नागमुका नागमुका नागमुका नागमुका
नागमुका नागमुका नागमुका नागमुका
असं भांबावून बघू नका........ !!! हे बॅग्राऊंडचं गाणं आहे ज्यावर एकताची "सिल्क" सर्वांचं लक्ष्य वेधून घेते.... अगदी सर्वांचंच..!! पब्लिसिटीच अशी केलीये की चाणाक्ष वाचकांना आता वाटेल की, पुढच्या सीनमध्ये विद्या बालन आता "नागाचा मुका" च घेणार.....
घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका
घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका (नागमुकाच्याच चालीवर )
तसं काहीही होत नाही...... ईम्रान हश्मी आणि नसिरुद्दीनसारखे धुरंधर असताना नागाला काही संधीच नाहिये... नाग वैतागलाय, पण एकताने पार्ट २ मध्ये पहिल्याच सीनमध्ये नागाला मारून नायकाचं नावच "नाग" ठेवायचं असं नक्की केलय
**********************************************************************************************
लग्न न केलेली (की न झालेली ) माणसं नेहमीच काही बाबतीत लग्न झालेल्या किंवा लग्नाळलेल्या माणसांपेक्षा पॉवरफूल असतात.....:डोमा: ही माणसं आपली पॉवर इतरांशी नडायला किंवा इतरांना नाडायला वापरतात....... "नडणारे" उदाहरण म्हण़जे अण्णा हजारे आणि "नाडणारे" उदाहरण म्हणजे साक्षात एकता कपूर.
सिरिअल माध्यमातून विवाहबाह्यसंबंधांचा मारा करत तिने लग्न झालेल्यांवर सूड उगवला.... आणि आता रेश्मा, सिल्क, शकिला सारख्यांना नायिका बनवून त्यांचे जीवनपट काढलेत..
पब्लिसिटी पण एवढी भन्नाट करून ठेवलिये की, ऑनलाईन बुकिंग करताना जोगेश्वरी ते मालाड या भागातली मल्टिप्लेक्सेस एका तासाच्या काळात ज्या पधतीने धडाधड फूल होताना पाहिलीत ऑनस्क्रीन, तेही दुसर्या दिवशी.... धडकीच भरली.
*****************************************************************************************************
चला आता चित्रपटाकडे वळूया.
चित्रपट आणि "सिल्कस्मिता किंवा तत्सम कोणीही" यांच्या आयुष्याचं साधर्म्य हेच की, आहे नाही ते हातचं न राखता पूर्वार्धात दाखवायचं आणि मग उत्तरार्धात हरी हरी करत बसायचं.....!!!
विद्या बालनचा एकता बरोबर सुरू झालेला "हम पांच" पासूनचा अभिनयाचा प्रवास "द डर्टी पिक्चर" पर्यंत पाहिला तर काही काही सीन्समध्ये नक्कीच दाद द्यावीशी वाटेल विद्याला...... पण अंगप्रदर्शनाच्या अतिरेकामुळे तो अभिनय कोण किती लक्षात ठेवेल जरा शंकाच आहे.
एका अत्यंत गलिच्छ समजल्या जाणार्या वातवरणातून (पांढरपेश्या समाजाच्या नजरेतून) आलेली, महत्वाकांक्षी (कोणाची महत्वाकांक्षा काय करायला लावेल नेम नाही) स्ट्रगलर तरूणी एक एक शिडी योग्य वेळी योग्य (तिच्या दृष्टीने) पधतीने वापरत स्टारपदावर पोचते.... स्वतःचे असे "ऊसूल" न तोडता शिखरापर्यंत पोचते आणि मग तिथून पुन्हा एकदा अधोगतीला लागून तिचे आयुष्य एक शोकांतिका कसे होते, याचा प्रवास म्हणजे "द डर्टी पिक्चर". हा असा जीवनप्रवास आपण यापूर्वीही अनेकदा पाहिलाय... पण इथे पब्लिसीटी एवढी आहे की, लोक तो प्रवास वगैरे बघायला आलेलेच नसतात......
विद्या बालनने अभिनय केलाय यात वादच नाही...... नसीरभाई, ईम्रान आपापल्या ठिकाणी योग्यच... तुषार कपूरबद्दल फक्त चित्रपटांची नावं बदलतात, त्याच्याबद्दल काही लिहिण्यासारखं नसतंच.... प्रेक्षकांवर खरा प्रभाव पडतो तो "संवांदांचा"...... अत्यंत चटपटीत संवाद....... म्हणजे कित्येक वेळा जाणवत राहातं की सिल्क सारख्या लोकांनी अश्या प्रकारे ईंडस्ट्री रूल वगैरे करणं हे वास्तवात अशक्य आहे, पण संवादांमुळे काही ठिकाणी नकळत प्रेक्षक दाद देऊन जातोच. विशेषतः पुरस्कार मिळतो, तेंव्हाची जगाला फाट्यावर मारल्याची तिची बडबड प्रत्यक्षात अशक्य असूनही प्रेक्षक तिच्या मानसिकतेला दाद देतो. ही संवादलेखकाची करामत.
मिलन लुथ्रियाची ही खासियत आहे. अगदी "कच्चे धागे" पासून "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई" पर्यंत त्याचे संवाद लक्षात राहणारेच असतात.... इथेही त्याची ही छाप कायम आहे.
मला स्वतःला शेवटचा काही भाग जास्त आवडला जिथे विद्याला अभिनयाला बराच वाव मिळाला आणि तिने तो सार्थ केलाय.....
महत्वाची त्रुटी म्हणजे "साऊथ ईंडियन" वातावरण कुठेच निर्माण होत नाही..... फक्त न्कपडे तसे दिले.. लुंग्या नेसवल्या प्रोड्युसर्सना म्हणजे सगळं होत नाही..... देहबोली, संवाद कुठेही साऊथ ईंडिअन वाटत नाहीत....
त्यासाठी संबंधित लोकांनी "रामगोपाल वर्माच्या" चित्रपटांची पारायणं करायला हवी होती.... ती जमलेली नाहीत.
उल्लाला उलाला गाणं चपखल बसलय..... "ईश्क सुफियाना" गाणं हे चक्क घुसडलय...... ईम्रानला तिच्याविषयी वाटू लागलेलं प्रेम दाखवायला उगाच एक गाणं वाया घालवलय..... त्याचं चित्रिकरण तर बकवासच. तिथे कात्रीच लागायला हवी होती.
ओव्हरऑल, ज्या अपेक्षेने प्रेक्षक आत घुसतो ती पूर्ण करण्यात विद्याने कुठेही कसूर केलेली नाही.... हा चित्रपट चालला तर तो विद्यामुळेच चालेल..... !!!!!
सरतेशेवटी एकच वाटलं.......
प्रेक्षकांची मानसिकता आजही तीच आहे..... फक्त नावं बदलली आहेत....त्यावेळी "सिल्कस्मिता" होती आज "विद्या बालन" आहे..... अंगप्रदर्शनाला इतकी पूर्वप्रसिध्दी मिळाली नसती तर हा चित्रपट इतकं ओपनिंग घेऊच शकला नसता.......... आजही एकट्याच्या जीवावर प्रेक्षक खेचून आणण्याएवढी विद्या मोठी नाही , ती "बाल"च आहे.
बाकी आता या लाटेवर स्वार होऊन शकिला आंटी, रेश्मा, हुमा खान, पार्वती, डॉली बिंद्रा, राखी सावंत यांच्यावर "जीवनपट" निघाले तर प्रेक्षकांनी त्याची मानसिक तयारी ठेवावी.
नागमुका नागमुका नागमुका नागमुका
नागमुका नागमुका नागमुका नागमुका
भरत, बुल्स आय. संपूर्ण सहमत.
भरत, बुल्स आय. संपूर्ण सहमत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
’अभिनय’ हा सिल्क स्मिताचा
’अभिनय’ हा सिल्क स्मिताचा युएसपी कधीच नव्हता. रुप तर नव्हतेच. तिच्याकडे काही होते तर तो तिचा बिनधास्तपणा आणि तो तीने समर्थपणे वापरला.तिच्या आयुष्यात लोकांची सहानुभुती मिळावी असे तिने काहीच केले नव्हते. आणि विद्याची सिल्क तिला नेमके हेच मिळवून देते. मला वाटते हा विद्याच्या अभिनयाचा, तिच्या भुमिकेत स्वत:ला झोकुन देण्याच्या वृत्तीचा विजय आहे.
बाकी या चित्रपटाचे गणेश मतकरी यांनी केलेले परिक्षण येथे वाचता येइल.
'द डर्टी पिक्चर'- विद्या बालन आणि करमणूकीचा अट्टाहास
सिल्क स्मिताचे मूळ नाव
सिल्क स्मिताचे मूळ नाव 'सिलक्कु स्मिथा' तिच्या गावावरून असलेले. 'सिल्क' नावाचा तिचा चित्रपट खूपच गाजल्याने व सूट झाल्याने ती सिल्क स्मिता या नावानेच ओळखली जाऊ लागली...
उपयुक्त माहिती! (इतर एखाद्या
उपयुक्त माहिती!
(इतर एखाद्या संकेतस्थळावर स्वतःच्या नावाने टाकेन)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विशाल अनुमोदन.. भुंग्या तुझं
विशाल अनुमोदन..
भुंग्या तुझं म्हणजे चित्रपटाचं नाव तिन्हि भषात लिहावं ह्यासारखच झालं.. :p
चित्रपट पहायला जाणारा प्रत्येक जण बाबींचा विचार करत नाहि, करमणूक महत्वाची आणि ती आहे.. :p
शांत हो बाळ, तुला काहि वाटण्याने, काहि फरक पडेल असं वाटत नाहि..
मला तर बाबा आवडला सिनेमा..
सम्या
सम्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भुंग्या , चित्रपट परीक्षण ठीक
भुंग्या , चित्रपट परीक्षण ठीक ठाक !! ...हे वाचुन पिक्चर पहायला हवा असे वाटायला लागले!
अवांतर : माझ्या एका मित्राचे , ह्या चित्रपटाचे २ वाक्यात परीक्षण असे आले
" फ्यॅशन " पिक्चर पाहिला असेल तर हा बघायची जरुरत नाही ...सेम ष्टोरी आहे .....फक्त एकच फरक ...तिथे ३ सडसडीत नायिता वापरल्या होत्या इथे तिघिंची बेरीज वापरीली आहे
अति अवांतर :![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मला वाटतय ...लवकरच राखी सावंतच्या जीवनावर एक पिक्चर येईल ...प्रमुख नायिका " राखी सावंत "
यात तुषार कपूर आहे का ? अरे
यात तुषार कपूर आहे का ? अरे मग बघायलाच पाहीजे हा पिक्चर...
भुंग्या
तुझ्या स्टाईलचे पंचेस आवडले. जसं एकताला असे सिनेमे काढायचा अधिकार आहे तसं तुला तुझ्या पद्धतीने लिहायचा अधिकार आहे, आणि ते आवडणं न आवडणं हा वाचकांचा अधिकार आहे..
और क्या ? तुमच्या इथे सध्या घेवडा मिळतो का रे ?
डॉली बिंद्रा कोण? गुगलल्यावर
डॉली बिंद्रा कोण? गुगलल्यावर तर एक प्रचंड बाई भरपुर शब्द कमी वाटेल इतका मेकप करुन अन चकाकते कपडे घालुन असलेली असे फोटो आहेत. अन बाकीच्या कोण आहेत? नै म्हणजे तुम्हाला भलतीच माहीती म्हणुन विचारलं. सगळ्या हिंदी पिच्चरमधल्याच का?
डर्टी माईंडस् थिंक अलाईक
डर्टी माईंडस् थिंक अलाईक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages