चना-जिमी कंद पराठा म्हणजे इथे भिजवुन उकडलेले काबुली चणे आणि जिमीकंद म्हणजे उकडलेले सुरण असे आहे..आता हे काबुली चणे कुकर मधे उकडुन मऊसर शिजवुन घ्यायचे आहेत..रोळी वर ओतुन त्यातले पाणी काढुन टाकायचे.. मिक्सरमधुन वाटुन घ्यायचे..तसेच सुरण सोलुन मोठ्या फोडी करुन त्या कुकरच्या डब्यात ठेवुन मऊसर वाफवुन घ्यायच्या आहेत या फोडींमधे पाणी अजिबात नको या फोडी ही मिक्सर मधुन वाटुन घ्या..
तर यासाठी लागणार्या पदार्थाचे प्रमाण असे आहे..
१ वाटी काबुली चणे भिजवायचे नंतर उकडुन घ्यायचे..
१/२ किलो सुरण.
आले ,मिरची ,लसुण पेस्ट ३-४ चमचे चवीप्रमाणे घ्यावी..लसुण वगळला तरी चालेल]
अर्ध्या लिंबाचा रस..
ति़खट२ चमचे ,मीठ १ १/२ चमचा [दोन्ही चवीप्रमाणे]
ओवा १ चमचा..
हळद १ चमचा..
तेल अर्धी वाटी..पराठे तळायला..
खोबरे/पुदिना चटणी..
बुंदी चे रायते..
३ वाटया गहुपिठ चवीला मिठ २ चमचे तेलाचे मोहन घालुन सैलसर भिजवलेली..
१[ वाटलेले चणे+सुरण एकत्र करा त्यात मिरचीचे वाटण,तिखट,मीठ,ओवा,हळद,लिंबाचा रस , कोथिंबीर घालुन छान कालवुन घ्या..
२[भिजवलेल्या पिठाचा फुलका पोळीएवढा गोळा घेवुन त्यात दुपटीपेक्षा जास्त [पुरण पोळीसारखे ]पुरण भरा ..
३]तवा बेतशीर तापवुन त्यावर तेलाचा चमचा फिरवुन [अगदी कमी तेल]खरपुस भाजा किंवा नुसतेच भाजुन ठेवा..जेवणाच्या वेळी पराठा मावे..त गरम करुन त्यावर आधी एकदा तापवुन थंड केलेल्या तेलाचा चमचा फिरवा..
४]चटणी किंवा बुंदी रायते याबरोबर आस्वाद घ्या..
आपण नेहमी सुरणाची भाजी करतो..फार फार तर सुरण+बटाटा+भाज्या घालुन चवदार कटलेट करतो..पण पराठे सहसा करत नाही..सुरण टिकते..असे लहान आकाराचे सुरण [बट्टी म्हणतात त्याला]आणुन ते बरेच दिवस टिकुन राहु शकते लौकर खराब होत नाही..सुरण खाजते बरेचदा म्हणुन त्यात लिंबुरस टाकायचाच..चणा आणि सुरण या दोन्हीची चव वेगळीच लागते..पचनासाठी दोन्ही वातुळ आहे त्यासाठी आले भरपुर घालायचे आहे..
अरे वा, नवाच प्रकार.
अरे वा, नवाच प्रकार. नायजेरियात भल्या मोठ्या आकाराचा पांढराशुभ्र सुरण मिळतो, अजिबात खाजरा नसतो तो. त्याचे चांगले होतील.
वेगळी पाकृ. छान! ती फक्त
वेगळी पाकृ. छान! ती फक्त ग्रूप सभासदांसाठी मर्यादित आहे. सार्वजनिक करणार का?
अरुंधती..सार्वजनिक कसे
अरुंधती..सार्वजनिक कसे करायचे.सांगतेस का? लगेचच करते...
तुम्हाला लेखाच्या वर उजवीकडे
तुम्हाला लेखाच्या वर उजवीकडे ''संपादन'' हा टॅब दिसेल, तिथे जाऊन क्लिक करायचे, आणि त्या पानावर खाली ''ग्रूप'' असे निळ्या अक्षरातील लिहिलेले दिसेल त्याला क्लिक करा. खाली लेखन सार्वजनिक करण्यासाठी चौकोन दिसेल त्यात क्लिक करा व तो बदल सेव्ह करा.
अरुंधती ..जमले मला..धन्स गं..
अरुंधती ..जमले मला..धन्स गं.. माबो.वर चे असे अजुन बरंच काही काही शिकायचे आहे..जमेल हळु हळु ..बरंचसं विचारुन ,माबो वर ची प्रश्नोत्तरे वाचुन वगेरे..
हे नक्की करणार!
हे नक्की करणार!
मस्त वेगळीच रेसिपी दिसतेय.
मस्त वेगळीच रेसिपी दिसतेय. प्लीज, मनावर घेऊन फोटो काढून इथे अपलोड करायचं शिकून घ्याच. तुमच्या रेसिपी एकदम वेगळ्या असतात. फोटोंनी त्याला चार चांद लागतील.
मस्तच. एकदम वेगळा प्रकार.
मस्तच. एकदम वेगळा प्रकार. आलूपराठा खातो पण सुरणाचे पराठे होतील हे कधी डोक्यात आले नव्हते
काकू, प्लीज फोटो टाकायचं मनावर घ्याच. सध्या घरगुती अडचणी आहेत हे माहीत आहे पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की. आत्तापर्यंत इथे लिहिलेल्या पदार्थांपैकी एखादा सहज घरी केला गेला तरी आत्ताही त्या धाग्यावर फोटो टाकता येईल
छान.
छान.
सुरणाचा एक नवा प्रकार कळला.
सुरणाचा एक नवा प्रकार कळला. सुरण औषधी असतो असे म्हणतात. काबुली चणे घालायचे नसतील तर खूप पर्याय आहेत. बारीक चिरलेला पालक,कोथिंबीर वगैरे. सुरणामुळे सारणाचा गोळा मिळून येईल.
छान रेसिपी.
मस्त पाककृती. कधी ऐकली
मस्त पाककृती. कधी ऐकली नव्हती.