यम्मी कांदे!!...
लागणारा वेळ : १५ मिनिटे.
साहित्य :
१. खिसलेली कैरी : अर्धी वाटी.
२. पांढरे कांदे : तीन ते चार
३. कैरी लोणचे मसाला : अंदाजाने
४. बारीक चिरलेला गूळ : अंदाजाने
५. मीठ : चवीनुसार
६. कच्चे तेल : १ छोटा चमचा. (ऐच्छिक)
कृती : प्रथम कैरीचा खीस, बारीक चिरलेला गूळ, लोणच्याचा मसाला, मीठ हे एकत्र कालवून घ्यावे.
कांद्याला आपण भरल्या वांग्याला जसे काप देतो तसे काप द्यावेत. आणि त्यात वरील
मिश्रण भरावे. एका बोल मधे काढून त्यावर एक छोटा चमचा कच्चे तेल घालावे.
ह्याची चव कांदा-कैरी कोशिंबिरी सारखी (टक्कूसारखी) लागते.
ही विदर्भातली खासीयत आहे. उन्हाळ्यात तिकडे हा प्रकार नेहमी करतात.
माझ्या वैदर्भीय मैत्रीणीने हा प्रकार करून आणला होता. मी यात साखरे ऐवजी गूळ वापरला
आणि तिकडे विदर्भात कांदे बुडतील इतकं तेल घालतात असं ती सांगत होती. पण माझं काही
इतकं तेल घालायचं धाडस झालं नाही.
माहितीचा स्रोत : माझी वैदर्भीय मैत्रीण.
.
.
एकदम तोंपासु दिसतंय.
एकदम तोंपासु दिसतंय. जेवायच्या वेळेला हे असले धागे दिसले (आणि घरात कैरी नसली) की फार त्रास होतो
काय भारी दिसतोय फोटो!!
काय भारी दिसतोय फोटो!! तोंडाला शब्दशः पाणी सुटले.
कैरीचा कीस + गूळ + मीठ + लाल तिखट + दाण्याचं जाड कूट हे एकत्र करून पांढर्या कांद्यात भरून सह्ही लागतं.
भारी दिसतं आहे! करणार, करणार.
भारी दिसतं आहे! करणार, करणार.
काय तोपांसु फोटो आहे नक्की
काय तोपांसु फोटो आहे
नक्की करुन पाहण्यात येइन
अग ही रेसिपि प्रकाशचित्र मधे
अग ही रेसिपि प्रकाशचित्र मधे दिसत आहे
शांकली, तुझ्या घरी धाड
शांकली, तुझ्या घरी धाड टाकण्यात येईल.
श्या..आता काय कैर्या इंपोर्ट
श्या..आता काय कैर्या इंपोर्ट करू?????? शांकली.. ये तू ने अच्छा नही किया!!!
शांकली आहाहा तोपासु ग. नक्की
शांकली आहाहा तोपासु ग. नक्की करुन बघेन हा प्रकार.
शांकली याची चटणी पण झकास
शांकली याची चटणी पण झकास लागते, फक्त आम्ही यात मसाला घालत नाही. तोंपासु आहे मात्र. पण हे प्रचि मध्ये दिसतेय.
अरे वा छान दिसताहेत,
अरे वा छान दिसताहेत, तो.पा.सु.च
हे करुन ठेवल तर किती दिवस टिकेल.
मला अगोदर धाग्याचं शीर्षक
मला अगोदर धाग्याचं शीर्षक वाचून वाटलेलं कांद्यात ''यम्मी'' असं काय असणार? पण मस्त वाटतोय हा प्रकार.
मस्त आहे. उद्या करून बघणार.
मस्त आहे. उद्या करून बघणार.
मस्त प्रकार.. करायलाही
मस्त प्रकार.. करायलाही सोप्पाच!
कैरी+कांदा+गुळ्+दाण्याचा कूट+लाल तिखट+मीठ+कोथिंबीर अशी चटणी पण एकदम झक्कास लागते.वरून हिंगाची फोडणी द्यायची!
सर्वांना मन:पूर्वक
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
नितीन, हे २/३ दिवसच टिकतं.
तोँपासू
तोँपासू
शांकली, पाककृती आणि
शांकली, पाककृती आणि आहारशास्त्रात का हलवत नाही ही कृती?
सही फोटो. तेल कच्चं न वापरता
सही फोटो.
तेल कच्चं न वापरता भरपूर मोहरी-हिंगाची फोडणी करून घालता येते.
लोणच्याला सुटलेलं पाणी दहीभात किंवा मेतकूट्भाताबरोबर खायचं. दुसर्या दिवशीपर्यंतदेखिल टिकवायचं नाही. कांदा ताजा आणि करकरीत आहे तोवर छान लागतं.
छान रेसिपी. साधारण अशीच
छान रेसिपी.
साधारण अशीच रेसिपी इथेही आहे.
सायो +१
शांकली, तुम्ही ही 'आहारशास्त्र आणि पाककृती' ग्रूपमधे का हलवत नाही रेसिपी?
'प्रकाशचित्र' वाचून मला वाटलं
'प्रकाशचित्र' वाचून मला वाटलं की कांद्याच्या पिकाचे फोटो असतील.
रेसिपी आणि फोटोही अगदी तोंपासु आहे. कैर्या आणल्यास करून बघेन.
मी रेसिपी लिहिली पण त्यात
मी रेसिपी लिहिली पण त्यात ऑप्शनमधे आहारशास्त्र आणि पाककृती हा ऑप्शनच दिसत नाहीये
या आधीची रेसिपी लिहिली तेव्हा तो ऑप्शन दिसत होता; पण ह्यावेळी तो दिसतच नाहीये.
शांकली, इथे जा. उजव्या हाताला
शांकली, इथे जा. उजव्या हाताला 'नवीन पाककृती' ऑप्शन दिसेल पहा.