Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2011 - 09:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ -२ कारली
मसाला
हळ्द
मिठ
लिंबाचा रस (ऑप्शनल)
तेल
क्रमवार पाककृती:
कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते.
कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या.
तव्यात तेल गरम करून चकत्या मंद गॅसवर तळत ठेवा.
एक बाजू शिजली म्हणजे थोडी ब्राऊन झाली की पलटा आणि दुसरी बाजू कुरकुरीत करून घ्या. झटपट कारल्याचे कुरकुरीत काप तयार. (कुरकुर आवाज येत नाही कुरकुर्यांसारखा :हाहा:)
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी ६-७ काप
अधिक टिपा:
हे काप कुरकुरीत झाल्यामुळे कडू लागत नाहीत.
वरणभाताबरोबर छान तोंडीलावणे होते.
तुम्ही ह्याला रवा, बेसन लावूनही तळू शकता पण त्याच्याशिवायही ही चांगले लाग्तात.
काही जण ह्यावर धणे-जिरा पावडरही पेरतात.
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम कुरकुरीत दिसते आहे
एकदम कुरकुरीत दिसते आहे भाजी!
साध्या वरण भाताबरोबर मस्त लागते .मी चिंच खजुराची चटणी टाकते..
फोटो मस्त आलेत !
छान.. मला आवडतात
छान.. मला आवडतात
वाढणी/प्रमाण: प्रत्येकी ६-७
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी ६-७ काप
बास?? निषेध!
ते फोटूत दाखवलेत तितके तर मी एकटा खातो :ड
(आता भरली कारली पण टाका)
मस्तच दिसतायेत. मला पण आवडतात
मस्तच दिसतायेत.
मला पण आवडतात असे काप.
जागुतै, लिंबाच्या रसाविना
जागुतै, लिंबाच्या रसाविना बहुधा कडू लागत असावेत.
बाकी एकदम कुरकुरीत झाले आहेत हे फोटूतले काप.
मस्त्...चार दिवस आधी का नाही
मस्त्...चार दिवस आधी का नाही टाकली ही रेसिपी?मी बिघडवली नसती
आम्ही कारल्याचे पातळ उभे
आम्ही कारल्याचे पातळ उभे तुकडे करुन असे करतो अगदी सुक्या बोंबलासारखे लागते
दिप्ति, जागोमोहन,
दिप्ति, जागोमोहन, नलिनी
इब्लिस मग मला प्रमाण प्रत्येकी एक डिश असे करावे लागेल :स्मित:ड
डॉ. नाही बिना लिंबानेही चांगलेच लागतात. वहिनींना सांगा एकदा करायला.
स्नेहा काय योगायोग ग मी चार दिवस आधीच केली पण आज टाकली.
नीलू, सुके बोंबील
छान.
छान.
हे shallow fry करून पण छान
हे shallow fry करून पण छान लागतात. आणि तसं fry करताना त्यात थोड्याश्या लसणीच्या पाकळ्या घालायच्या. मस्त चव येते.
छान. फक्त, आमच्या घरीं
छान.
फक्त, आमच्या घरीं कारल्याचीं कापं उभी [ वरीलप्रमाणे गोल चकत्या न काढतां] काढतात; तितकंच दिसण्यात तरी माशांच्या कापांशी साम्य !
जागू मस्तच, वांग्याचे
जागू मस्तच, वांग्याचे कारल्याचे दोन्ही काप एकदम छान लगेच करायची इच्छा झाली. घरात कारल सगळ्यांना प्रचंड आवडत. आता शनिवारी दुकानात ताजी कारली मिळालीतर लगेच आणते
रचक्याने मी कारल्याचा कोणताही पदार्थ करताना कारल्याच्या बिया काढते वरील फोटोत त्या दिसतायत बियासकट कारल केल तर खूप कडू लागत नाही का? ( अर्थात त्याचा पुर्ण कडवट पणा गेलातर त्यात मजा नाही)
कारल्याचा कोणताही प्रकार
कारल्याचा कोणताही प्रकार प्रियच
दक्षा... +१
दक्षा... +१
मी पण असेच करते. फक्त काप
मी पण असेच करते. फक्त काप करुन त्याला तिखट, मीठ, हळद, लिंबू लावून १ दिवस जरा उन्हात ठेवून देते, अर्थात तेवढे उन असले पाहिजे. माझ्या ऑफीस मधील एक कलीग करते असे.
पुढे सेम, तेलात परतायचे. तेल सुद्धा कमी पुरते.
आम्ही कारल्याचे पातळ उभे
आम्ही कारल्याचे पातळ उभे तुकडे करुन असे करतो अगदी सुक्या बोंबलासारखे लागते >> नीलु मी पण असे करते
आणि जागुसारखेही करते, फक्त बिया काढते, नी मस्त कुरकुरीत करुन मग एकावर एक बोटात घालुन घालुन रिंगा रिंगा करते ... 
छान आहेत काप जागू. मी कढईत
छान आहेत काप जागू.
मी कढईत असे काप करते बिया काढून (शिवाय पारंपारिक पध्द्तीनुसार मीठ लावून थोडा वेळ नुसतेच ठेवते अन ३ दा खळख़ळून धुवून/पिळून घेते. कडूपणा थोडाच राहू देते) तुझ्या पध्दतीतल्या कडू नाही का लागत?
माझी आई असे काप करते. पण आधी
माझी आई असे काप करते. पण आधी ते काप उन्हात वाळवते. छान लागतात. चकत्या कापण्याऐवजी अर्धचंद्राकार कापले तरीही चालतात. वरण भाताबरोबर तर छानच कॉम्बी होते.
सगळ्यांच्या वेगवेगळ्या टिप्स
सगळ्यांच्या वेगवेगळ्या टिप्स आवडल्या.
साक्षीमी कानात नाही ना घालत ?
जागु, मस्तच झालेत कापं. फोटो
जागु, मस्तच झालेत कापं. फोटो पण लई भारी
जागु..मस्त आजच केल्यात
जागु..मस्त आजच केल्यात मी..

रिंगा रिंगा कानात नाही ना घालत.. जागु....
व्वा जागू ...कीपिटप!
व्वा जागू ...कीपिटप!
प्रिती, वर्षू, मानुषी
प्रिती, वर्षू, मानुषी धन्यवाद.
जागू अग, कानात घातले तर खाणार
जागू अग, कानात घातले तर खाणार कसे??
साक्षी दिवा घे ग.
साक्षी दिवा घे ग.
जागू अग दिवा घेऊनच बोलले,
जागू अग दिवा घेऊनच बोलले, चलता है... म्हणुन तर स्मायली टाकली
मस्त!!!!!!!!
मस्त!!!!!!!!
साक्षीमी अग हाताच्या
साक्षीमी

अग हाताच्या बोटापेक्षा कान तोंडाच्या जवळ असतात
साक्षी धन्यवाद.
अग पण कितीही जवळ असला तरीही
अग पण कितीही जवळ असला तरीही कान (स्वतःचा
) तोंडात जात नाही ना?
उगाच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालाव्या लागतील मांजरासारख्या.. 
जागुताई, आजच केल्या होत्या!!
जागुताई, आजच केल्या होत्या!! मस्त झाल्यात!!! धन्स!
Pages