीत पहिल्या ८० मिटर्सनंतर या पट्ठ्याने.. सगळ्यांना भरपुर मागे टाकल्यावर्..छाती बडवुन.. मागे वळुन.. त्याच्या पाठी धावणार्या बाकी सर्व स्पर्धकांकडे बघुन.. त्यांना पुढे येउन त्याला गाठायचे आव्हान दिले नसते...(तसे करणे हे खिलाडुपणाच्या कुठल्याच व्याख्येत बसणारे नव्हते... किंवा "क्लास" या शब्दाला लाजवणारे होते.. हे माझे प्रांजळ मत आहे) तर त्यादिवशीची १०० मिटर्स शर्यत...तो ९.५९ सेकंदातच जिंकु शकला असता.. आणि हे ध्यानात घ्या... १०० मिटर्स स्पर्धा ही त्याची आवडती स्पर्धा नाही... एक मजा म्हणुन तो १०० मिटर्स स्पर्धेत गेल्या सहा महिन्यापासुन उतरत आहे.. त्याची आवडती स्पर्धा २०० मिटर्स ही आहे!बाकीचे स्पर्धक १०० मिटर्स शर्यतीत.. ४७ ते ४८ पावले घेत असताना.. हा ६ फुट ५ इंच उंचीचा जायंट..तेच १०० मिटर्स अंतर पार करायला...केवळ ४० ते ४१ पावलेच उचलतो व तरीही बाकीच्या स्पर्धकांना.. कुठच्या कुठे मागे टाकतो... हे बघताना खरोखरच डोळे विस्फारतात!
जी गत त्याने १०० मिटर्समधे बाकी स्पर्धकांची केली.. तिच गत त्याने आज २०० मिटर्समधेही.. त्या शर्यतीत धावणार्या इतर स्पर्धकांची केली... त्याने जेव्हा अंतिम रेषा पार केली तेव्हा त्याच्या आजुबाजुला एकाही स्पर्धकाचा मागमुस नव्हता इतका त्याने बाकीच्या स्पर्धकांना लिड दिला होता.. बैजिंग ऑलिंपिक्स स्टेडिअममधले ९१,००० दर्शक..व जगभरचे कोट्यावधी टिव्ही दर्शक.. त्याच्या आजच्या शर्यतीतल्या"लायटनींग" स्पिडने... खरच अवाक झाले होते!
आजची २०० मिटर्स शर्यत जिंकताना या महाभागाने १९९६ च्या ऍटलांटा ऑलिंपिक्समधे अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने केलेला २०० मिटर्समधला.. १९.३२ सेकंदाचा विश्वविक्रम मोडला.. ऍथलेटिक्समधील सर्व तज्ञांच्या मते.. ऍथलेटिक्समधला.. मोडण्यास..तो सगळ्यात कठीण विक्रम होता व आपल्या हयातीत तो कोणी मोडु शकेल असे कोणालाच वाटत नव्हते!.... पण या युसेन बोल्ट नामक...नेचर्स "फ्रिक"... मुळे तो विक्रम १२ वर्षातच मोडीत निघाला... मायकेल जॉन्सनने १९९६ च्या ऍटलांटा ऑलिंपिक्समधे जेव्हा तो विश्वविक्रम केला होता.. तेव्हा ती शर्यत व तो त्याचा विश्वविक्रम बघायला..ऍटलांटा ऑलिंपिक्स स्टेडिअमधे जे ९०,००० भाग्यवान प्रेक्षक हजर होते.. त्यातला एक भाग्यवंत प्रेक्षक मी स्वतः होतो! त्या शर्यतीतल्या त्याच्या वेगाची कल्पना तुम्हाला करायची असेल तर हे आकडे बघा... त्याने त्या शर्यतीत पहिले १०० मिटर्सचे अंतर.. केवळ १० सेकंदात धावुन काढले तर दुसरे १०० मिटर्स संपवायला त्याने केवळ ९.३२ सेकंद घेतले होते...(त्यावेळचा १०० मिटर्सचा विश्वविक्रम होता...९.८७ सेकंद!) त्या वेगाने व त्याच्या चम चम करणार्या.. सोनेरी वर्ख असलेल्या.. नायके शुजने... सबंध ऍटलांटा ऑलिंपिक्स स्टेडिअम... एका एलेक्ट्रिफायिंग वातावरणामधे डुबुन गेले होते... त्याचा तो स्पिड व ते धावणे मी..कधीच विसरणार नाही...
त्यामुळे आज बैजिंगच्या "बर्ड्स नेस्ट" ऑलिंपिक्स स्टेडिअमधे.. तो १९.३२ सेकंदाचा विक्रम मोडणार्या.. या युसेन बोल्टने.. आपल्या या कामगीरीने..व मायकेल जॉन्सनसारख्याच... सोनेरी वर्ख असलेल्या त्याच्या शुजने...कसले एलेक्ट्रिफायींग वातावरण निर्माण केले असेल..व त्या प्रेक्षकांना कसे अवाक केले असेल... याची मी पूर्ण कल्पना करु शकतो... नो वंडर या माणसाला युसेन "लायटनींग" बोल्ट असे सार्थ टोपण नाव आहे!
तळटिपः गेल्या ५-६ वर्षाचा.. जगातील ऍथलिटसचा.. बेकायदा ड्रग्स घ्यायचा इतिहास बघता.. या ऑलिंपिक्समधील युसेन बोल्ट किंवा मायकेल फेल्प्सच्या कामगीरीकडे सर्व जग साशंकतेनेच बघत असणार यात काही वाद नाही.. पण जोपर्यंत अश्या गोष्टी प्रुव्ह
होत नाहीत तोपर्यंत या ऍथलिट्सना बेनिफिट ऑफ डाउट देउन मी माझे सगळे लिखाण करत आहे... पुढेमागे जर या ऍथलिट्सनी काही गैरकायदा कृत्य केले आहे असे निदर्शनास आले.. तर माझे हे सगळे लिखाण डिलीट करायचा हक्क मी ठेउ इच्छित आहे!
अपेक्षा
अपेक्षा करतो की फेल्प्स आणि बोल्ट दोघेही असली ड्रग्ज घेत नसावेत.. (फेल्प्स तर ओरडून ओरडून सांगतोय की त्याच्या कितीही चाचण्या घ्या.. बोल्ट चा बेन जॉन्सन नाही झाला म्हणजे मिळवले)..
ह्या ऑलिंपिक मधली अजुन एक उल्लेखनीय घटना म्हणजे महिलांच्या १०० मीटर्स शर्यतीत पहिले तीनही क्रमांक जमैकाच्या महिला धावपटूंनी मिळवले.. माझ्या मते ऑलींपिकच्या इतिहासात फिल्ड ऍन्ड ट्रॅक शर्यतीत असा पराक्रम पहिल्यांदाच घडला..
उसेन
उसेन म्हणेजे चैतन्याचा स्त्रोतच जणू. नुसता नाचत असतो. मला त्याचा अमेरिकन मित्राचे बॉन्झ हुकल्या बद्दल वाईट वाटले. दोघेही स्पर्धक असुन चांगले मित्र आहेत.
मुकुंद
मुकुंद तुम्ही चक्क lolo jones बद्दल काहीच नाही लिहिलेत ? तिची कथा जेव्हढी inspiring तेव्हढीच करूण आहे.
olympic पहात
olympic पहात असताना मध्येचं एक झलक दाखवली. एक स्त्री जिमनॅस्ट एका पायाला फ्रॅक्चर गुंडाळलेल्या अवस्थेत अगदी व्यवस्थित routine करते आणि एका पायावरचं perfetct landing करते. कोण होती ती मुकुंद? ५ चं second ची ती झलक होती तरी काटा आला.
मी काल
मी काल टीव्ही वर पाहिली २०० मीटर्स ...... इट वॉज अमेझिंग !
कॉमेंटेटरची एक कॉमेंट पक्की मनात ठसलीय की कोण म्हणतं एकाच ठिकाणी वीज दोन वेळा कोसळत नाही ? इथे पहा !!
तसंच स्वतःचा विक्रम मोडला गेल्यावर आनंदाने उजळलेला मायकेल जॉन्सनचा चेहरा.... याला म्हणतात खिलाडूपणा !!!
वा ... मस्त
वा ... मस्त
मुकुंद तू
मुकुंद तू ऑलिंपिक्स्वर लिहायला सुरुवात केलीस तेंव्हाच आवडल. तुझा प्रत्येक लेख आभ्यासपूर्वक आणि तरीही इंटरेस्टींग असतो. छानच लिहितोस. जे काही बघायचे राहिलेले इव्हेंट्स असतात त्याबद्दल तू लिहिलेलं असलस तर न बघितल्याची टोचणी कमी होते.
मुकुंद
मुकुंद मस्त लेख रे.... बोल्टच्या बॉडी लॅंग्वेजमधुनच जाणवत असते की ही इज द बेस्ट....
युसेन
युसेन बोल्ट ह्या शर्यतीत उतरणार होता त्याचवेळी अजुन दोन नावेही चर्चेत होती.. एक जमैकाचा असाफा पॉवेल नि दुसरा अमेरिकन टायसन गे.. १०० मि. मधे मला पॉवेल बाजी मारेल असे वाटले होते पण उसेन म्हणजे "लायटनींग" !! लै भारी धावतो.. नि त्याचे वय म्हणे फक्त २२ वर्षाच्या आसपास..!! थक्क थक्क थक्क आणि काय.. !!!!!! Great Man he is !!
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-