खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माणूस जेव्हा एकटा रानावनात रहात होता
तेव्हाची.माणूस मुळातच बुद्धिमान होता.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी तो
अनेक प्रयत्न करत होता. लवकरच इतर सर्व प्राणिमात्रांहुन तो प्रगत होत
गेला, आणि वेगळा ठरला. परंतु तरीही एकटेपणा त्याला भेडसावत होता.त्याला
आयुष्यात कसलीतरी उणीव भासत होती.मग त्याने देवाची मनापासुन प्रार्थना
केली आणि सांगितले की देवा जीवनात यशस्वी होण्याची कला तर तु मला
जन्मजातच दिली आहेस, परंतु आता मला असे काहीतरी दे की ज्यामुळे माझ्या
आयुष्याला अर्थ लाभेल. मग देवाने प्रसन्न होवुन त्याला नात्याचे अनमोल
वरदान दीले, आणि सांगितले की ही नाती अथांग आहेत, आणि तुझ्या आयुष्यामधे
तुला ती भरभरुन लाभतील आणि आयुष्याला पूर्णत्व आणतील.
माणूस हा इतर प्राण्यांहून वेगळा ठरला तो केवळ त्याच्या
बुद्धिचातुर्यामुळे नाही. तो एक कळपात रहाणारा प्राणी असुन त्याच्या मनात
उदात्त प्रेम आहे. तो सगळ्यांशी प्रेमाच्या बंधनात बांधला गेला आणि या
नात्यांच्या बंधनांनी त्याचे जीवन अधिक-अधिक सुखी व समृध्द होत गेले. आणि
तो इतर प्राण्यांसारखा नुसता सुरक्षेसाठी म्हणुन कळपामध्ये न रहाता अनेक
नात्यांनी परिपपूर्ण होत गेला.त्याच्या जीवनाला एक वेगळीच गती मिळाली.
आपल्या माणसांच्या आयुष्यात प्रेम-जिव्हाळा हा अनेक नात्यांमधुन आपल्याला
मिळत असतो.आणि त्या सुंदर नात्यांमधुन मिळणारे प्रेम हे जीवनाला खरा अर्थ
प्राप्त करुन देते. आई,वडील,बहीण,भाऊ,नवरा,बायको अशा अनेक नात्यांमधे
आपण घट्ट बांधले गेलेलो असतो. आणि ही नाती म्हणजे जणू आपले सुरक्षा कवच
असते.तसेच रक्ताचे जरी नसले तरी मित्रत्वाचे नाते हे माणसाला मिळालेली एक
देणगीच आहे.आयुष्यातील कित्येक गोष्टी आपण फक्त मित्र-मैत्रिणीं बरोबराच
शेअर करु शकतो.कदाचित मित्र-मैत्रिणी एकाच वयाचे असल्यामुळे आपल्या भावना
चांगल्या प्रकारे समजून घेवू शकतात.काही नाती ही आयुष्याचा सुरवातीपासुन
शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात तर काही अगदी कमी काळ टिकतात आणि मनाला
चटका लावुन जातात.पण आयुष्यात आपण किती वेळ एकत्र घालवला यावर त्या
नात्याची उत्कटता कधीच अवलंबून नसते. त्या नात्यांचा आपल्या जीवनावर खूप
खोलवर परिणाम होत असतो. त्या नात्यांना वेळ,उंची, खोली अशी कुठलीच
परिमाणं लागू होत नाहित. ती एखाद्या समुद्राप्रमाणे अथांग असतात.
कुठल्याही नात्यात प्रेम आणि आपुलकी याची देवाण-घेवाण होत असते आणि
त्यातूनच ते नाते अधिकाधिक दृढ होत नात्यांचे बंधन घट्ट होत जाते. परंतु
असे असले तरीही त्या बंधनाचा आपल्याला कधीही जाच होत नाही. कारण जरी give
and take relationship वर नाते आधारलेले असले तरीही तिथे देवाण-घेवाण
होते ती फक्त निस्सीम आणि निस्वार्थ प्रेमाची. स्वार्थ, कटुता या
भावनांचा लवलेशही त्यात नसतो. त्यामुळे बंधन जरी असले तरीही त्यामधे खूप
मोकळेपणा असतो.
जिथे अधिकार आणि सत्ता नात्यांमधे यायला लागते, तिथे ती नाती कृत्रिम
होतात किंवा संपतात याला कारण असते 'अतिपरिचयात अवज्ञा'. परंतु कुठलीही
गोष्ट "न + अति" होता जिथे फक्त निस्सीम प्रेम असते तीच "नाती" ही खरी
चिरकाल टिकणारी असतात.
देवाने स्त्रीला मातृत्वाचा अधिकार देवून सर्वश्रेष्ठ नात्याचे वरदान
दिलेले आहे. प्रत्येक आई ही आपल्या अपत्यासाठी जे प्रेम, संस्कार देत
असते त्याची परतफेड करणे शक्यच नाही.आपले मुल आनंदात आणि सुखात आहे यातच
प्रत्येक मातेला तृप्तता असते. आज सचिन तेंडुलकर सारखा असामान्य खेळाडू
आपल्या आलिशान घरात पाऊल ठेवताना जेव्हा म्हणाला "हे सर्व माझ्या आईसाठी
आहे. तिला मी या घरात घेवून आलो याचा मला आनंद आहे" तेव्हा किती धन्य
वाटले असेल त्या मतेला.आई-मुलाचे नाते हे नक्कीच सर्वश्रेष्ठ आहे असे मला
वाटते.
घरात पाळलेल्या कुत्र्याचा किंवा मांजराचा किती पटकन लळा लागतो
आपल्याला.त्यांचाशी संवाद न साधताही आपल्या भावना ते खूप चांगल्याप्रकारे
समजू शकतात. त्याचप्रमाणे कधी कधी निर्जीव वसस्तूंशीही आपले अगदी
जीवाभावाचे नाते जुळते.उदाहरणार्थ आपले रहाते घर.अनेक वस्तूंनी आपण आपले
घर सजवत असतो आणि ते घरही आपल्या सुख-दु:खामधे सहभागी होत असते.माझ्या
घरी एक मोठे garden आहे आणि त्यातल्या प्रत्येक फुला-पानाशी माझे नाते
जडले आहे.अनेकदा मी लोकांना एखादे फुलझाडाचे रोपटे भेट देते. आणि ते
मिळाल्यावर त्यांच्या चेहेर्यावरील आनंद पाहून मला कळते की आता त्या
व्यक्तीचेही त्या रोपट्याशी असेच अतुट नाते जुळणार आहे.
जपानमध्ये जेव्हा भूकंप,त्सुनामी सारखी भयंकर संकटे येतात तेव्हा जपानी
माणूस खचून न जाता त्यातून वाट काढण्यासाठी चिकाटीने प्रयत्न
करतो.पैसा,संपत्ती यपेक्षा त्याचे आपल्या मातृभूमीशी असणारे नाते हे
श्रेष्ठ आहे आणि ते नातेच त्याला संकटाला सामोरे जाण्याचे बळ देते.
आज social networking मुळे जग खूप जवळ आले आहे. अंतर, वेळ असा
कोणताही अडथळा न रहाता साता समुद्रापलिकडील आपल्या नातलगांशी किंवा
मित्रांशी आपण हवा तेव्हा संवाद साधू शकतो, एव्हढेच नाही तर अगदी समोरा
समोर बसून चक्क गप्पा मारु शकतो.याचा जरुरीपुरता योग्य वापर केल्यास नाती
दृढ होण्यास नक्कीच मदत होते. पण याचा अति वापर आता नात्यांना आणि
पर्यायाने मनुष्याला शाप ठरत आहे. कारण आजकाल लोक सोबतच्या जीवाभावाच्या
माणसांपेक्षा phone, TV, computer या निर्जीव विश्वामधेच रमू लागले
आहेत.या निर्जीव वस्तूंशी असलेली नाती घातक आहेत. ही यंत्रे आपल्याला
खिळवून ठेवण्याव्यतिरिक्त काहीच करत नाहीत.प्रेम-आपुलकी याचा give and
take चा खेळ इथे नाहीच आहे.आहे ती फक्त मनुष्याला गुंगवून ठेवणारी
मोहमाया. याच्या अतिरेकी वापरामुळे संवाद नाहीसा झाला आहे.आपल्या
जीवाभावाच्या लोकांशी असलेले नाते नष्ट होवून आपण परत एकटे तर पडणार नाही
ना अशी चिंता मला वाटते आहे.
त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपण जर निस्वार्थपणे प्रेम
करत राहीलो तरच आपण चांगली नाती निर्माण करु शकतो.कुठलीही गोष्ट "न+अति"
करता जी टिकतात आणि द्रुढ होत जातात तीच खरी "नाती".
त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा
त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता आपण जर निस्वार्थपणे प्रेम
करत राहीलो तरच आपण चांगली नाती निर्माण करु शकतो.कुठलीही गोष्ट "न+अति"
करता जी टिकतात आणि द्रुढ होत जातात तीच खरी "नाती".>>
हे पटलं.. अती नाही ती नाती.
जन्माने मिळालेल्या बहुतेक नात्यांपेक्षा जोडलेली नाती नेहेमीच जास्त जवळची असतात हे माझं जुनं मत आहे.
राहिलं नातं आईचं. किंवा वडिलांचंही. मॅटर्नल किंवा पॅटर्नल इन्स्टिंक्ट हा एक वेगळा नातेसंबंध आहे. त्या बाबतची माझी मतं जरा जहाल आहेत. ही दोन्ही नाती 'वन वे' आहेत असं माझं तरी मत आहे. किंबहुना, बाप जिवंत असेपर्यंत मुलाला त्याची किंमत कळत नाही, हे सत्य आपल्या पैकी किती जणांनी अनुभवले आहे ते मला ठाऊक नाही. आई/बाप बनल्यानंतर अपत्यासाठी तोंडचा घास काढून देण्यात काय मजा येते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ते समजत नाही, अन तारुण्याच्या नशेत आईबापांना, 'तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?' असा गाभा असलेले प्रश्न अगदी एकेरीवर येऊन विचारण्याची उदाहरणंही, 'श्रावण बाळां'पेक्षा नक्कीच जास्त कॉमन असतात.
भाऊबंदकी हा शब्दच बहुधा महाभारतापासून आला असावा. किंवा ते काव्य समाज मनाचं प्रतिबिंब समजलं तर नात्यांतल्या भांडणांचं पुरातनत्व(?) आपोआप सिद्ध व्हावं.
असो. नात्यांविषयीचं हे चिंतन आवडलं. वर उर्धृत केलेल्या शेवटच्या परिच्छेदाशी सहमत.
ता.क.
'आई' या नात्याविषयी बोललेलो नाही. तिथे श्रद्धाही आडवी येते. पण वैद्यकीय सत्येही एक वेगळा दॄष्टीकोण देऊन जातात.. इथे या नात्याच्या पवित्रतेविषयी काहीही बोलत नाहीये मी. ती वंदनीयच आहे. परंतू अपत्याच्या स्वार्थी वागणूकीबद्दल बोलतो आहे. हे कृपया ध्यानात घ्यावे.
जन्माने मिळालेल्या बहुतेक
जन्माने मिळालेल्या बहुतेक नात्यांपेक्षा जोडलेली नाती नेहेमीच जास्त जवळची असतात हे माझं जुनं मत आहे. >>
म्हणुनच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर टाळता आला तरच चांगली नाती निर्माण होऊ शकतील असे वाटते. धन्यवाद.
या तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे.रक्ताच्या नात्यांमधे आपण एकमेकांना फार गृहीत धरत जातो आणि मग ती नाती कडवट आणि एकतर्फी बनत जातात. कित्येकदा नातेवाइक म्हणजे "नातेवाइट" असे म्हणायची वेळ येते.
चांगला निबंध आहे.
चांगला निबंध आहे.
हे 'अति' करण्याचा प्रकार मला
हे 'अति' करण्याचा प्रकार मला अमेरिकेत जास्त आढळून आला. दारू, ड्रग्स, पैशामागे लागणे हे सर्व इथे अति करण्यात येते, बघूनहि शिसारी येते (कारण तुम्हाला जमत नाही, असे इतर लोक म्हणतात!)
लेख चांगला आहे. तरीही
लेख चांगला आहे. तरीही नात्यांच्या क्षणभंगुरतेविषयी जास्त विवेचन व्हावयास हवे होते असे वाटते.