मँगो पल्प- १ कॅन,
हेवी क्रिम- हाफ पाईंट (२३६.५ मिली),
अनफ्लेवर्ड/ ऑरेंज जेलो- २ पॅकेट्स,
साखर- १ कप्,
क्रीम चीज- १ (८ औंस),
वॅनिला इसेन्स- १ टीस्पून (ऑप्शनल),
कोमट पाणी- १/४ कप.
ग्रॅहम क्रॅकर क्रस्ट- २
१. हेवी क्रीम पॅनमध्ये उकळवायला ठेवा.
२. जिलेटिन्/जेलो कोमट पाण्यात कण रहाणार नाहीत अशाप्रकारे मिक्स करुन घ्या.
३. हेवी क्रीम आणि जिलेटीन ब्लेंड करुन घ्या.
४. ह्यात क्रीम चीज आणि साखर मिसळून घ्या आणि पुन्हा ब्लेंड करुन घ्या.
५. मँगो पल्प ब्लेंडरला हळूहळू घालत बीट करुन घ्या. अशा तर्हेने पूर्ण मँगो पल्पचा कॅन संपवा.5)Pour the mango pulp turn by turn into the blender and beat it, until the whole can of mango pulp is finished.
६. ह्या बीट केलेल्या मँगो पल्पमध्ये वॅनिला इसेन्स घालून पुन्हा मिनिटभर बीट करुन घ्या.
७. हा पूर्ण पल्प ग्रॅहम क्रॅकर क्रस्टवर घालून साधारण ७ तास फ्रिजमध्ये ठेवा
मी स्वतः केलेला नाही. मैत्रिणीने केलेला खाल्ला आहे. त्यामुळे बाकी काही बदल, सूचना सुचवता येत नाहीत,
यापैकी साखर, कोमट पाणी फक्त
यापैकी साखर, कोमट पाणी फक्त एवढेच माहीत आहे..
अमेरिकेतले घरी करायच्या
अमेरिकेतले घरी करायच्या डेझर्टसपैकी फेमस डेझर्ट आहे हे
माझ्या आत्येसाबांनी सांगितलेली रेसिपी : ८ औंस क्रीम चीज
१६ औंस सावर क्रीम
१ कॅन मँगो पल्प
३ कप पाणी
२ कप साखर
१ पॅकेट ( ज्यात ४ सॅशे असतात ) अनफ्लेवर्ड जिलेटीन.
पाणी उकळवून त्यात साखर आणि जिलेटीन विरघळवून घेणे
सावर क्रीम + क्रीम चीज + मँगो पल्प एकत्र ब्लेंड करुन घेणे
त्यात हळूहळू जिलेटीनचे पाणी घालत ढवळून घेणे
८'८" च्या तयार पाय क्रस्टमध्ये ओतून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणे किंवा ग्रॅहम क्रॅकर बिस्किटांचा चुरा + बटर + साखर असे केकपॅनमध्ये पसरवून स्वतः क्रस्ट बनवणे. वरील मिश्रणात तीन पाय क्रस्ट भरतात म्हणजे २४ तुकडे होतात.
मी केलेले बदल : कधीकधी अर्धे सावर क्रीम + अर्धे हेवी क्रीम वापरले आहे. हेवी क्रीम गरम वगैरे काही केले नाही. वरील कॄतीप्रमाणेच एकत्र ब्लेंड केले.
भारतात करायची असेल तर बदल : मारी बिस्किटांचा चुरा + वितळवलेले लोणी + चवीनुसार साखर असे एकत्र करुन केकपॅनमध्ये दाबून पसरुन बसवावा. अवनमध्ये १८० से. ला आठ-दहा मिनिटे बेक करावा किंवा नुसताच फ्रीजमध्ये गार करुन सेट होऊ द्यावा ( दोन्ही चांगलेच लागते ) खरं तर हा पार्ट पूर्णपणे गाळून फक्त वरचे मिश्रण खाल्ले तर मँगो पुडिंग होते आणि अतिशय उत्तम लागते. मी एकदा पन्नास जणांच्या पार्टीला करुन नेले होते.
अमूलचे हेवी क्रीम
अनफ्लेवर्ड जिलेटीन चार सॅशे = २८ ग्रॅम्स
क्रीमचीजऐवजी मीठ कमी असलेले किंवा नसलेले कुठलेले सॉफ्ट चीज नक्की वापरता येईल. मध्ये भारतात एक सॉफ्ट चीज क्यूब मिळायचा लेबॉन कंपनीचा. चवीला अतिशय सौम्य. तो वापरता येईल ( प्लेन फ्लेवर अर्थात ).
जिलेटीन असल्यामुळे फुलप्रूफ रेसिपी आहे ही आणि चवीला सगळीच व्हर्जन्स अतिशय सुंदर लागतात.
टीप : हे डेझर्ट बाहेरच्या ट्रिप्सना नेऊ नये. ती पन्नास जणांची पार्टी पार्कमध्ये होती आणि त्यावेळी हवा थंड होती. तरी थोडेसे ऊन त्यावर पडून ते चक्क वितळले. जनतेला चव इतकी आवडली की त्यांनी तरीही मँगो लस्सी म्हणून चवीचवीने प्यायले क्रस्ट केला नव्हता त्यावेळी ते बरेच झाले नाहीतर वाया गेले असते.
मी घरी नेहमी करते ती पध्दत
मी घरी नेहमी करते ती पध्दत अगदी भोपळ्याच्या pie सारखी आहे. २ अंडी फेटून घ्यायची, मग त्यात एक कॅन (15 oz अंदाजे) मॅन्गो प्युरी (देसाई हापूस मस्त), चवीनुसार साखर किंवा स्पेंडा, एक कॅन evaporated milk (condensed milk सुध्दा घालु शकता पण मग साखर घालू नये), थोडी वेलची पूड आणि आवडत असेल तर बदाम-काजू (पूड किंवा तुकडे), केशर घालून मस्त मिक्स करा. मग Marie Callendar's frozen pie crust मधे हे ओतून ४०० डीग्री ला बेक करा. मी ४०० ला १५ मि आणि मग टेम्परेचर ३५० ला कमी करून ४० मि ठेवते. एकदम सही होते pie. देताना वरून whipped cream चा गोळा!!
छे छे आज केलीच पाहिजे.
Diet वाले - वाचूसुध्दा नका!!
अरे वा इथे पण दिली का कृती ?
अरे वा इथे पण दिली का कृती ? धन्यवाद
धनश्रीने दिलेलीच कृती मी केली होती. पण माकाचु वर गेला तो पाय
फोटु टाका..
फोटु टाका..
आता यातली कुठली कृती वापरुन
आता यातली कुठली कृती वापरुन पाय बनवावा?
धनश्री, फ्रोजन पाय क्रस्ट आधी बेक करुन घ्यायचा का?
सगळ्याच कृत्या छान आहेत
सगळ्याच कृत्या छान आहेत
सायो,
लागणारा वेळ:
१० तास
७ तास तर फ्रिजलाच सेट
७ तास तर फ्रिजलाच सेट करायचंय. रेसिपी लिहीताना ५ तासानंतर एकदम १० तास आहेत. म्हणून तोच ऑप्शन घेतला.
ओक
ओक
माझी रेसिपी अगोने पहिली
माझी रेसिपी अगोने पहिली रेसिपी लिहिलीये त्याप्रमाणेच. फक्त मी सावर क्रीम घालत नाही. जिलेटिन, साखर, क्रीम चीज, मँगो पल्प सगळं ब्लेंडर मधून फिरवायचं. तयार क्रस्ट मध्ये हे मिश्रण ओतून फ्रीजमध्ये ५-६ तास सेट करायला ठेवायचे. मी हल्ली बरेचदा मिनि क्रस्ट मिळतात अश्या पद्धतीचे
ते वापरते. सर्व्ह करायला सोपं जातं.
कुणीतरी फोटो टाका !!
कुणीतरी फोटो टाका !!
कुणीतरी फोटो टाका. आम्ही इथे
कुणीतरी फोटो टाका. आम्ही इथे मिळणारे घटक पदार्थ वापरुन बनवायचा प्रयत्न करतो मग.
आधी बाजारात जावे लागेल केवढी
आधी बाजारात जावे लागेल केवढी ती यादी. पण करुन बघणार.
फोटो टाक ना सायो, साधारण अंदाज येतो पदार्थ जमला की नाही याचा.
आरती, मी वर लिहिल्याप्रमाणे
आरती, मी वर लिहिल्याप्रमाणे कधी केलेला नाही. जिची रेसिपी आहे तिने मला करुन आणून दिला होता. अप्रतिम होता चवीला. त्यामुळे बाकी कुणाकडे असल्यास इथे डकवायला सांगू किंवा जेव्हा करतील तेव्हा काढायला सांगू.
माझी पण रेसीपी बरीचशी ह्या
माझी पण रेसीपी बरीचशी ह्या सगळ्यांन प्रमाणेच आहे. पण मी हे पुडींग म्हणुन करते (पायक्रस्ट वजा).
१) १ १४ oz कॅन स्वीटन्ड कन्डेन्सड मिल्क
२) १ डबा व्हिपड क्रिम (लाइट, फॅट फ्री कुठलाही)
३) २-३ अन्फ्लेव्वर्ड जिलेटीन पॅकेटस (नॉक्स चे)
४) १ कप पाणी
५) १ कॅन मँगो पल्प
क.मि. आणी व्ही.क्रि. एकत्र करुन त्यात मँगो पल्प मिसळावे. त्या मिश्रणामधे पाण्यात मिसळेले जिलेटीन घालुन नीट मिसळावे. हे सर्व काचेच्या बेकींगवेर मधे ओतुन सेट होण्यासाठी फ्रिजमधे ३-४ तास ठेवावेत. वरुन मी पिसत्याची पावडर घालते आणी मिश्रणात केशर दुधात मिसळुन घालते. हे सर्व वर दाखवलेल्या ग्रॅम क्रॅकर्सच्या बेस मधे घालुन पण सेट करता येते. जितके पुडींग घट्ट पाहिजे असेल तितकं जिलेटीन जास्ती वापरायचं.
सायो, बिल्वा, अगो इ. नी
सायो, बिल्वा, अगो इ. नी दिलेल्या कृतीने पाय केल्यास असा दिसतो.
काल ह्या कृतीने केला पाय.
काल ह्या कृतीने केला पाय. हेवी क्रीम उकळले नाही आणि माझ्याकडे मँगो जेलो होतं ते वापरलं. जेलोचं प्रमाण गडबडलं कारण हवा तसा सेट नाही झालाय. तरी आता आयड्या आली. पुढल्या वेळी जमेल असं वाटतय
बिल्वाने सजेस्ट केलेले छोटे क्रस्ट वापरले. हा फोटो, फ्रिजमध्ये सेट करायला ठेवलेल्या पायचा.
छान दिसतोय सिंडे.
छान दिसतोय सिंडे.
सायो तू दिलेल्या प्रमाणाच्या
सायो तू दिलेल्या प्रमाणाच्या अर्धच केलं तरी ८ छोटे क्रस्ट लागले.
होय का?
होय का?
भारी फोटो सिंडे! हे बरेच लहान
भारी फोटो सिंडे! हे बरेच लहान आकाराचे क्रस्ट आहेत ना? मोठ्या आकाराचे केले तर २ होतील असं वाटतंय.
सायो तू दिलेल्या प्रमाणाच्या
सायो तू दिलेल्या प्रमाणाच्या अर्धच केलं तरी ८ छोटे क्रस्ट लागले.
>> हो, बरोबर आहे. भल्यामोठ्या प्रमाणात होते ही रेसिपी. मी बारा लोकांच्या पार्टीला अर्ध्या प्रमाणात केली होती आणि गरज असेल तशी आयत्यावेळी पाणी जास्त, क्रीम जास्त अशी वाढवताही येते. जिलेटीनचा अंदाज आला की झालं
दिलय की वर २ क्रस्ट .
दिलय की वर २ क्रस्ट .
वीक एंडला नॉक्सच्या पॅकवर
वीक एंडला नॉक्सच्या पॅकवर दिलेली झटपट चीझकेकची रेसिपी वापरुन मँगो चीझ केक केला. भारी लागला. सायोच्या, अगोच्या आणि मिनोती तिघींच्या पद्धतीने केलेला पाय जरा थुलथुलीत सेट होतो. हा चीझकेक मात्र छान सेट झाला. थोडं मिश्रण छोट्या वाट्यांमध्ये सेट केलं होतं त्याचा हा फोटो-
अरे वा, भारी दिसतोय कृती पण
अरे वा, भारी दिसतोय कृती पण लिही.
अरे वा, भारी दिसतोय सिंडे
अरे वा, भारी दिसतोय सिंडे
छान दिसतोय, कृती पण लिही.+१
छान दिसतोय, कृती पण लिही.+१
यम्मी दिसतोय चीजकेक!
यम्मी दिसतोय चीजकेक!
सिन्डाका! खणून रेसिपी वर काढत
सिन्डाका! खणून रेसिपी वर काढत आहे , तुझ्या चिझकेकची रेसिपी (आठवत असेल तर) लिहते का? मातोश्रिचा बर्थडे जवळ येतोय आणि एग्लेस केक सारखा काहितरी कराव अस वाटतय. ती अन्ड असेल या भितिने कुठलाही केक कधिच खात नाही.
मस्तच!
मस्तच!
Pages