१. गहू - दिड वाटी.
२. गूळ - २ वाट्या (चिरून घ्यावा)
३. वेलची पावडर - १ चमचा
४. दूध - २-३ कप
५. तूप - २ चमचे
६. बदाम, काजूचे काप
१. गहू स्वच्छ धुवून घ्यावेत.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात भिजवत ठेवावे. गव्हाच्या वर चार बोटे राहिल इतके पाणी घ्यावे.
४-५ तासांनंतर पाणी काढून टाकून गहू चाळणीत निथळत ठेवावे.
२. पाणी निथळल्यानंतर गहू मिक्सरमधून काढावेत, खूप बारीक करू नये, गव्हाचे दाणे मोडतील पण अगदी बारीक होणार नाहीत असे बघावे. (बारीक झाल्यास आणि त्यामुळे खीर रवाळ न होता तिचा लगदा झाल्यास, कसला चिकटगुंडा पदार्थ सांगितला असे माझ्या नावाने खडे फोडू नयेत...
)
३. मिक्सरमधून काढलेल्या गव्हात फक्त ते बुडतील इतके पाणी घालून कुकरला शिजवावे. ४ शिट्ट्यात चांगले मऊ शिजतात.
४. मग एका पातेल्यात शिजलेले गहू काढून घेऊन त्यात गूळ मिसळून घ्यावा. त्यात तूप, बदाम, काजू काप आणि दूध टाकून गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. गूळ विरघळल्यानंतर एक मस्त गोड वास येतो आणि एकजिनसी खीर तयार होते.
५. थोडी थंड होऊ द्यावी आणि मस्त मोठ्या बोलमध्ये घेऊन गट्टम करावी.... एकदम रुचकर... आत्मा तृप्त!!
माझी आई हिवाळ्यात हमखास ही खीर करते... मी या खीरीची पंखी आहे... मला ते खिरीचं पातेलं दिलं तर संध्याकाळपर्यंत काहिही शिल्लक राहणार नाही ही तिची खात्री....
काल या खिरीची प्रचंड आठवण आली.... मग लगेच आईला फोन केला, कृती विचारली आणि प्रयोगाला सुरूवात......
पहिल्यांदा वाटलं जो पदार्थ आजपर्यंत आपण मिटक्या मारत खाल्ला, तो जमेल की नाही... पण मग घेतलं देवबाप्पाचं नाव आणि आठवला आईच्या हातचा स्वाद अन लागले कामाला....
खीरीचा पहिला चमचा तोंडात घातला तेंव्हा म्हटलं... "शाब्बास रे मेरे पठ्ठे!!!!" अप्रतिम जमली होती....
अर्थात हे मी केली म्हणून मला वाटलं असं नाही , तर लहानपणापासून आईनं केलेल्या खिरीच्या चवीचा अनुभव असल्यामुळे वाटलं....
या खिरीत कोंड्याबरोबर गहू पोटात जातात हे एक आणि गूळ आणि गहू एकत्र शिजल्यावर जे अप्रतिम मिश्रण तयार होतं.... अगदी ब्रम्हानंदी टाळी..........
वि.सू. : ही खीर अगदी पातळ चांगली लागत नाही तसेच अगदी घट्टही.... थोडक्यात म्हणजे... थलथलीत.... हा योग्य शब्द!!!! म्हणूनच दूध कमी घातले आहे....
आमच्या घरी पण आईच करते.
आमच्या घरी पण आईच करते. पुर्वी गहू खलबत्त्यात कुटून करायची. पण आमच्याकडे नारळाचे दूध वापरतात.
आमच्या घरी पण आईच करते >>>
आमच्या घरी पण आईच करते >>> आई लोकांची खासियत!!!!!
पुर्वी गहू खलबत्त्यात कुटून करायची >>>>>>>>> माझी आज्जी करायची तशी....
हा एक फोटो...... रात्री
हा एक फोटो...... रात्री काढल्यामुळे तितकासा नीट नाही आला...
नारळाच्या दुधात नाही केली
नारळाच्या दुधात नाही केली तरी, नारळ घालतात ना या खिरीत. आणि गुळ असला की थोडे जायफळ छान लागते
फोटो अगदी तोंपासू. मलाही फार
फोटो अगदी तोंपासू. मलाही फार आवडते.
या खिरीसाठी खपली गहू(च) लागतो ना?
जाडा दलिया वापरुन करते ही खीर
जाडा दलिया वापरुन करते ही खीर मी. चव तशीच लागते का कल्पना नाही. पण मुलींना खूपच आवडते. हिवाळ्यात बेस्ट. त्यात थोडे खजुराचे तुकडे टाकायचे शेवटी शेवटी. जास्त नाही शिजवायचे. मस्त लागतात.
याला हुग्गी म्हणतात
याला हुग्गी म्हणतात
सर्वांना धन्यवाद! गुळ असला की
सर्वांना धन्यवाद!
गुळ असला की थोडे जायफळ छान लागते >>> ह्म्म........ आरती, आता पुढच्या वेळी करेन तेंव्हा टाकून बघेन...
या खिरीसाठी खपली गहू(च) लागतो ना?>>>>> प्राची, घरी तर खपलीच वापरते आई, मीही तोच वापरला होता, दुसरया कोणत्या गव्हाची करून नाही पाहिली कधी....
जाडा दलिया वापरुन करते ही खीर मी >>> छान variation आहे, करून पहायला हवं. पण जी फक्त मोडलेल्या गव्हाची चव आहे तशी येईल का नाही माहित नाही.
हिवाळ्यात बेस्ट >>> होय शर्मिला....... माझी हिवाळ्यातली fav dish आहे ही खीर....
याला हुग्गी म्हणतात>>>> जामोप्या, माहितीबद्दल धन्यवाद.
मस्त आहे. . मी पण दलियाची
मस्त आहे. :). मी पण दलियाची अशीच करते.
चिकटगुंडा >>> मी लापशी विकतच
चिकटगुंडा >>>
मी लापशी विकतच घेते मग खीर करते
मला खुप आवडते .. नुसती खायला
चपाती भाजी नसेल तरी चालेल
दूध आणि गूळ एकत्र केल्यावर
दूध आणि गूळ एकत्र केल्यावर नासणार नाही. मागे मी केली तेव्हा दूध नासले होते.
धन्यवाद मवा,
धन्यवाद मवा, प्रितीभुषण...
मला खुप आवडते .. नुसती खायला चपाती भाजी नसेल तरी चालेल>>>> मलाही....
दूध आणि गूळ एकत्र केल्यावर नासणार नाही >>> नीतु , नाही नासत दूध. तूप पण टाकलेलं असतं ना.
यात सुके खोबरे खिसुन घालतात,
यात सुके खोबरे खिसुन घालतात, विशेषतः कर्नाटकात.. http://www.maayboli.com/node/25763?page=1
दूघ घातल्यावर नासेल असे वाटत असेल, तर बिन दुधाची करा आणि खायच्या वेळी गरम दूघ घाला.