काकडी चा कीस (काकडीची साले काढून मग किसणे) १ कप
बेसन (डाळिचे/ चण्याचे पीठ) २ कप
२ चमचे तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, पाणी,
कढिपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिर्चीचे तुकडे (आवडीनुसार) ५- ६
बेसन (डाळिचे/ चण्याचे पीठ) पाण्यात सरबरीत मिक्स करून घ्या.
कढईत २ चमचे तेल घेऊन, मोहरी - हिंग - हळद- मिरची- कढिपत्ता घालून फोडणी करून घ्या, त्यात काकडीचा कीस (रसा सहीत) परतून घ्या. त्यात बेसनाचे मिश्रण घालून मंद आचेवर शिजू द्या, सतत ढवळत रहा. पिठल्यासारखी पळी-वाढी कन्सिस्टन्सी आली की मीठ घालून मिक्स करून घ्या. वर कोथिंबीर पेरा आणि भाकरी बरोबर सर्व करा.
खाताना अर्धा चमचा गोडे तेल घालून घ्या (आवडत असेल आणि चालत असेल तर!)
*या पदार्थात सहसा कांदा, लसूण घालत नाहीत. आवडत असल्यास घालायला हरकत नाही.
*काकडीचा आणि हींग- हळद- कढीपत्ता यांचा एकत्रीत स्वाद छान लागतो.
*डाळीचे पीठ आणि भाजणी (थालीपीठाची) समप्रमाणात वापरल्यास एक वेगळीच चव येते.
*मुगाच्या डाळीचे पीठ वापरता येईल.
छान प्रकार. अलिकडेच कुणीतरी
छान प्रकार. अलिकडेच कुणीतरी लिहिला होता इथे.
अगदी सोप्पा आहे आणि वेगळा
अगदी सोप्पा आहे आणि वेगळा आहे. करायला हवा....फोटो असतील तर टाका प्लिज...
साधारण अशीच माझी रेसिपी,
साधारण अशीच माझी रेसिपी, मस्तं चव लागते , एकदम बिन कान्दा लसुणाची सात्विक तरी टेस्टी रेसिपी.

हा फोटो
सही!!! करणारच!
सही!!! करणारच!
भारी फोटो डीजे!!!
भारी फोटो डीजे!!!
फुलका जबरा दिसतोय! जेवायला
फुलका जबरा दिसतोय! जेवायला बसावसं वाटलं एकदम! :p
दिपांजली छान फोटो आहे एकदम
दिपांजली छान फोटो आहे एकदम तोंपासु
खरंच, डिजे.. अगदी तूकडा उचलून
खरंच, डिजे..
अगदी तूकडा उचलून चव बघावीशी वाटतेय.
मस्त वाटतीये रेसिपी..
मस्त वाटतीये रेसिपी..
एकदम बिन कान्दा लसुणाची
एकदम बिन कान्दा लसुणाची सात्विक तरी टेस्टी रेसिपी
अगदी चार्तुमासात चालेल मला.
काकडी ला option म्हणुन अजुन कायकाय आहे ...
छान रेसिपी
छान रेसिपी
झुकिनी पण चालेल बहुतेक.
झुकिनी पण चालेल बहुतेक.
काकडीला पर्याय :- गाजर, दूधी
काकडीला पर्याय :-
गाजर, दूधी भोपळा, लाल भोपळा, गिलकी (घोसाळी), दोडकी (शिराळी), ढेमसे, पत्ताकोबी ईत्यादि !
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्स !
खुपच छान आणि मस्त रेसिपी
खुपच छान आणि मस्त रेसिपी आहे.. नक्की करुन बघीनः)
तों पा सु!!!!!!!!
तों पा सु!!!!!!!!