हा लेख मी एक मानव? ह्या लेखाचा पुढचा भाग आहे. चांगले किंवा वाईट नियम, संस्कार कोणी ठरवले, का ठरवले? ह्याचा शोध मी माझ्या अनुभवांच्या विश्लेषणातून केला. अनादिकालापासून ह्या सृष्टीत नियमित प्रसंग घडले व घडत आहेत. ह्या नियमित प्रसंगांची यादी म्हणजेच नियम हे मला माझ्या क्षमते प्रमाणे समजले आहे. निसर्गाने दिलेल्या जीवदानाचा चांगला सतकारणी उपयोग व्हावा म्हणून मानवाने बरेच नियम स्वेच्छेने स्वीकारलेले आहेत. हे शरीर सुदृढ, निरोगी राहावे म्हणून ह्या नियमांचे संकलन करून सुनियोजित केलेला कार्यक्रम म्हणजे संस्कार असा माझा मीच ठरवलेला अर्थ आहे.
माझ्या जन्मापासून माझ्या पोटात जाणारा आहार हा देखील एक संस्कार होता. माझ्या आईने जमा केलेल्या अनुभवांनी तिने ठरवले कोणते अन्न माझ्या प्रकृतीला पोषक होते. त्या आहारातील प्रत्येक पदार्थाची निवड, स्वच्छता, शिजवणे, व कोणत्या वेळेला मी ते खावे हे सगळे आहार विषयक संस्कार होते व त्या संस्कारांनी माझ्या शरीराची वाढ झाली म्हणून ते आहाराचे संस्कार चांगले होते. पण रोज दिसणारा विरोधाभास समजणे कठीण झाले आहे, भिकारी बाई तीच्या मुलांना आहाराचे कोणते संस्कार देते? त्या आहार संस्कारांना चांगले वाईट कोण ठरवणार?
जो पर्यंत स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता माझी नव्हती तेव्हा माझ्या पालकांनी माझ्या वर संस्कार केले पुढे त्यांनीच त्याचे नियम तयार केले व मला ते नियम पाळण्याची सक्ती केली. त्या नियमांचे मी पालन केल्यास माझे दैनंदिन जीवन सुलभ निरोगी होईल हा त्या नियम बनवण्या मागचा हेतू होता. हे सगळे नकळत घडत गेले. कारण मी अजून घराच्या चार भिंतींच्या मर्यादेत होतो. जेव्हा शेजारी व घराबाहेरील वातावरणात मिसळणे सुरु झाले तेव्हा माझ्या वर झालेले संस्कार व नियम पालन सक्तीची तुलना करण्याची संधी मला मिळाली. त्या आहार संस्कारांनी माझ्या शरीरातील अवयवांच्या घनतेत (बॉडीमास) बदल घडला होता. त्यामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) होण्याच्या क्षमतेत बदल घडत होता. म्हणून त्या आहार संस्कारांनी माझी मानसिकता व संवेदनाक्षमता इतरांच्या तुलनेत बरीच वेगळी तयार झाली हे आज जाणवते आहे.
माझ्या क्षमतेची सत्यता रोज घडणार्या प्रसंगातून जाणवत होती. समवयस्क मुले-मुली माझ्या घरात केव्हाही खेळायला येत असत, त्यांना कधीच कोणी अडवले नाही पण मी फारसा कोणाच्या घरात गेलो नव्हतो, शेजारची मंडळी आम्हा मुला-मुलींना सारखे घरातून बाहेर काढत असत. हा माझ्या पालकांच्या संस्कारांतील फरक मला अगदी सहज जाणवला. संध्याकाळी आमच्या ६ फुटाच्या झोपाळ्यावर समवयस्क मुले-मुली श्लोक व पाढे म्हणायला रोज जमत होते. त्या श्लोकांचे उच्चार आम्हा भावंडांचे इतरांच्या तुलनेत जास्त स्पष्ट होते, आमचे पाठांतर देखील जास्त होते. हा सगळा संस्कारांचाच परिणाम होता.
हे जसे आहार विषयाचे संस्कार व आहार नियम होते तसेच माझी मानसिक क्षमता निरोगी असावी म्हणून माझ्या पालकांनी माझ्यावर मानसिक संस्कार केले व मानसिक नियम पालनाची सवय मला लावली. ह्या नव्याने उमजलेल्या माझ्या क्षमतेची तुलना घराबाहेरील वातावरणातील इतरांच्या मानसिक संवेदनाक्षमतेशी करण्याची संधी मला मिळाली. आजतागायत मला कोणाला अथवा कोणाविषयी शिव्या अपशब्द काढण्यात कमीपणा वाटतो. माझे असे ठाम मत आहे की शिव्या अपशब्द काढणे ही बुद्धी कमकुवत असण्याची लक्षणे आहेत. अहो एकदा चक्क माझ्या आईनेच मला गाढव आहेस असे म्हणताच जन्म देणारी तीच आहे व ही चूक तिची आहे माला दोष देऊन काय उपयोग असे मीच तीला सांगितले होते. तिने त्या करता तत्काळ माझ्या कानाखाली वाजवली होती पण त्यानंतर तिने बोलणे बदलले होते, गाढवासारखे वागू नकोस असे ती म्हणू लागली. ह्यालाच तुम्ही चांगले संस्कार म्हणाल की अजून काही उपाधी देणार? ह्या चांगल्या संस्कारांचा परिणाम म्हणजे मी मित्र गोळा केले नाहीत पण महत्त्वाचे म्हणजे शत्रू निर्माण होऊ नयेत ह्याची जास्त काळजी घेतली. आजही तशी काळजी घेतो आहे.
माझ्या लहान पणी शेजारी असणार्या समवयस्क मुला-मुलींनी माझी खेळणी व वस्तू परवानगी शिवाय त्यांच्या घरी लंपास केल्या होत्या. हा परिणाम त्यांना मिळालेल्या संस्कारांचाच होता हे मला त्या काळातच समजले होते. प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु झाले तेव्हा घराच्या चार भिंतीत झालेल्या संस्कारांचा व शाळेत घडणार्या संस्कारांचा विरोधाभास जाणवू लागला होता. खोटे बोलणे वाईट असते, देव त्याला शिक्षा करतो वगैरे संस्कार घरापुरतेच असतात असे अनुभव रोज येत होते. शाळेत मुले-मुली, शिक्षक खोटे बोलत होते. त्यांना शिक्षा होताना दिसली नव्हती. उघड्यावर मुतायला, संडासाला बसणारी मुले-मुली बघताना आईने दिलेले संस्कार चुकीचे आहेत की काय असेच काही वेळा वाटत होते. भिंतीवरील नग्न चित्रे व त्या खाली लिहिलेली आकलन न होणारी वाक्ये माझ्या पालकांच्या संस्कारांना / नियमांना जुनाट ठरवीत होती.
माध्यमिक शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर ब्राम्हण व ब्राम्हणेतर हा फरक व त्याचे परिणाम मी अनुभवले होते. त्याचेच हे एक उदाहरण आहे. माझ्या बाबांनी एका १३ एकर जमिनीच्या ७० प्लॉट असलेल्या सोसायटीचा कार्यवाह म्हणून काम केले होते. रस्ते, दुतर्फा झाडे अशी बरीच कामे विशेष लक्ष देऊन केली होती. त्या जागेत बाबांनी त्यांच्या मालकीचे घर बांधले होते. आमच्या शेजारी लेवा पाटील समाजाचे एका शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांची बायको दुसर्या एका शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यांची तीन मजली इमारत होती. त्यात आधुनिक संडासाची व्यवस्था होती पण त्यांची नातवंडे आमच्या घरासमोर झाडाखाली उघड्यावर संडास करायला सकाळी, दुपारी येऊन बसत होती. मी त्यांना हे चुकीचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्कारांना साजेसे उत्तर मला दिले " ए बाम्हण्या, माझी नातवंडं अशीच रोज संडासाला बसतील. ती जागा तुमच्या हद्दीत नाही. पटत नसेल तर ही जागा खाली करा. जा बाम्हणाच्या वस्तीत जाऊन राहा." सगळेच ब्राम्हण चांगले व ब्राम्हणेतर वाईट असे नव्हते / आजही नाहीत मग ब्राम्हण कोण व का? ह्या १८ पगड जाती का व कोणी निर्माण केल्या हा माझा शोध सुरु झाला.
ब्राम्हण कोणाला व का म्हणतात हे प्रथम ब्राम्हणेतरांचे मत जाणून घेतले. पूजा पाठ करणारे, उगीचच जास्त शिकलेले आहोत असे समजणारे, लोकांना भविष्य सांगून फसवणारे, लग्न कार्यात पत्रिकांचा घोळ घालणारे, न समजणारे मंत्र म्हणून दक्षिणा गोळा करणारे, फुकट मेजवानी खाणारे, लांब शेंडी उघडे पोट दाखवत गावभर फिरणारे, पाले भाज्या कढी भात खाणारे, अशी विधाने ऐकायला मिळाली. सिनेमा नाटकातून ब्राम्हण असाच काहीसा दाखवला गेला, आजही दाखवला जातो. पण असले कोणतेच प्रकार माझ्यात नव्हते मग मला ब्राम्हण का व कोणी ठरवले? ह्याचा अर्थ मला समजवून सांगण्यात आला. माझा जन्म एका ब्राम्हणाच्या घरात झाला होता, आडनाव रानडे म्हणून मी ब्राम्हण ठरलो होतो. तो माझा दोष कसा होता? मला माझे डोके चांगल्या प्रकारे वापरता येते हा दोष का व कोणी ठरवला?
जसे वय वाढत गेले तसे जाती, पोटजाती, ब्राम्हणांचा द्वेष, धर्म व त्यातील फरक असे विविधं प्रश्न त्रास देत होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आता सुरु झाला.
ह्या चित्रणात माझी मोठी बहिण सातवीच्या मुलांना "ध्वनी प्रदूषण" हा विषय समजण्या करता तीने केलेली कवीता वाचन करते आहे. मोठी बहिण २००४ ला हृदय विकाराने आम्हाला सोडून गेली. ही कवीता म्हणजे एक संस्काराचाच प्रकार आहे. तिच्याच शब्दात ऐकू या. दुवा - http://youtu.be/gcYfSHNVFm8
उघड्यावर संदासला बसतात म्हणून
उघड्यावर संदासला बसतात म्हणून ते संस्कारहीन व तुम्ही फार संस्कारशील.. हे काय पटत नाही.. लाखो, करोडोंचा भ्रष्टाचार करणारे उघड्यावर बसतात का कमोडवर बसतात, हे एकदा तपासून बघायला हवे.
मी अण्णा हजारे साहेब, "ओळख
मी अण्णा हजारे साहेब, "ओळख लपवणारे" अशी एक यादी मी केली आहे त्यात एक नाव अजून वाढले. तसेच "विषय समजून न घेण्याचा छंद" अशी एक यादी आहे त्यात हे एक नाव अजून वाढले. अण्णांची डोके दुखी वाढवणारे तुम्ही एक अशीच ओळख पटली आहे. तुम्हाला अजून पाळणा प्रिय व योग्य असल्याचे तुमच्या सदस्य यादित दिसले.
उघड्यावर संदासला बसतात म्हणून
उघड्यावर संदासला बसतात म्हणून ते संस्कारहीन व तुम्ही फार संस्कारशील
---- संडासला बाहेर मजबुरी म्हणुन बसणे वेगळे आणि आर्थिक सुबत्तता असणार्या घरातील लहान मुलांनी ( दोन मुख्य-अध्यापक घरांत आहे, आर्थिक दृष्टिने सधनमधे मोडणारे कुटुंब) असे करणे वेगळे. येथे दोष लहान मुलांचा नाहीच आहे...
शाळेमधे मुख्याध्यापक म्हणुन काम करणारांना "सार्वजनिक स्वच्छता" (या विषयावर एक स्वातंत्र बाफ आहे) याचे महत्व समजणार नसेल, समजत असेल तर ते अमलांत आणायचे धाडस नसेल तर ते शाळेतील १००० बालकांना काय दर्जाचे संस्कार, शिक्षा देत असेल?
तुमच्या श्रीमंत शिक्षक
तुमच्या श्रीमंत शिक्षक शेजार्याच्या घरात संडासची सोय असूनही तो त्यांची नातवंडे शेजार्याच्या घरासमोर संडासला बसवत होता व चांगला सुशिक्षित असूनही त्याचे समर्थन करीत होता, यात ज्यांना कांहीच गैर दिसत नाही अशांना तुम्ही उत्तरे देण्यात शक्ती खर्च करू नका. उदय यांना तुमचा मुख्य मुद्दा लगेच ध्यानी आला तसा तो कोणाही समंजस माणसाला लक्षात येईल.
मी अण्णा हजारे साहेब, "ओळख
मी अण्णा हजारे साहेब, "ओळख लपवणारे" अशी एक यादी मी केली आहे
केलेत ना वर्गीकरण ? यालाच म्हणतात ब्राह्मणत्व!!
लेख छान आहे, पण तुमच्या शोधात
लेख छान आहे, पण तुमच्या शोधात तुम्हाला काय माहिती मिळाली ती वाचायला आवडेल. अचानक शेवट झाल्यासारखा वाटला. सरसकट ब्राह्मण समाजाला नाव ठेवली जातात, त्यांच्या गुणाचा आदर होत नाही. अर्थात त्यामुळे ब्राह्मणांना काही फरक पडत नाही. इथे बरेच लोक आहेत, लेखाचा आशय ना समजून घेता फालतू टीका करणारे.
आपण प्रगत देशाचे कौतुक करतो , त्यांच्याकडे स्वच्छता का आहे? तिथले लोक शिक्षक शेजार्या सारखे वागत नाहीत म्हणून. तो संस्कार त्यांच्याकडे नाही आणि अशा लोकांना कडक दंड होतात म्हणून.
आमच्या बिल्डिंग मधेही असे लोक आहेत, घराच्या बाल्कनी मध्ये कपडे धुतात. आणि असं करू नका सांगितलं कि तुम्हाला काय करायचं म्हणून भांडण करतात. मनस्ताप करून घ्या आणि गप्पा बसा. नियम , संस्कार खरच खूप महत्वाचे आहेत.
केलेत ना वर्गीकरण ? यालाच
केलेत ना वर्गीकरण ? यालाच म्हणतात ब्राह्मणत्व!!
आण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्णा !
लेख चान्गला विचारप्रवर्तक
लेख चान्गला विचारप्रवर्तक आहे. निवडक दहा मधे नोन्दविला आहे.
यातिल मुद्यान्वर बरेच चिन्तनमनन/सिंहावलोकन/वर्तमान स्थितीचा अभ्यास असे करावे लागणार आहे.
>>>>यात ज्यांना कांहीच गैर
>>>>यात ज्यांना कांहीच गैर दिसत नाही अशांना तुम्ही उत्तरे देण्यात शक्ती खर्च करू नका. <<<
अगदी बरोबर. मात्र अशा मूलगामी लेखामुळे "ब्राह्मणान्चा" त्यान्च्याच "बामणी संस्काराबद्दलचा" गेल्या पाचपन्चवीस वर्षातच निर्माण झालेला न्यूनगण्ड कमी झाला तरी चांगले झाले असे मी म्हणेन.
वि.सू: हे बामणी संस्कार कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती हवे असल्यास स्वतःमधे आत्मसात करू शकते. त्यावर कसलेच बन्धन नाही.
मला असे वाटते की ब्राह्मण
मला असे वाटते की ब्राह्मण वगैरे उल्लेख मायबोलीवर जरा जास्तच होत आहेत. त्याची इतकी गरज आहे का? आजकाल जातीचा कुठे काही प्रश्न येतो? ब्राह्मणांच्या बाजूनेही किंवा विरोधीही लिहिण्याची गरज का भासत आहे?
जेव्हा तांत्रिक प्रगती झालेलीच नव्हती अशा पुराणकाळातील वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वास हे ऋषीमुनी कोठे विधी करायला बसायचे हा विचार का करू नये? जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमचा होता ही म्हण जशी अस्तित्वात आहे तशी जन्माला येताना पार्श्वभागी कमोड घेऊन आला असे म्हणावे काय?
-'बेफिकीर'!
>>>> जेव्हा तांत्रिक प्रगती
>>>> जेव्हा तांत्रिक प्रगती झालेलीच नव्हती अशा पुराणकाळातील वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वास हे ऋषीमुनी कोठे विधी करायला बसायचे हा विचार का करू नये? <<<<
खर तर करू नये, पण आजकालची "बहुसन्ख्य" लोकं तोच विचार जास्त करतात. अन बहुसंन्ख्य लोक विचार करतात म्हणून त्या विचारान्ना बहुसान्ख्यिक "प्रतिष्ठाही" प्राप्त होते. पण....
"आम्ही" मात्र, पुराणकाळातील वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वास हे ऋषीमुनी कोठे विधी करायला बसायचे या विचारा ऐवजी, आज २०११ मधे, भले आम्हाला उभ्या आयुष्यात अन्तराळात जायची वेळ येणार नसेल तरीही अन्तराळवीर कोणत्या कमोडचा कशाप्रकारे वापर करीत असतील यावर विचार करतो. हाच तो फरक, बरे का बेफिकीरभौजी!
>>>>मला असे वाटते की ब्राह्मण वगैरे उल्लेख मायबोलीवर जरा जास्तच होत आहेत. त्याची इतकी गरज आहे का? आजकाल जातीचा कुठे काही प्रश्न येतो? ब्राह्मणांच्या बाजूनेही किंवा विरोधीही लिहिण्याची गरज का भासत आहे? <<<
योगायोग बघा, आजच ५ डिसेम्बर, २०११ रोजी, रेडीओ वर पुणे स्टेशन लावले असता, सकाळी सातच्या बातम्यानन्तर, दिल्या जात असलेल्या "सरकारी बौद्धिकामधे", सर्वज्ञ वक्ता, डॉ. बाबासाहेब आम्बेडकरान्च्या १९४०-५० मधिल भाषणान्चा दाखला देऊन सान्गत होता की, बाबासाहेब भाषणात असे विचारायचे/सान्गायचे की, तुमची बाई जर गरोदर झाली तर कोणत्या म्युन्सिपालटीत झाडुवाल्याची जागा रिकामी होणार याची स्वप्ने बघते, तर ब्राह्मण बाई कुठली कलेक्टरची जागा रिकामी होणार ही स्वप्ने बघते, हा फरक समजुन स्वतःची विचारसरणी/राहणीमान बदला.
उघड उघड, सरकारी माध्यमातून इसवीसन १९४०-५० मधिल भाषणान्चा सम्दर्भ देत २०११ मधे म्हणजे तब्बल पन्नास-साठ वर्षान्नी देखिल, तेच ते संदर्भ देत देत, "ब्राह्मण जातीचा" नुस्ता सु:स्पष्ट उल्लेखच करुन नव्हे तर ब्राम्हणी बायकान्च्या गरोदरपणातील स्वप्नान्विषयी जणूकाही त्यान्च्या मनात डोकावुन बघितल्याप्रमाणे त्याचिही चर्चा करीत, ब्राह्मणत्वाची तुलना होत असेल, तर इथे मायबोलीवर ब्राह्मण संस्कार/नियमान्ची चर्चा केली तर बिघडले कुठे बेफिकीरभौजी?
गेल्या पन्नाससाठ वर्षात, बाबासाहेबान्नी, ब्राह्मण गरोदरबायान्च्या मनात प्रवेश करुन गरोदरपणात (वा एरवीही सदासर्वकाळ) त्या यच्चयावत बायका बघत असलेली स्वप्ने समजुन घेऊन ज्या समाजाला तशीच/तशाच प्रकारे स्वप्ने बघायला सान्गितली, ती बघितली गेली की नाही हा वेगळा विषय, पण यावरुन हेच सिद्ध होते की बाबासाहेबान्ना ब्राह्मणी संस्कारान्चे व त्यान्चे अनुकरण करण्याचे महत्व जे जाणवले, जे त्यान्नी उघड माण्डले, त्या विशिष्ट "बामणी संस्कारान्चे" काय हो? इथे त्यावर चर्चा केली तर बिघडले कुठे? ज्यान्ना ते घ्यायचे ते घेतिल, न पेक्षा बाबासाहेबान्चे अपरोक्ष, त्यान्नी जी सूत्रे मान्डली नेमके त्याचे विरुद्ध वागत, गेली पन्नास साठ वर्षे जसे केले तसेच त्या संस्कारान्ना नाके मुरडत व मुठी आवळत त्याच्या विरुद्धच बोलत रहातील, .
तुमच्यापर्यन्त हे विषयच पोचले नस्तील बेफिकीरभौजी, तर मला असे म्हणावे लागेल की तुम्ही भारतात रहात नसून "इन्डीयास्थित अमेरिकेत/युरोपात" रहाता आहात. यदाकदाचित तुमच्यावर तुमच्या त्या इन्डियास्थित अमेरिकेतुन बाहेरपडून भारत/हिन्दुस्थान देशात जमिनीवर पाय लावायची वेळ आली, तरच कदाचित तुम्हाला गरज वगैरे भासेल. असो.
बायदिवे, इथे कुणीही, अजुनपर्यन्त तरी, अन निदान धागाकर्त्याने तरी, ब्राह्मणांच्या बाजूनेही किंवा विरोधीही लिहीलेले नाहीये. तो फक्त वस्तुनिष्ठ गुणवैषिष्ट्ये सान्गु पहातोय. त्यास हरकत का असावी? अन ती देखिल, जेव्हा आज २०११ रोजी, रेडिओ या सरकारी माध्यमात देखिल सान्गत असता?
[सालं ते इन्डीयास्थित अमेरिका/युरोप नेमक पेठेच्या पलिकडील नदीपल्याड कोथरुड/जिमखाना किन्वा इकडे कोरेगावपार्क/कल्याणीनगर भागातच आहे! लईच जवळ आहे ]
लिंबूभौ, ब्राह्मण या विषयावर
लिंबूभौ,
ब्राह्मण या विषयावर बहुधा अलीकडेच कोणतातरी धागा आला होता म्हणून मी तसे म्हंटले. बाकी प्रगतीशील विचार करणे हे तर जिवंत समाजाचे लक्षण आहे हे खरेच आहे! मूळ लेखात लेवा पाटलांचे जे उदाहरण दिलेले आहे तेही पटण्यासारखेच! पण त्याला ब्राह्मण - ब्राह्मणेतर रंग दिला गेला हे काहीसे नवलाईचे वाटले. आपण ज्या रेडिओवरील भाषणाबाबत म्हणत आहात ते आजही प्रकाशित होणे खचितच विस्मयजनक आहेच. पण 'माझ्यापर्यंत हे विचार पोचले नसतील तर ......' हा आपला पॅरा अनावश्यक व वैयक्तीक वाटला, मला तरी! त्यावर भाष्य करणे हे धागा भलतीकडे नेणारे ठरेल म्हणून थांबणे योग्य!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
>>> पण 'माझ्यापर्यंत हे विचार
>>> पण 'माझ्यापर्यंत हे विचार पोचले नसतील तर ......' हा आपला पॅरा अनावश्यक व वैयक्तीक वाटला <<<<
कृपया त्यात वैयक्तिक अर्थ शोधू नये, कारण तुमच्या वरील पोस्ट सारखाच विचार करणारे असंख्यजण असतात, त्या सर्वान्ना उद्देशून तो प्यारा आहे. माझ्या नजरेसमोर केवळ "बेफिकीर" ही आयडी वा त्या आयडीमागिल एकच एक व्यक्ति नसून, इन्डियास्थित अमेरिका/युरोपवासियान्ची फौजच्या फौज आहे.
माझा जन्म एका ब्राम्हणाच्या
माझा जन्म एका ब्राम्हणाच्या घरात झाला होता, आडनाव रानडे म्हणून मी ब्राम्हण ठरलो होतो. तो माझा दोष कसा होता? मला माझे डोके चांगल्या प्रकारे वापरता येते हा दोष का व कोणी ठरवला?
म्हणजे बामण नसलेल्यांची डोकी वाकडी चालतात की काय? रा-वन तसे रा-नडे
>>>> म्हणजे बामण नसलेल्यांची
>>>> म्हणजे बामण नसलेल्यांची डोकी वाकडी चालतात की काय? <<<<
जामोप्या, तू सगळ्या पोस्टी वाचत चल बघु. अन डोक्याला पक्षी मेन्दूला थोडा वैचारिक ताणही देत जा, घाबरू नकोस, येवढ्या तेवढ्या ताणाने मेन्दू काही लगेच फुग्यासारखा फुटत नाही.
माझ्या वरल्या पोस्टीत उदाहरणच दिले आहे की बामण गरोदर बायका त्यान्ची "डोकी चालवित कसली स्वप्ने बघायच्या/बघतात" ते स्वतः बाबासाहेबान्नीच सान्गितलेले आजच रेडिओ पुणे स्टेशनवर सान्गत होते. आता इतके सान्गूनही, तू पुन्हा आपल येरे माझ्या मागल्याप्रमाणे मूलभूत प्रश्णच विचारतोस? हे कशाचे द्योतक बरे?
मी थोडे विषयांतर करतो... चार
मी थोडे विषयांतर करतो...
चार पुस्तके शिकलेली लोकं (वरिल कथे मधे मुख्याध्यापक) नियम, स्वच्छता यांचे पालन करणार नसतील तर आपले शिक्षण जबाबदार नागरिक घडवत नाहीत याचे वैषम्य वाटायला हवे. जात या विषयावर चर्चा होण्यापेक्षा आपण असे का होते, कुठे चुकत आहे हा विचार करणे जास्त महत्वाचा आहे असे वाटते.
जेव्हा तांत्रिक प्रगती झालेलीच नव्हती अशा पुराणकाळातील वसिष्ठ, विश्वामित्र, दुर्वास हे ऋषीमुनी कोठे विधी करायला बसायचे हा विचार का करू नये?
---- त्याने काय साधणार आहे? त्या काळातील लोकसंख्या नक्कीच १२० कोटी पेक्षा कमी होती (परवडणारे असेल कदाचित :स्मित:)... रोगांचा प्रसार झपाट्याने होण्याचे उघड्यावर शौचाला बसणे हे महत्वाचे कारण आहे असे विज्ञान सांगतो... शिकलेल्यां समाजाकडुन स्वच्छतेच्या धड्यांची अपेक्षा करायची नाही तर मग कोणाकडुन?
अनारोग्याच्या सवयी सगळीकडे
अनारोग्याच्या सवयी सगळीकडे असतात.. बामणांच्यामध्येही दारुडे, बिड्या ओढनारे, तंबाखू खाणारे असे असतीलच की... मग एखाद्या अब्राह्मण माणसाने आपल्या शेजारचा माणूस अशा सवयींचा आहे आनि त्याचा संबंध ब्रह्माणत्वशी जोडला तर चालेल का? रस्त्यावर हागणे आणि ब्राह्मण नसणे यांचा काय संबंध? पण अब्राह्मण म्हणजे अस्वच्छ हे जाणून बुजुन मार्क करण्यासाठी असले लेख पाडले जातात.
>>>> बामणांच्यामध्येही
>>>> बामणांच्यामध्येही दारुडे, बिड्या ओढनारे, तंबाखू खाणारे असे असतीलच की... मग एखाद्या अब्राह्मण माणसाने आपल्या शेजारचा माणूस अशा सवयींचा आहे आनि त्याचा संबंध ब्रह्माणत्वशी जोडला तर चालेल का? <<<<
जामोप्या, तसा संबंध जरुर जोडा, पण त्यामुळेही, अपवादानेच नियम सिद्ध होतो असे कळून येईल तुम्हाला!
आजही, पुण्यासारख्या "सुधारलेल्या" शहरातही चार जाणत्या ब्राह्मणात, काही नालायक ब्राह्मण जर मांसाहार/मदिरापान/वेश्यागमनाचे समर्थन करु लागले तर त्या नालायक ब्राह्मणास "वाळीत टाकल्याप्रमाणेच" खड्यासारखे बाजूला ठेवले जाते. अशा ब्राह्मणास, तो ब्राह्मण असला तरीही घरात प्रवेश दिला जात नाही. भीडभीकेची बहीण म्हणून समजा तोन्डावर कुणी काही बोलले नाही, तरी अमक्यातमक्या बेवड्याची जागा योग्य त्या ठिकाणी दाखविली जातेच जाते. इतकेच नव्हे तर अशा प्राण्याच्या बायकापोरान्ना देखिल त्याची झळ पोहोचते.
>>>> रस्त्यावर हागणे आणि ब्राह्मण नसणे यांचा काय संबंध? <<<<
उदाहरणातूनच सान्गतो, नुकतेच आंबेजोगाईला कुलस्वामिनीचे दर्शनास यस्टीने जाण्याचा योग आला होता. वाटेत कडा आष्टी माजलगाव का कोणशीशी गावे लागली, सलग प्रवासात अर्थातच लघवीस लागणे हे ओघानेच आले. मी पुरुष असल्याने कितीही घाण मुतारी असली तरी "उभ्या उभ्या" उरकू शकत होतो. माजलगाव की कोणच्याश्या स्टॅण्डवर, स्त्रीपुरुषान्करता स्वतंत्र मुतार्यान्ची सोय होती. आधीच्या स्टॅण्डवर देखिल होती, पण सर्वत्र अ:स्वच्छतेचे साम्राज्य असल्याने तिथे जाण्याचे धाड्स लिम्बीचे झाले नव्हते. माजलगाव स्टॅण्डवरही झाले नाही. पण एक अचंबित करणारे दृष्य तिथे दिसले, त्या मुतारीच्या बाहेरच्या बाजुलाच उघड्यावरच काही स्त्रीया देहधर्म उकरुन घेत होत्या, स्टॅण्डवरील गर्दी तशीच, अन त्या गर्दीच्या नजरेच्या टप्प्यात त्या स्त्रीयान्ना (लाजलज्जा गुन्डाळून ठेवून) करावे लागणारे मूत्रविसर्जन या परिस्थितीने मस्तकात खर तर तिडिक उठली होती.
लिम्बीला मी सुचविले देखिल, की तिथे काही स्त्रीया गेल्यात, तिथे जा, कॉन्ग्रेसगवताचा आडोसा पकड. पण त्या महान कॉन्ग्रेसगवताच्या आडोशाचा उपयोग नव्हता कारण आडोशाच्या जागी आधीच मानवी मलमुत्राची इतकि घाण होती की आडोसा सोडून उघड्यावरच त्या कमनशिबी स्त्रीयान्ना कार्यभाग उरकावा लागत होता. माझी मान पराकोटीच्या शरमेने, सन्ख्यात्मकबळापुढे निर्बली होत असलेल्या आमच्या अल्पसन्ख्यान्च्या "अल्पसन्ख्य म्हणून आलेल्या षंढत्वाच्या" जाणिवेने खाली गेली होती.
मूद्दा असा की लिम्बी तिथे तशी उघड्यावर नाही ती नाहिच गेली. तब्बल तेरा तासान्चा प्रवास तिने तसाच सहन केला, पण, शारिरीक गरज पडलीच्चे, सगळेजण जातायतच्चेत तर आपणही गेले तर काय बिघडले, इथे कुणी बघितले तरी काय बिघडले ते पुण्यात थोडीच सान्गायला येणारेत? अन तसही पाठमोरच्च तर बसायचहे, पुरूषान्नी उभ्या उभ्या तन्गड्या फाकवुन उघड्यावर धार सोडली तर चालते मग बायकान्नीच का नको, वगैरे वगैरे अनेकानेक विचारान्ना मनात / बुद्धित थाराही न देण्यामागे तिच्यावरील ब्राह्मणी संस्कारच कारणीभूत होते असे नाही का म्हणता येणार?
मात्र वरील उदाहरणातील त्या स्त्रीयान्ची मला दयाच येते, बिचार्या, एकवीसाव्य्या शतकात देखिल, किमान मूलभूत गरजेपासूनही वन्चित!
विनायक... उघड्यावर संडासला
विनायक... उघड्यावर संडासला बसणे हा प्रकार चुकीचाच आहे पण तो जातीच्या चष्म्यातुन न बघता सार्वजनीक स्वच्छता किंवा सार्वजनीक आरोग्य या नजरेतुनच बघायला हवा..
प्रत्येक गोष्ट मग ती शिक्षण असो नाहीतर सार्वजनीक स्वच्छता .. या गोष्टीला जातीयतेचे चष्मे लावणे ही अत्यंत चुकीची आहे..
बाकी ब्राम्हण आणी फक्त त्यांचेच उच्च संस्कार या विषयावर बोलायला लिंबुदा आहेतच..:)
तिच्यावरील ब्राह्मणी संस्कारच
तिच्यावरील ब्राह्मणी संस्कारच कारणीभूत होते असे नाही का म्हणता येणार?
अस्वच्चतेचा तिटकारा किंवा स्वच्चतेची आवड. असे म्हणा, ब्राह्मणी संस्कार यांचा काय संबंध? आणि पुरुष अशावेळी उघड्यावर धार सोडतात की! मग ब्राह्मण पुरुष अन स्त्रीया यांच्यामधील ब्राह्मनत्व वेगळेवेगळे अस्ते का?
>>>> आणि पुरुष अशावेळी
>>>> आणि पुरुष अशावेळी उघड्यावर धार सोडतात की! मग ब्राह्मण पुरुष अन स्त्रीया यांच्यामधील ब्राह्मनत्व वेगळेवेगळे अस्ते का? <<<<<
नाही, सारखेच अस्ते. माझ्या पहाण्यात (माझ्यासहित) आजवर एकही ब्राह्मण पुरुष आलेला नाही जो भर गर्दीची लाजलज्जा न बाळगता, आडोशाविना सर्वान्समक्ष मलमूत्रविसर्जन करत बसेल. अन असा कोणी असेलच, तर त्यास बामणी संस्कारांच्या कानपिचक्या मिळतातच, तरीही सुधारला नाहीच तर फटके देखिल दिले जातात, त्यातुनही सुधारला नाही तर न बोलता जातीतुन बहिष्कृत केले जाते.
पन्चवीसेक वर्षान्पूर्वी माझ्यावर वेळ आली नी मी अगदी भर नरिमनपॉईण्टवरदेखिल भर दूपारचे वेळेस मूत्रविसर्जन केलय, पण तरीही ते ट्रक/बसचा आडोसा शोधून! गर्दीचे नजरेसमोर राजरोसपणे नाही! व ते एकदाच केले आयुष्यात, तरी त्याच्या अपराधीपणाची बोच अजुनहि मनात आहे. हाच तो फरक.
माझ्या पहाण्यात (माझ्यासहित)
माझ्या पहाण्यात (माझ्यासहित) आजवर एकही ब्राह्मण पुरुष आलेला नाही जो भर गर्दीची लाजलज्जा न बाळगता, आडोशाविना सर्वान्समक्ष मलमूत्रविसर्जन करत बसेल
आणि जे नजरेत आले, ते सगळे अब्राह्मण होते कशावरुन? त्यांच्या कानाला जानवी नव्हती म्हणून..?
असो. ब्राह्मण हे स्वच्च सवयीचे असतात, असे मान्य करुन हा वाद आता संपवा. रा-नड्यांचे काय ते लेवा पाटिल बघून घेतील.. आपण कशाला वादात पडायचं?
>>>> बाकी ब्राम्हण आणी फक्त
>>>> बाकी ब्राम्हण आणी फक्त त्यांचेच उच्च संस्कार या विषयावर बोलायला लिंबुदा आहेतच.. <<<<
रामभौ, मी तर आहेच हो (पाचवीला पूजलेला ), पण मीच नाही, मी अपुरा पडलो तर माझ्याहून कितीतरी जास्त अभ्यासू/शिकलेले आहेत.
कालचीच गोष्ट, पुण्यात गेलेलो, परतताना कोथरुड बस स्टॅण्डवर बस पकडली, ती भरुन आलेली होती, अन नेहेमीप्रमाणेच, पुढील बाजुच्या डावीकडील स्त्रीयान्करता राखिव जागान्वर ठोम्ब्ये पुरुष बसलेले होते.
थोरली म्हणाली, बाबा, त्यान्ना उठवायचे का? (बघा हं, तिने मला आधी विचारलन परवानगी की उठवायच का त्यान्ना, ही परवानगी विचारण हा देखिल संस्कारच बर्का! )
मी क्षणभरच विचार केला, अन तत्काळ तिला मोठ्यानेच उत्तर दिले की, "बाईग, आपण या असल्या धेडगुजरी "रिझर्वेशन्सवर" देखिल विश्वास ठेवत नाही, त्यावर अवलम्बुन रहात नाही, अस्ल्या रिझर्वेशन्सच्या देखिल वाटेला जात नाही." थोरलीला ते तत्काळ पटले. आता हा चारभिन्तीच्या आड दडून नव्हे तर अगदी उघड उघड चारचौघात येताजाता केला गेलेला बामणी संस्कारच नव्हे काय?
बाकी कुणाकुणाला, आता पुढचा निलाजरा तद्दन पुरषी प्रश्न काय पडेल ते सान्गू? अर्थात त्यान्ना तो नै पडला तरच नवल. "स्त्रियान्करता बसमधिल राखिव जागा नै चालत तुम्हाला, अन स्त्रियान्करताच्या राखिव मुतार्यान्ची बरे मागणी कर्ता?" हाच ना प्रश्न वळवळतोयना अनेक रेम्या डोक्यात?
लिंबूमहाराज, उघड्यावर शौचस
लिंबूमहाराज, उघड्यावर शौचस बसण्याचे संस्कार जातिनिहाय बदलतात असे तुमचे म्हणणे दिसतेय.
सार्वजनिक जागी थुंकण्याबद्दल काय म्हणाल? उत्तर पेशवाईत विशिष्ट जातीच्या लोकांनी आपली थुंकी टाकण्यासाठी गळ्यात मडके बांधून फिरावे असे संस्कार केले जायचे म्हणे. बाकीच्या जातीच्या लोकांची थुंकी झेलण्याचे संस्कारही त्यांच्यावर केले जायचे का याबद्दल आपले संशोधन काय म्हणते?
मयेकर साहेब, मी २०११ मधले
मयेकर साहेब, मी २०११ मधले बोलतोय! आजच्या रेडिओवरील बाबासाहेबाच्या ब्राह्मणी स्त्रीयान्च्या गरोदरपणातील स्वप्नान्च्या अनुकरण करण्याविषयी केलेल्या भाष्याबद्दलही काही तरी बोला की हो! हे काय ज्या प्रथा बन्द पडल्यात्/पाडल्या गेल्यात त्याबद्दल घुबडाचा खडा उगाळता आहात.
(अर्थात, ती प्रथा चूकच होती, अन तरीही, संदेशवहनाच्या आजच्या इतक्या सोईसुविधा नसतानाही काही वर्षान्चे अवधीत सर्वदूर महाराष्ट्रात तशी ती प्रथा पडून आचरणात का आणली गेली असावी यावरही संशोधन तुम्हीच करावे मयेकर साहेब. फक्त ती टीपिकल "ब्राह्मणी अत्याचारान्ची पुन्गी वाजवू नये" कारण या प्रथान्ना ब्राह्मणेतर उच्चवर्णीय देखिल तेव्हाही व आजही तितकेच जबाबदार होते/आहेत.)
आपल्याला अमक्या जातीत जन्म
आपल्याला अमक्या जातीत जन्म मिळाला त्यामुळे हे भोग आपल्याला भोगावे लागणार असा एक संस्कार अजूनही असतो. यात बाई हीदेखील एक जातच मानली जाते. त्या संस्काराला उत्तर म्हणून बाबासाहेबांनी दिलेले उदाहरण आहे ते. ब्राह्मण स्त्री आपल्या होणार्या अपत्याचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार करते, तुम्ही करा असे म्हटले तर वावगे काय ते कळले नाही. की इतिहासातल्या काही काही गोष्टींबद्दल्च बोलायचे नाही आणि सोनेरी पाने तेवढी पारायणास घ्यायची असे आहे?
वर तुम्ही रिझर्व्हेशनबद्दल लिहिलेत. भारतात रेल्वे सुरू झाली तेव्हा ब्राह्मणांसाठी एक डबा रिझर्व्ह ठेवावा (संध्या करताना सोवळे ओवळे पाळावे लागते त्यासाठी हो) अशी मागणी झाली होती म्हणे.
उघड्यावर शौचास बसण्याबद्दल : वास्तु'शास्त्रा'नुसार शौचकूप घराच्या चार भिंतींत असणे योग्य नाही असा संस्कार ही वाचायला मिळतो कुठे कुठे.
सोनेरी पाने.??? .... आता हा
सोनेरी पाने.??? ....
आता हा बीबी बंद होणार !
डॉ. पाय कसा आहे? हा पाया पहा.
डॉ. पाय कसा आहे?
हा पाया पहा.
<<<आजही, पुण्यासारख्या
<<<आजही, पुण्यासारख्या "सुधारलेल्या" शहरातही चार जाणत्या ब्राह्मणात, काही नालायक ब्राह्मण जर मांसाहार/मदिरापान/वेश्यागमनाचे समर्थन करु लागले तर त्या नालायक ब्राह्मणास "वाळीत टाकल्याप्रमाणेच" खड्यासारखे बाजूला ठेवले जाते. अशा ब्राह्मणास, तो ब्राह्मण असला तरीही घरात प्रवेश दिला जात नाही. भीडभीकेची बहीण म्हणून समजा तोन्डावर कुणी काही बोलले नाही, तरी अमक्यातमक्या बेवड्याची जागा योग्य त्या ठिकाणी दाखविली जातेच जाते. इतकेच नव्हे तर अशा प्राण्याच्या बायकापोरान्ना देखिल त्याची झळ पोहोचते. >>>
हे वाचून मला पडलेले प्रश्न :
१) पुणासारख्या सुधारलेल्या शहरातही : म्हणजे मांसाहार, मदिरापान, वेश्यागमन यांचे समर्थन (इथे प्रत्यक्ष कृती केली की नाही ते कळायला मार्ग नाही) करणे हे सुधारलेपणाअचे लक्षण आहे असे चक्क लिंबूमहाराज म्हणत आहेत का? की चुकून बिघडलेल्या याजागी सुधारलेल्या असा शब्द पडला?
२) तो ब्राह्मण असला तरीही घरात रवेश दिला जात नाही :म्हणजे फक्त ब्राह्मणालाच घरात प्रवेश असतो का?
३) ब्राह्मणेतराने मांसाहार, मदिरापान, वेश्यागमन या गोष्टी केल्यास त्या क्षम्य किंवा योग्य ठरतात का?
पुण्यासारख्या "सुधारलेल्या"
पुण्यासारख्या "सुधारलेल्या" शहरातही चार जाणत्या ब्राह्मणात, काही नालायक ब्राह्मण जर मांसाहार/मदिरापान/वेश्यागमनाचे समर्थन करु लागले तर त्या नालायक ब्राह्मणास "वाळीत टाकल्याप्रमाणेच" खड्यासारखे बाजूला ठेवले जाते.
पेशवे, फडणवीस इतिहास वाचला नै की काय?
त्या श्लोकांचे उच्चार आम्हा भावंडांचे इतरांच्या तुलनेत जास्त स्पष्ट होते, आमचे पाठांतर देखील जास्त होते. हा सगळा संस्कारांचाच परिणाम होता.
समाजाला असा काय मोठा उपयोग झाला ब्राह्मणी पाठांतराचा? इतर जातीतल्या लोकाना बामणानी कधी देवलातच येऊ दिले नाही, आनि मग आमचे पाठांतर लई भारी म्हणून छाताड कशाला बडवून घ्यायचे?
Pages