जेसन लिझॅक... थर्ड टाइम इज अ चार्म!.. ऍन इंस्टंट क्लासिक...
जेसन लिझॅक...... थर्ड टाइम इज अ चार्म!.........ऍन इंस्टंट क्लासिक!
आज ऑलिंपिक्स स्पर्धांचा दुसरा दिवस होता. ऑलिंपिक्स्मधल्या सर्व स्पर्धां आता वेग पकडु लागल्या आहेत.. खासकरुन जलतरण तलावावर.. आजच्या स्पर्धांमधे सगळ्यात जास्त मजा कशात आली असेल तर ती पुरुषांच्या ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल रिले शर्यतीत...
मी मागे सांगितल्याप्रमाणे या रिले शर्यती नेहमीच बघण्यासारख्या असतात.. खासकरुन अटितटिच्या.. मी तुम्हाला सांगीतले होते की फ्रांस्,अमेरिका व ऑस्ट्रेलिया या तिन देशांमधली... या शर्यतीमधली... तिरंगी लढत बघायला विसरु नका.. आणि त्यात फ्रांसच्या १०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे विश्वविक्रम असणार्या ऍलन बर्नार्डने... "आम्ही बैजिंगला अमेरिकेच्या रिले टिमला चिरडुन टाकायला आलो आहोत".... अशी वल्गना करुन... या शर्यतीला अजुन एक वलय आणले होते.. मान्य आहे की फ्रांसची टिम खरोखरच या शर्यतीत फेवरेट होती व त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होता.. पण अश्या वल्गना करु नयेत हे फ्रांसच्या टिमला कळले नसावे... त्यांनी जर ८ वर्षापुर्वीच्या... अमेरिकेच्या गॅरी हॉलने केलेल्या वल्गनेला(आम्ही ऑस्ट्रेलियन स्विम टिमचे तुणतुणे वाजवु...) आठवले असते तर.... त्यांनी अशी वल्गना करायची चुक खचितच केली नसती.. आणि मायकेल फेल्प्स्,गॅरेट वेबल गेल ,क्युलन जोन्स व जेसन लिझॅक.. या अमेरिकेच्या चौकडिच्या आत्नसन्मानाला... त्याने त्याच्या वल्गनेने.. अजुनच डिवचले..
ही शर्यत ज्यांना बघायला मिळाली त्यांनी खरच एक अविस्मरणिय शर्यत बघीतली.. शर्यतिच्या सुरुवातीपासुनच एक प्रकारचा तणाव जलतरण तलावावर होता.. एकतर मायकेल फेल्प्सची ही आठपैकी दुसरी व सगळ्यात अवघड शर्यत होती.. यात जर त्याला सुवर्णपदक मिळाले तर त्याच्या उरलेल्या ६ शर्यतीत तोच फेव्हरेट आहे.. म्हणजे त्याच्या ८ सुवर्णपदकाच्या विक्रमाआड हिच शर्यत येउ शकत होती.. पण यात विजय मिळवायला त्याला त्याच्या संघातल्या इतर ३ जणांचे सहाय्य हवे होते.. आणि दुसरे म्हणजे या शर्यतीत फेव्हरेट असलेल्या फ्रांसच्या टिमच्या कप्तानाने २ दिवसापुर्वी केलेली वरील वल्गना..
शर्यतिच्या पहील्या लेगमधे अमेरिकेतर्फे खुद्द मायकेल फेल्प्स पाण्यात उतरला तर ऑस्ट्रेलियातर्फे इमन सुलिव्हान व फ्रांसतर्फे ऍमरि लिव्हॅक्स... आणि ही पहिली लेग ऑस्ट्रेलियाच्या सुलिव्हान(१०० मिटर्स फ्रिस्टाइलमधे याच्यात्,अमेरिकेच्या जेसन लिझॅक व फ्रांसच्या ऍलन बर्नार्डमधे जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळणार आहे.. या शर्यतीत आपल्या भारताचा विरधवल खाडे फायनल ८ मधे आला तर ती फायनल बघताना दुधात साखर!) याने जिंकुन ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली.. मायकेल फेल्प्सने अमेरिकेला दुसरे स्थान मिळवुन आपली कामगीरी पाड पाडली.. तर फ्रांसचा ऍमरी लिव्हॅक्स तिसरा होता
दुसर्या लेगमधे अमेरिकेच्या गॅरेट वेबर गेलने उडी मारली तर ऑस्ट्रेलियातर्फे अँड्र्यु लॉटर्स्टाइन पाण्यात आला व फ्रांसतर्फे फाबिअन जिलॉट...... ही लेग संपेसपर्यंत अमेरिका व फ्रांस नेक टु नेक झाले होते व तिसर्या लेगसाठी जेव्हा अमेरिकेच्या क्युलन जोन्सने व फ्रांसच्या फ्रेडरिक बॅस्क्वेटने पाण्यात उडी मारली तेव्हा सगळ्यांना कळुन चुकले होते की स्पर्धा अमेरिका व फ्रांसमधेच आहे.. पण या तिसर्या लेगमधे फ्रांसच्या बॅस्क्वेटने ४६. ६३ सेकंदात आपले १०० मिटर अंतर कापुन फ्रांसला चौथ्या लेगसाठी त्यांच्या सगळ्यात वेगवान ऍलन बर्नार्डला.. ०.७५ सेकंदाचे कुशन दिले.. ते पाहुन सगळ्यांना कळुन चुकले की ही शर्यत आता फक्त फ्रांसच जिंकु शकतो...
पण अमेरिकेचा कप्तान जेसन लिझॅक....याच्या डोक्यात मात्र हार अजुन मान्य नव्हती.. चौथ्या लेगमधे...त्याने व ऍलन बर्नार्डने जेव्हा त्यांचे पहिले ५० मिटर्स संपवले तेव्हा फ्रांसच अजुनही पहिल्या स्थानावर होता.. पण जेव्हा शेवटचे २५ मिटर्स राहिले होते तेव्हा जेसन लिझॅकने मुसंडी मारायला सुरुवात केली... पण तरीही फ्रांसचा लिड भरुन काढायला त्याच्याकडे पुरेसे अंतर नव्हते असेच दर्शकांना वटत होते... १५ मिटर्स.. फ्रांसचा बर्नार्ड अजुनही पुढे पण त्याची आघाडी आता फारशी राहीली नव्हती ... १० मिटर्स.. लिझॅक व त्याच्यात आता अर्ध्या फुटाचेच अंतर होते.. पण अजुनही फ्रांसच पुढे.. ५ मिटर्स.. फ्रांसचा लिड आता फक्त ३ इंचाचा होता... २ मिटर्स.. फ्रांसच पुढे.. पण फक्त २ इंचांनी.. १ मिटरच राहीले.. फ्रांस पुढे.. पण फक्त १ इंचांनी...आणी तलावाची भिंत जेव्हा लिझॅकच्या दृष्टीक्षेपात आली तेव्हा त्याने पाण्यात एक शेवटची मुसंडी मारली व भिंतीला... फ्रांसच्या ऍलन बर्नार्डच्या पुढे.. फक्त ८ शंतांश सेकंदाने आधी हात टेकवुन शर्यत जिंकुन अमेरिकेला सुवर्णपदक मिळवुन दिले... हॅट्स ऑफ टु जेसन लिझॅक! त्याने त्याची १०० मिटर्सची चौथी लेग केवळ ४६.०८ सेकंदात पोहुन रिले शर्यतीमधली आतापर्यंतची फास्टेस्ट १०० मिटर्स फ्रिस्टाइलची वेळ नोंदवुन विश्वविक्रम केला....
आणि तिकडे काठावर मायकेल फेल्प्स.. बेभान होउन.. यस्स......कम ऑन यु एस ए..... असे आपल्या दोन्ही हातांच्या मुठी बंद करुन.. त्वेषाने.. गॅरेट वेबर गेलच्या बरोबरीने त्याच्या व क्युलन जोन्सच्या बाजुला उभा राहुन... ओरडुन ओरडुन.. अमेरिकेचा हा विजय साजरा करत होता.. मायकेल फेल्प्सचा तो चित्कारता चेहरा.. व त्याहीपेक्षा जेसन लिझॅकने...या शर्यतीत दाखवलेले फ्रिस्टाइल जलतरणाचे प्रात्यक्षिक व पराभवाच्या जबड्यातुन विजयश्री खेचुन आणण्याची त्याची ही कामगीरी.. ही शर्यत बघणारे लाखो जलतरणप्रेमी.. कधीच विसरु शकणार् नाहीत...
तिकडे पाण्यात.. फ्रांसचा ऍलन बर्नार्ड मात्र... अवाक होउन.. आधी स्कोरबोर्डकडे अविश्वासाने बघत होता व रिझल्ट बघितल्यावर.. शरमेने व निराशेने.. हाताच्या घडित आपले तोंड लपवत.. पाण्यातच बराच वेळ उभा होता...
२००० व २००४ च्या ऑलिंपिक्समधे ४ बाय १०० मिटर्स फ्रिस्टाइल शर्यतीत अमेरिकेला रजत व ताम्र पदकावर समाधान मानावे लागले होते. त्या दोन्ही ऑलिंपिक्समधे अँकर लेगमधे पोहणार्या अमेरिकेच्या ३२ वर्षाच्या जेसन लिझॅकने... २००८ च्या ऑलिंपिक्स मधल्या या शर्यतीत मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करुन सुवर्णपदक मिळवले... म्हणतात ना.. थर्ड टाइम इज अ चार्म!
तळटिपः या शर्यतीत जुन्या विश्वविक्रमाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या... नविन विश्वविक्रम...३ मिनिट्स ८.२४ सेकंद.. जुना विश्वविक्रम.... ३ मिनिट्स १२.४६ सेकंद! तब्बल साडेचार सेकंदाने कमी....!
वॉव... काय
वॉव... काय थरारक सामना
मुकुन्द्ज
मुकुन्द्जी....
ही शर्यत म्हण्जे खरोखर एक पर्वणी होती... अफलातून.....
नविन विश्वविक्रम...३ मिनिट्स ८.२४ सेकंद.. जुना विश्वविक्रम.... ३ मिनिट्स १२.४६ सेकंद! तब्बल साडेचार सेकंदाने कमी....!
<< ही म्हण्जे तर खरोखर कमाल होती... निव्वळ peak of performance!
- येडचॅप
मुकुंद...
मुकुंद... नेहमीप्रमाणेच रोमांचित करणारं लिखाण!! मस्त एकदम...
तुमच्या आधीच्या लेखांमुळे बरीचशी नावं माहित झाली होती, ते लोक टिव्हीवर दिसले आणि त्यांचं नाव प्रकाशित झालं की त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलेली माहिती सांगून मी उगाचच भाव खाऊन घेते.
.
या शर्यतीत आपल्या भारताचा विरधवल खाडे फायनल ८ मधे आला तर ती फायनल बघताना दुधात साखर!)
मला हे कळलं नाहि. भारताचा संघ स्विमिंग रिलेसाठी qualify झाला होता का? की वीरधवल खाडे का भारतीय वर्णाचा असून दुसर्या कुठल्या देशासाठी खेळत आहे?
मुकुंद, ही
मुकुंद, ही शर्यत मी live बघितली .
तो थरार, तो क्षण, आधी लिझॅकला चिअर अप करणारा.. शर्यत जिंकल्याची खात्री करुन मग चित्कारणारा मायकल अन टिम युएस चा विजय सोहळा पाहुन पूर्ण पणे वेडी झाले!!!
पराभवाच्या जबड्यातुन विजय खेचुन आणणार्या जेसन लिझॅकला सलाम!!
amazing झाली ना
amazing झाली ना ही शर्यत!
अगदी समालोचन करणारे पण फ्रान्स्लाच medal मिळणार असं सांगत असतानाच शेवटच्या क्षणी लिझॅकने घेतलेली बढत कसली होती! hats off त्या जिद्दीला आणि ईर्ष्येला!
फेल्प्स तर वेडा झाला होता नंतर.
मुकुंद - तुमची comment लगेच येणार मायबोलीवर असं वाटलच होतं.
मंजू - अगं वीरधवल १०० मीटर फ्रीस्टाईल मध्ये भाग घेणार आहे.
हि शर्यत
हि शर्यत मी पाहीली मुख्य म्हणजे लाईट गेले नाहीत
रोमांचकारीच विजय होता तो, त्यांच्या जिद्दीला सलाम,
आणी मुकुन्द तुम्हालाही.....
गोदेय
एकदम सही!
एकदम सही! मुकुंद तुला वेळ असेल तर रोजच्या लढतींतील अशा एखाद्या सामन्याबद्दल रोज का नाही टाकत थोडी माहिती?
मी पण
मी पण पाहिली live. शेवटचा क्षण कसला अटीतटीचा होता. फ्रान्स जिंकणार म्हणता म्हणता अमेरिकेने बाजी मारली. फेल्प्सचे expresions खूपच बोलके.
hats off to lezak.!!!
आवडलं. खरं
आवडलं. खरं सांगायचं तर खेळ आणि मी ३६. स्पर्धा (थोर असल्या तरी) बघायलाही बहुतेक वेळा कंटाळतो. मग तुझं हे जे काय आहे ते वाचतो... हे वाचताना जी मजा येते ती बघताना येत नाही. बघण्यासाठी आवश्यक तेवढा धीर नाही आणि तुझ्यासारखी 'नजर' तर नाहीच नाही. असो.
एक शंका - हे जे मीटर्स आणि इंचाचे वर्णन केले आहेस ते तुला कसे कळते ?
***
टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर
मुकुंद,
मुकुंद, नेहमीप्रमाणेच सुरेख वर्णन! अमोल म्हणतो आहे तसे रोज काही लिहिणार का?
स्लार्टी....
स्लार्टी.... अरे सोप्पे आहे... मी टिव्ही समोर माझी फुटपट्टी घेउन बसलो असतो......:)..... नाही रे...तुझी शंका रास्त आहे.. पण मी माझा एज्युकेटेड गेस सांगत असतो.. आणि ही शर्यत ज्यांनी ज्यांनी पाहीली ते ते माझ्या अंदाजाशी सहमत असतील... बिलिव्ह मी...... ही शर्यत अक्षरशः इंचा इंचानी लढली गेली...
अमोल,शैलजा... मी जरुर प्रयत्न करीन लिहीण्याचा.... पण तुम्हाला एक सांगतो.... प्रत्येक ऑलिंपिक्समधे ३ किंवा ४ डिफाइनिंग मोमेंट्स असतात्...की ज्याने ते ते ऑलिंपिक्स व ते अविस्मरणिय क्षण कायमचे बघणार्यांच्या लक्षात राहतात...व त्याबद्दल लिहावेसे वाटते.... बैजिंग ऑलिंपिक्समधे पहिल्या चार दिवसातच तसे २ अनमोल क्षण येउन गेले... एक म्हणजे डोळे दिपवुन टाकणारा उदघाटनाचा सोहोळा... व दुसरा म्हणजे जेसन लिझॅकची ही ४ बाय १०० मिटर्स रिले शर्यत... या दोन्ही गोष्टी ज्यांनी ज्यांनी पाहिल्या.... त्यांनी त्यांनीच मनापासुन सांगा.... तुम्ही ते विसरु शकाल का? अजुन २० वर्षांनीसुद्धा या गोष्टी तुमच्या स्मृतीत घर करुन असतील....
झेलम... जेसन लिझॅकच्या या शर्यतीबद्दल व त्याच्या पराक्रमाबद्दल लिहायला मीच काय...... पण बर्याच जणांचे हात शिवशिवले असतील...:)
मंजू.:).... झेलमने दिलेले उत्तर समजले का?
पन्ना.... अग कोण वेडे होणार नाही अशी शर्यत व अशी जिद्द बघुन?
झेलम,
झेलम, धन्यवाद.
स्विमिंगसाठी भारताकडून एंट्री आहे हेच मला मला माहित नव्हतं. आणि वाचूनही फार फार आश्चर्य वाटलं.
भारता
भारता तर्फे स्विमिंग साठी ३ जण आहेत.. रेहान पोंचा, वीरधवल खाडे आणि तिसरा संदीप शेजवाल.. आज खाडे आणि शेजवालच्या आपापल्या गटात पात्रता ठरवण्यासाठी लढती आहेत.. खाडेनी जर स्वतःचा विक्रम मोडला तरच तो पात्र ठरू शकेल तिच गोष्ट शेजवालची...
रेहान पोंचा स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे.. त्याच्या लढती मध्ये तो २रा आला पण एकूणात ४० वा आला.. जी २०० मी ब्रेक स्ट्रोक लढत मायकल फेल्प्सनी जागतिक विक्रम करत जिंकली.
वीरधवल खाडे तीन स्पर्धात भाग घेणार आहे... ५०, १०० आणि २०० मी. फ्री स्टाईल. २०० मी. फ्री स्टाईल मधे त्याचा नंबर ४८ वा आला आहे.. आज १०० मी. ची पात्रता फेरी होणार आहे तर १४ तारखेला ५० मी. ची पात्रता फेरी आहे.
तर संदीप शेजवाल १०० आणि २०० मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये भाग घेणार आहेत.. ह्यातील १०० मी ची स्पर्धा झालेली आहे आणि त्यात तो ३८ व्या नंबरवर आला.. २०० मी. ची स्पर्धा अजुन व्हायची आहे...
ह्या तिघांच्या बाबतीत एक गोष्ट अशी की तिघेही आपापल्या पात्रता फेरीत दुसरे आले.. परंतू एकूण स्पर्धेचा दर्जाच इतका उच्च आहे की त्यांची ही कामगिरी त्यांना उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी सुद्धा कमी पडली.. आणि विजते आणि ह्यांच्या वेळेमधे २ ते ३ सेकंदांचाच फरक आहे.
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
सुरेख
सुरेख मुकुंद
अमोल आणि आय टी ला अनूमोदन जर रोज लिहू शकलास वेळात वेळ काढून तर
>>या दोन्ही
>>या दोन्ही गोष्टी ज्यांनी ज्यांनी पाहिल्या.... त्यांनी त्यांनीच मनापासुन सांगा.... तुम्ही ते विसरु शकाल का? अजुन २० वर्षांनीसुद्धा या गोष्टी तुमच्या स्मृतीत घर करुन असतील....>>
अगदी खरं मुकुंद!!
परवा रात्री ही शर्यत झाली अन त्या क्षणाचा साक्षीदार झाल्याची झिंग अजुन मनावर आहे.
मुकुंद,
मुकुंद, अप्रतीम लेखक आहेस तू... वाचताना प्रांगणात उभे राहून सामना बघतो आहे असेच वाटते, इतकी यथार्थ वर्णन शैली आहे तुझी.