- २ अंडी
- अर्धा कप स्टॉक ( चिकन, व्हेजिटेबल, मासे कुठलाही चालेल - मुळ रेसिपीत कात्सुओदाशी -फिशस्टॉक आहे)
- १ टिस्पुन सोयासॉस ( किंवा मीठ चवीपुरते )
ऑप्शनल -
- चिकनचे एक दोन उकडलेले तुकडे / गाजराचे उकडलेले दोन चार स्लाईस / कुठलेही मश्रुम
- सजावटीसाठी कोथिंबीर / काळे मीरे / मित्सुबाची एक दोन पाने
१. एका मोठ्ठ्या पातेल्यात थोडे पाणी उकळायला ठेवावे. (या पातेल्यात दोन सर्विंग बोल/ दोन कप मावले पाहिजेत. आणि पाण्याची पातळी त्या बोलमधे पाणि जाणार नाही इतपत ठेवावी. )
२. दोन अंडी नीट फेटुन घ्यावी.
३. त्या अंड्यात सोयासॉस / मीठ आणि स्टॉक मिक्स करुन ढवळुन घ्यावे.
४. ज्या छोट्या बोलमधे सर्व्ह करायचे त्या बाऊल मधे चिकनचे तुकडे / मश्रुम / गाजर जे असेल ते ठेवायचे. नसले तरी काही हरकत नाही.
५. अंड्याचे मिश्रण एका जाड गाळणीने गाळुन घ्यावे. गाळतानाच ज्या बोलमधे ते तुकडे ठेवले त्यात समप्रमाणात गाळावे ( म्हणजे अजुन एक भांडे लागणार नाही.)
६. पातेल्यामधले पाणी उकळायला लागले की गॅस अगदी कमी करावा आणि हे बोल पाण्यात ठेवावे. वरुन पातेल्यावर झाकण ठेवावे.
६. हे बोल ठेवल्यानंतर पाणी जोरात उकळता नये नाहितर च्यावान मुशी स्मुथ होत नाही.
७. सात / आठ मिनीटांनी टुथपिक घालुन बघावे, साधारण पुडींग सारखे झाले असेल तर गॅस बंद करावा. सजावटीला कोथिंबीर / मित्सुबो घालुन एक मिनीट तसेच झाकुन ठेवावे म्हणजे त्याचा वास लागतो.
८. आता गरम गरम च्यावान मुशी खायला तयार आहे. नाश्त्यासाठी चांगला प्रकार आहे.
-आठ दहा मिनीटांपेक्षा जास्त शिजवु नये नाहीतर कंसिस्टंसी कशीतरीच होते.
- एका अंड्याला पाव कपापेक्षा जास्त स्टॉक वापरु नये नाहितर पुडींग सारखे बनत नाही.
-भाज्यांचा स्टॉक तयार करण्यासाठी. भाज्यांचे कापुन उरलेले तुकडे जसे फ्लावरचे देठ/ पाने इ. धुवून उकळवुन ते पाणीही वापरता येईल.
- मुळ रेसिपी मधे कात्सुओ दाशी म्हणजे कात्सुओ माशाचा स्टॉक आयत्या वेळी तयार करुन गार करुन वापरतात. पण तो सगळीकडे उपलब्ध नसतो, त्याचा वास काही जणांना आवडत नाही त्यामुळे मी चिकन स्टॉक आणि भाज्याचा स्टॉकचे व्हेरिएशन करुन दोनतीनदा पाहीले.
तळटीप
प्रादेशिक मधे "जपानी" हा ऑप्शन नाहीये. त्यामुळे ते सिलेक्ट नाही केले.
मस्त आहे रेसिपी. लागणारे
अन्कॅनी हसतेस काय..: बघ,
अन्कॅनी हसतेस काय..: बघ, माझ्यासारखीला पण जमायला हवे म्हणु एकदम सिम्पिफाईड करुन बारिक बारिक गोष्टी लिहिल्यात. त्यात १० मिनीताची रेसिपी वाचायलाच जास्त वेळ असे झाले.. जाऊदे
मस्त रेसिपी सावली. लेकाची
मस्त रेसिपी सावली. लेकाची होइकुएन मधली आवडती डिश आहे. खूप दिवसात केली नाही. मी चिकन स्टॉक वापरते तो पण चायनीज तोरीगारा सूप नो मोतो. एकदा सुकवलेले शिइताके मश्रूम्स पाण्यात भिजवून ते पाणी(मोदोशीजिरू) पण स्टॉक म्हणून वापरले होते. पण त्याचा वास मला आवडला नाही.
करून जमले तर फोटो टाकते
हो तोरिगारा , कॉनसोमे
हो तोरिगारा , कॉनसोमे क्युब्स, तयार कात्सुओदाशी सगळे चालेल.
ड्राय शिइताकेचा वास फार स्ट्राँग येतो. त्यापेक्षा माईताके पाण्यात उकळवुन स्टॉक कर. ते ही चांगले लागेल.
आणि हो फोटो टाकाच.
छान लिहिल्येस रेसिपी तुला
छान लिहिल्येस रेसिपी

तुला माहित्येच माझी कित्ती आवडती डिश आहे ते
(No subject)
मस्त! हे थोडेफार कोरिअन -
मस्त!
हे थोडेफार कोरिअन - 'ग्येरान झिम' सारखेच आहे
हो हो लाजो बरेचसे सारखेच आहे.
हो हो लाजो बरेचसे सारखेच आहे.
हा पदार्थ माझ्याकरता नाहीये
हा पदार्थ माझ्याकरता नाहीये पण जपानची आठवण आली त्यानिमित्ताने.
माझ्यासाठीही नाहीये. मलाही
माझ्यासाठीही नाहीये. मलाही ग्येरान झिमची आठवण आली.
सावली, तू लिहिलेली रेस्पी आणि
सावली, तू लिहिलेली रेस्पी आणि फोटो नाही??? शो. ना. हो.
नावावरून जपानी च्यवन प्राश
नावावरून जपानी च्यवन प्राश आहे कि कॉय वाटले. पण मस्त, सोपी व मुख्य हेल्दी रेसिपी. नो ऑइल व्हेरी लिटिल सॉल्ट.
थाय फिश सॉस थोडा टाकला तर?
आम्ही फ्राइड चिकन कडून बॉइल्ड, ग्रिल्ड चिकन कडे प्रवास करत आहोत त्यामुळे हे करून बघूच. एकेकाळी वाट्यांमधे इडल्या/सान्ने करत असत तसे वाटते आहे. त्या प्रोसेसला डबल बॉयलरमध्ये करणे असे म्हणतात.
Bain Marie वापरणे. प्रेशर पॅन मध्ये नक्की होतील दोन बोल.
सायो , आडो मंजूडी रेसिपी
सायो , आडो
रेसिपी समजुन करण्यातच डोके थकले की फोटो काढायला होत नाही 
मंजूडी
अ.मा. थाई फिश सॉस माहित नाही कसा लागतो ते. पण करुन बघायला हरकत नाही. फार स्ट्राँग असेल तर थोडा पातळ करुन वापरता येईल.