१/४ किलो चिकन
७-८ लसुणाच्या पाकळ्या
२-३ चमचे कसुरी मेथी
१२-१५ काळीमिरी भरड केलेली (शक्यतो मिरी आयत्यावेळी क्रश करुन घ्या. विकतच्या क्रश्ड मिरी वापरु नका)
२-३ चमचे तेल
जिरं
मीठ
१. चिकन व्यवस्थित ४-५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. एका कढईमध्ये तेल घाला.
३. तेल गरम झाल्यावर जीरं घाला, जीरं तडतडलं की त्यात ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घाला.
४. मग चिकन घालुन हलवुन घ्या. शेवटी चवीप्रमाणे मीठ, काळीमिरी आणि कसुरी मेथी घाला.
झाकण ठेवुन कमी आचेवर चिकन शिजु द्या. अधुन मधुन हलवत रहा.
चिकन शिजलं की गॅस बंद करा.
हा फोटो;
१. हा प्रकार कोरडा होतो. पोळीबरोबर मस्त लागतं.
२. चिकन शिजत असतांना कसुरीमेथी, काळीमिरी, आणि लसणाचा एकत्रित असा एकदम मस्त घमघमाट सुटतो घरभर.
३. बोनलेस चिकन इतकं चांगलं लागत नाही ह्या रेसिपीमध्ये. म्हणुन शक्यतो बोन्स सकट चिकन घ्या.
४. चिकन खुप जास्त शिजलं की ते अगदी रबरासारखं लागतं. म्हणुन चिकन शिजलं की लगेचच गॅस बंद करा.
५. आवडीप्रमाणे काळीमिरी, कसुरीमेथी आणि लसणाचं प्रमाण कमी जास्त करु शकता.
ही भाजी कोरडी होते<<<<<<<
ही भाजी कोरडी होते<<<<<<< भाजी?
हा प्रकार अॅपिटायझर मधे
हा प्रकार अॅपिटायझर मधे मोडतो..स्टार्रटरसाठी..छान चव येते ह्याची..
भाजी ........?
भाजी ........?
चिकन कालिमिरी : करून पाहावी
चिकन कालिमिरी : करून पाहावी म्हणतो.
कोणी खाणारा भेटला तर मीही
कोणी खाणारा भेटला तर मीही करेन म्हणतो. सोपी आहे, जमेल मला.
छान प्रकार.
छान प्रकार.
भाजी? मला तर स्टारटर वाटले
भाजी? मला तर स्टारटर वाटले
स्टार्टर ..बरोबर .. छान
स्टार्टर ..बरोबर .. छान वाटतंय पण
सोपा प्रकार! कुणी चिकनप्रेमी
सोपा प्रकार! कुणी चिकनप्रेमी येणार असल्यास प्रयोग करुन बघते!
भाजी तोंपासु आहे
भाजी
तोंपासु आहे
मिनी, भारी दिसतंय चिकन माझी
मिनी, भारी दिसतंय चिकन
तुझं म्हणणं खरं आहे बोनलेस ( विशेष करुन चिकन ब्रेस्ट ) ह्या पद्धतीने फार कोरडं पडतं.
माझी एक बंगाली मैत्रिण ह्याच पद्धतीने चिकन करते फक्त ती चिकन पीसेस दोन चमचे दह्यात मॅरिनेट करते आणि गॅस बंद केल्यावर लगेच थोडं जायफळ किसून घालते. secret ingredient
मस्त पाकृ! फक्त चिकनला भाजी
मस्त पाकृ! फक्त चिकनला भाजी नका म्हणू. कोंबडीला वाईट वाटेल.;)
खरं तर हा कोरडा प्रकार आहे,
खरं तर हा कोरडा प्रकार आहे, म्हणुन स्टार्टर म्हणुन पण खपू शकेल. आम्ही पोळी सोबत खातो.
चिकनला भाजी म्हटल्या बद्दल सॉरी बर्का :जिभ चावणारी बाहुली:
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांना धन्यवाद!!
मेथी आहे म्हणून 'भाजी' वाटतं.
मेथी आहे म्हणून 'भाजी' वाटतं.
लसूण-मिरी चव चांगली येईल.