गोड पोळी

Submitted by मोहन की मीरा on 12 December, 2011 - 06:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कणीक
५ चमचे बारीक दळलेली पिठी साखर
३ चमचे साजुक तुप
थोडे तेल, थोडे मीठ

क्रमवार पाककृती: 

१. नेहेमी प्रमाणे कणिक भिजवुन घ्यावी. भिजवताना थोडे तेल व मीठ घालावे.
२. मध्यम आकाराची लाटी घ्यावी.
३. ती लाटी थोडी लाटुन (पुरी एवढी), त्या वर थोडे तुप पसरावे आणि सगळी कडुन लावुन घ्यावे.
४. त्या वर १ चमचा पिठी साखर पसरावी आणि चांगली पसरुन घ्यावी.
५. त्या छोट्या पोळी ची वळकटी वळुन, परत गुंडाळुन त्याची मोठी लाटी करावी.
६. हलक्या हातानी थोड्या पिठी वर ती लाटावी. जास्त पातळ लाटु नये.
७. तव्यावर मंद आचेवर करपु न देता भाजुन काढावी. हवे तर थोडे तुप लावावे.
छान सोनेरी रंगाच्या होतात. गॅस जास्त ठेवला तर करपतात. डब्या साठी उत्तम. मी रात्री कणिक मळुन सकाळी झटपट करुन देते. तुप साखर पोळी पेक्षा चांगले.
खुप खमंग लागतात.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात ३ होतील साधारण मध्यम आकाराच्या.
माहितीचा स्रोत: 
फार पुर्वी मंगला बर्वेंचं एक सदर एका मासिकात येत असे. त्यात वाचले होते. त्यांनी त्याला "बॅचलर रोटी" असे नाव दिले होते.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिठी साखरेची करुन बघते.
कधी कधी मी रॉ शुगर घालुन अशी पोळी करते. ती पण मस्त खमंग लागते. पण ही पोळी भाजताना काळजी घ्यावी लागते,

सेम टु सेम अशीच पोळी मी भल्या पहाटे सहाला कॉलेजात जाण्याआधी खाऊन जायचे. आई तव्यावरच भरपूऽर तूप सोडून जवळजवळ तळूनच द्यायची ही गोड पोळी. आणि तेव्हा डाएटची चिंताही करावी लागत नव्हती Wink
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. लेकाला देऊन बघते आवडतेय का Happy

अगदी हलक्या हाताने लाटली तर नाही फाटत. पण मस्त खमंग लागते. मोठ्यांसाठी अशी पोळी करताना त्यात किंचीत वेलची पावडर टाकल्यास मस्त स्वाद येतो.

रॉ शुगर घातल्यावर फाटत नाही पोळी?>>> नाही फाटत. हलक्या हाताने लाटायची. ती साखर पण जरा जळुन / ब्राउन होऊन चांगली चव व खरपुसपणा देते.