क्रॅनबेरी सॉस

Submitted by आरती on 10 November, 2011 - 11:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४०० ते ५०० ग्रॅम फ्रेश क्रॅनबेरी
१ वाटी साखर
१ वाटी संत्र्याचा रस
१ सफरचंद
१ वाटी dried फ्रुट्स [ऐच्छिक]
१/२ चमचा दालचिनी पूड
१/२ चमचा जायफळ पावडर
१ वाटी पाणी.

क्रमवार पाककृती: 

१ वाटी पाणी पॅनमधे घेऊन त्यात साखर घालावी. निट हलवून, साखर वितळेपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवावे. साखर वितळल्यावर गॅस बरीक करून क्रॅनब्रीस, संत्र्याचा रस, [साल काढुन, बारीक तुकडे केलेले] सफरचंद, बारीक तुकडे करुन dried फ्रुट्स, दालचिनी पूड,जायफळ पावडर सगळे पॅन मधे टाकावे. नीट हलवून झाकण घालावे. क्रॅनबेरीस फुटल्याचा आवाज येत राहतो [बबल रॅप सारखा]. हा आवाज बंद झाला की झाकण काढून ५ ते १० मिनिट अजून थोडे पाणी अटू द्यावे. गॅस बंद करून रूम टेम्परेचरला गार करावे.

Kranberry sos.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

अमेरिकन लोक कशाबरोबर खातात माहिती नाही. पण एकूण त्याची चव बघता, ब्रेड / पोळी बरोबर खाता येईल.
Dessert मधे वापरता येईल.
आईस्क्रीम बरोबर पण फ्लेवर बदलायला वापरता येईल.
नुसते पण छान लागते आहे. Happy
हे thanks giving ला करतात असे वाचले. त्याचे खास कारण कुणाला माहिती असल्यास सांगावे.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट + थोडासा बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतेय रेसिपी. मी चटणी घरी करते. सॉस मात्र कॅन मधलं वापरते. होलबेरीज वालं सॉस घालून मफिन्स मस्त होतात. टर्की किंवा चिकन सँड्विचमधे पण चांगले लागते.

आरती, छान आहे रेसीपी. हे Thanks Giving ला करण्याचं कारण cranberries ह्या सीझनलाच येतात हे असू शकेल. टर्की ला तशी स्वतःची काही चव नसते. स्टफींग बरोबर शिजवून देखील तशी रुखीसूखीच राहते. म्हणूनच त्या बरोबर हा आंबटगोड ओलसर सॉस खाण्याची पध्दत असावी.
आपल्याकडच्या traditional रेसीपीज जशा seasonal and environmental availability and requirement of ingredients वर अवलंबून असतात अगदी तसच इथे पण असावं. Thanks Giving चा नैवेद्य, पंपकीन पाय, आणि हा वरचा क्रॅनबेरी सॉस ही ह्याची उत्तम उदाहरणं.

मी तर ह्या cranberries ची आमसूलासारखी चटणी करते. cranberries + थोडं जीरं + आलं + थोडसं ओलं खोबरं ( मिळून यायला ) + हिरव्या / लाल मिरच्या आवडीप्रमाणे + मीठ + साखर हे सगळं वाटायचं. छान लागते.

क्रॅनबेरी सॉस मध्ये सफरचंद असतं का ? की हा तुझा स्वेच्छा बदल आहे ?

ता.क - खाली दिलेली कृती वाचल्यावर हे कळले की यात सफरचंद असतेच. माझा या सॉस बरोबर संबंध फक्त 'चँडलर ने केलेला तोच सॉस' एवढाच असल्याने असा प्रश्न विचारण्यात आला Happy

धन्यवाद शुगोल, सविस्तर माहिती साठी. तुझ्या पद्धतिने चटणी करुन बघायला हवी एकदा.
लालू ची पण वेगळी आणि छान आहे Happy

यात सफरचंद असतेच. >> थिकनेससाठी वापरत असावे.

छान रेसिपी.
रोस्टेड डक किंवा रोस्टेड टर्की सारख्या डिश मधे वरुन घालायचा सॉस म्हणुन वापरलेली पाहिली आहे.