बडबड गाव

Submitted by चिन्नु on 12 August, 2008 - 09:40

एक होता बडबड गाव
बडबड गावाचे बडबड नाव!

भिंती करायच्या
बडबड बडबड
झाडे करायची
बडबड बडबड

बडबड गावात बडबड्या आला
आला काय म्हणता, घोटाळा झाला!!

आता बडबड्या करतो
बडबड बडबड
उड्या उड्या मारतो आणि
करतो बडबड

गाव रुसला बडबड्या हसला
बडबड्या हसला, गाव चिडला!

बडबड्या म्हणे
पुरे माझी बडबड
तुम्हीच करा पाहू
बडबड बडबड!

सत्याइतके छान काही लिहिता येत नाही, पण आपला एक प्रयत्न! Happy

गुलमोहर: 

अरे मी काल दिलेली प्रतिक्रिया कुठे गेली...?

चिनु किती बलबल कलते ग तू. नुत्ती... बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड डबडब डबडब डबडब डबडब डबडब हा हा डबडब म्हन्तोय बडबड च्या जागी .. वेला चैय....

ही खरी बालकविता... मस्त Happy

खूप खूप धन्यवाद. तू म्हणजे अगदी लहानात लहान होउन लिहितोस. तुझ्याइतकं छान कधी जमायचं!

चिनु छान जमली आहे.