
४ मोठे बटाटे (उकडल्यावर चिकट न होणारे. Russett किंवा बेकिंग पोटॅटोज चालतील. जुने असावेत.)
५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद
दीड वाटी साधे बेसन
अर्धी वाटी लाडू बेसन (हे रवाळ असते, याने कव्हर चांगले होते. घालायचे नसल्यास साधे बेसन दीड ऐवजी २ वाटी घ्यावे)
१ मोठा चमचा मैदा (ऐच्छिक. कव्हर जाडसर होण्यासाठी.)
१ छोटा चमचा ओवा (ऐच्छिक)
पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)
तेल
- बटाटे उकडून गार झाल्यावर मॅश करावे. अगदी गुळगुळीत करु नयेत. थोडे तुकडे राहू द्यावे.
- आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.
- हे वाटण, मीठ, हळद बटाट्यात घालून नीट मिसळून घ्यावे. १ मोठा चमचाभर तेल तापवून त्यात हळद घालून ते तेल बटाट्यावर ओतले तरी चालेल.
- कडिपत्त्याची पाने हाताने तुकडे करुन मिश्रणात घालावी.
- मीठाच्या अंदाजासाठी मिश्रणाची चव घेऊन पहावी.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करुन ठेवावे. तळव्यात दाबून थोडा चपटा आकार दिला तरी चालेल. आकारावर अवलंबून आहे पण दिलेल्या प्रमाणात साधारण १० गोळे होतील.
- साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
- त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
- चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
- फार पातळ होता कामा नये. (२ वाट्या पीठ असेल आणि २ वाट्या पाणी घातले तर पातळ होईल.)
- कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
- पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
- बटाट्याच्या मिश्रणाचा एकेक गोळा पिठात नीट बुडवून तेलात सोडावा. पिठातून बाहेर काढल्यावर लगेच तेलात टाकावा. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. गोळ्याला चिकटलेलेच रहावे.
- वडे सोनेरी रंगावर तळावे, फार लाल करु नयेत.
- एकावेळी खूप वडे तळू नयेत, प्रत्येकाला कढईत नीट जागा मिळेल असे पहावे.
- दुसरा घाणा टाकण्यापूर्वी तेल पुन्हा नीट तापले आहे याची खात्री करावी कारण एक तळण झाले की तापमान कमी झालेले असते.
- तळून झालेले वडे पेपर टॉवेल, कागदावर काढावे.
- पिठाच्या दिलेल्या प्रमाणात सगळे तळून व्हावेत, नाहीतर अर्ध्या प्रमाणात पुन्हा पीठ बनवता येईल.
- वडे शक्यतो ताजे/गरम खावेत.
- वड्याबरोबर पाव तळलेल्या मिरच्या, चिंच-खजूर आंबटगोड चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कच्चा कांदा इ. घेता येईल.
- उपाहार असेल तर बरोबर चहा द्यावा.
- जेवण म्हणून असेल तर नंतर काहीच नाही किंवा दही-भात, सोलकढी- भात चालतो.
लै भारी. >>>>> वडापाव हा या
लै भारी.
>>>>> वडापाव हा या जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थामधे सेकंड आहे. फर्स्ट पानीपुरी असे माझे ठाम मत आहे. असले फोटो बघून त्या मताला वजन प्राप्त होते. (वडे खाऊन ते आपल्यालापण प्राप्त होतेच)
>>>>
वा!!! काय सुरेख आहेत
वा!!! काय सुरेख आहेत बटाटेवडे!!! अप्रतिम!!
पिठात मैदा घालण्याची कल्पना चांगली आहे. पुढच्यावेळी करुन बघेन. बाकी माझीही रेसिपी हीच. या रेसिपीने केलेले वडे चांगलेच होतात
>>वडापाव हा या जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थामधे सेकंड आहे. फर्स्ट पानीपुरी असे माझे ठाम मत आहे.
अगदी अगदी.
एकदम सह्ही दिसतायेत बटाटेवडे
एकदम सह्ही दिसतायेत बटाटेवडे !!
पिठात मैदा घालण्याची टीप छान आहे ,नक्की करणार .
भारी!!!! सगळे फोटो एकदम
भारी!!!! सगळे फोटो एकदम तोंपासु
इथले फोटो बघून जीव नुस्ता जळत
इथले फोटो बघून जीव नुस्ता जळत होता म्हणून काल केले एकदाचे.
सारण कॅनीच्या कृतीने (आधीही तसंच करत होते फक्त यावेळी त्यात तेलाची हळद घालून फोडणी वाढवली) कव्हरकरता आधी वरच्या कृतीप्रमाणेच केलं. फक्त पिठात अर्धा उकडलेला बटाटा आणि थोडं लिंबू पिळलं. त्याने पार वाट लागली सारणाची मग दुसर्या वेळी ओल्ड फॅशन्ड पीठ भिजवून वडे तळले.
तात्पर्य: पिठात बटाटा कुस्करुन लिंबू पिळायची आयडिया फ्लॉप आहे. आपल्या जबाबदारीवर करुन पहावी.
जर ५-६ लोकांसाठी हे वडे
जर ५-६ लोकांसाठी हे वडे दुपारीच करून ठेवले आणि संध्याकाळी खायचे असतील तर परत ओवन/मा ओ मधे गरम करता येतील का? किती तापमान आणि किती वेळ ठेवायचे?
परत गरम करता येतील. ते किती
परत गरम करता येतील. ते किती आहेत आणि किती गरम हवेत त्यावर बाकीचे अवलंबून आहे. प्लेटमध्ये पेपर टॉवेल ठेवून त्यावर वडे ठेवून मावेमध्ये करता येतील किंवा मग oven. जरा जास्त वेळ लागेल.
मस्त आहे रेसिपी. आज हाच मेनू
मस्त आहे रेसिपी. आज हाच मेनू आहे.
... आणि ती वड्यांबरोबर अफलातून लागते हे देखिल माहीत आहे.
अन्कॅनी,
फोटोमध्ये जी लाल चट्णी दिसत आहे तिची रेसिपी आहे का? तिची चव काय असते हे मला बरोब्बर माहीत आहे
( सुके खोबरे ,लसूण, तिखट, मीठ.... हेच ना?), पण रेसिपी नाही
तुम तळो , हम खाऊंगा !
तुम तळो , हम खाऊंगा !
मी पण केले होते हे वडे मस्त
मी पण केले होते हे वडे मस्त झाले होते . :-)फोटोच असा आहे ना कि नुसते पाहून गप्प बसणे शक्यच नाही !
मी पण केलेच. मस्त झाले.
मी पण केलेच. मस्त झाले. थॅन्क्यू अन्कॅनी.
रेसेपी लिहिल्यापासून करायचा
रेसेपी लिहिल्यापासून करायचा मोह होतोय. पण सध्या बाजारात नवे बटाटे आहेत, चिक्कट असतात ते. जुने बटाटे मिळाल्याबरोबर करणार.
तराना, हो. तीच चटणी. फोटोत
तराना, हो. तीच चटणी. फोटोत दिसते ती स्वाती_आंबोळे ने केली होती. तिला रेसिपी टाकायला सांगू.
ती खलबत्त्यात कुटून जास्त चांगली लागते.
शूम्पी, फोटो कुठे आहेत?
भला उसके (उन सबके) वडे मेरे
भला उसके (उन सबके) वडे मेरे वडे से (दिखनेमे) अच्छे कैसे?
शुम्पे, मै तेरे साथ... सारणात
शुम्पे, मै तेरे साथ...
सारणात लिंबू पिळलं आणि चिमूटभर साखर... मस्त चव आली त्यानं.
दापोलीला एक दुकान आहे तिथे
दापोलीला एक दुकान आहे तिथे कुण्या 'बंधू'ची 'खिडकी वडा - व्हेजिटेबल पेस्ट' मिळते. ती वड्याच्या सारणात घातली तरी चालते असं लिहिलंय. पेस्ट्ची चव चांगली होती. कोणाला मिळाली तर वडे करुन बघा. अजून कुठे मिळत असेल तर लिहा.
दापोलीला एक दुकान आहे तिथे
दापोलीला एक दुकान आहे तिथे कुण्या 'बंधू'ची 'खिडकी वडा - व्हेजिटेबल पेस्ट' मिळते.
मला बेलापुरच्या कोकण सरस प्रदर्शनात 'खिडकी वडा - व्हेजिटेबल पेस्ट' मिळाली. ब.वड्याशिवाय इतर पाकृमध्येही वापरता येते. छान आहे चवीला.
http://www.khidkivada.com/
कस्टमर केअर न. ९२२३५०४५३९/९२७१००५५१२ - मी नंबर ट्राय करुन पाहिलेले नाहीत त्यामुळे चालु आहेत का ते माहित नाही. ज्यांना रस आहे त्यांनी डायलुन पाहावे.
पहील्या पानावर जी लाल चटणी
पहील्या पानावर जी लाल चटणी आहे त्याची रेसिपी द्याल का प्लीज?
चटणीची पाककृती इथे दिली आहे.
चटणीची पाककृती इथे दिली आहे.
धन्यवाद स्वातीदी
धन्यवाद स्वातीदी
मी सारणात १ चमचा मैदा + १
मी सारणात १ चमचा मैदा + १ चमचा तांदुळाचे पीठ मिसळले . मस्त झाले होते. चटणी अगदी खमंग लागते याबरोबर

पीहु, तुझा बटाटेवडा छोट्याशा
पीहु, तुझा बटाटेवडा छोट्याशा कासवासारखा दिसतो आहे. मान बाहेर काढुन देठापासुन मिरची खायला सुरवात करणार आता ते कासव.
वा, मस्त दिसतोय! खरंच कासव.
वा, मस्त दिसतोय!
खरंच कासव.
कासव छाप बटाटे वडे
कासव छाप बटाटे वडे
खरच की कासवासारखा दिसतोय
खरच की कासवासारखा दिसतोय
Hee krutee agadi tantotant
Hee krutee agadi tantotant palun vade kele. Bharee zaale hote. Thanks Lalu!!!
५-६ मोठ्या लसूण पाकळ्या. १
५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद
भांड्यात दोन चमचे तेल गरम करुन त्यात वरचे जिन्नस फोडणी घालतो तसे एकामागोमाग एक घातले किंवा वाटण केले असेल तर वाटण घातले, फोडणीसाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ परतले आणि मग ते बटाट्यांच्या कुस्करलेल्या फोडींवर घातले तर ब.वडे अजुन चविष्ट होतात हे गेल्या रविवारी वरच्या रेसिपीने ब.वडे केले तेव्हा लक्षात आले.
तो (तिला, फोनवर) : आजा शाम
तो (तिला, फोनवर) :
आजा शाम होने आयी
कढाई भी गॅस पे चढाई
बव की है सब तैय्यारी ....
ती (त्याला, फोनवर) :
तू तळ, मै आयी .......
तों.पा.सु. अहाहाहा!!!!
तों.पा.सु. अहाहाहा!!!!
मामी साधना, हो. काही लोक ते
मामी
साधना, हो. काही लोक ते सारणच तेलात परततात.
Pages