![rava besan ladoo](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/11/11/rava%20besan.jpg)
बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची
तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..
मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..
भाजून झाल्यावर हीट बंद करा ..
मग दुसर्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..
पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..
हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..
ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं ..
ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती ..
सगळं जुळून आलं तर फार मस्त
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..>>>> हे अशक्य आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळं जुळून आलं तर फार मस्त
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ----> हाहा हाहा
तेच जमत नाही ना....
>>सगळं जुळून आलं तर फार मस्त
>>सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..
करुन बघेन म्हणतेय.
>>>
सशलतै : फोटू टाका लाडवांचे
सशलतै : फोटू टाका लाडवांचे ................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होहो फोटु हवेच.
होहो फोटु हवेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, केशराचे गंध लावलेल्या
हो, केशराचे गंध लावलेल्या लाडवाचा फोटो हवाच.
क्रुती वाचुनच तोंडाला पाणी
क्रुती वाचुनच तोंडाला पाणी सुटले... खरच फोटो टाका म्हणजे सम्पुर्ण कल्पना येइल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे आमचे लाडू : ताजे
हे आमचे लाडू :
ताजे नाहीयेत, गणपतीत केलेले होते.
प्रमाण हेच आणि सगळं असंच, फक्त केशर बेसना भाजून होताना घातलं. आणि त्याबरोबर दुधाचा मसाला पण घातला, त्याची एक वेगळीच मस्त चव येते. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त, सुबक झालेत मंजूडी.
मस्त, सुबक झालेत मंजूडी.
माझे लाडू उद्या होतील मग
माझे लाडू उद्या होतील मग टाकते फोटो ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजू, लाडू छान दिसतायत ..
मंजूडीचे लाडू भारी दिसताएत.
मंजूडीचे लाडू भारी दिसताएत. पण हा एक लाडवांचा प्रकार मला अजिबात आवडत नाही.
सशल, हा माझ्याकडून झब्बू. मला
सशल, हा माझ्याकडून झब्बू. मला जरासे ओलसर मिठाईसारखे लाडू आवडतात. तसेच तोंडात विरघळावेत, जास्त चावावे लागू नयेत म्हणून बदामाची पावडर किंवा मिल्क पावडर घालते. आज बदाम पावडर घातली. आईचे प्रमाण थोडे वेगळे आहे. चार वाट्या रव्याला साडेचार वाट्या बेसन, पाकासाठी पाच वाट्या साखर-तीन वाट्या पाणी. रवा-बेसन वेगवेगळे भाजून घेतले. ह्या प्रमाणात बरेच लाडू होतात. मी वाटी लहान घेते. लहान वाटीच्या हिशोबात माझे पंचवीस-सव्वीस लाडू झाले.
सही... मला लाडू खूप आवडतात
सही... मला लाडू खूप आवडतात
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळं जुळून आलं तर फार मस्त
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू
हा हा हा.
अगदी खरं आहे. आपलाही मूड असायला हवा.
अगदी मनानं लाडूत घुसल्यावर मस्त होतात.;)
हे माझे रवा बेसन लाडु.
हे माझे रवा बेसन लाडु.![DSC03631.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35042/DSC03631.JPG)
मी आज हे लाडु केले.पाकात
मी आज हे लाडु केले.पाकात घातल्यावर लगेच मिश्रण घट्ट झालं. मग दुधाचा हबका मारुन लाडु वळले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी आई हे लाडु उत्तम करते. तीच्या मते मिश्रण आळायला जेवढा जास्त वेळ लागेल तेवढा पाक
आतपर्यंत शिरतो आणि लाडु छान लागतो. कमीत कमी २ तास तरी लागले पाहिजेत. कधी कधी ७-८ तासही लागतात.
तात्पर्य आमच्याकडे सगळं जुळुन आलं नाही.
एक प्रश्न आहे, लाडवाकरिता
एक प्रश्न आहे, लाडवाकरिता कोणते बेसन वापरावे? जाड की बारीक? इथे मिळणारा ब्रँड सांगितला तरी चालेल.
इथले सगळे झब्बू मस्त
इथले सगळे झब्बू मस्त आहेत!
मला अजूनही लाडू करायला जमलेलं नाही त्यामुळे फोटो टाकायला उशीर होत आहे ..
ज्ञाती, अगं मी नेहेमीचं (बारीक) बेसन (जे आपण पिठल्यासाठी, कढीसाठी वापरतो ते) च वापरते .. लाडवाचं बेसन नाही वापरत यासाठी ..
थॅन्क्यु सशल! तुझ्या कृतीने
थॅन्क्यु सशल!
तुझ्या कृतीने मी शंकरपाळी करते नेहमी, ती कधी बिघडली नाहीत. आता हे लाडूही करुन पाहीन.
सशल, तुझ्या रेसिपीने काल हे
सशल, तुझ्या रेसिपीने काल हे लाडू केले. प्रथमच पाकातले लाडू करण्याचे धाडस केले पण एकदम मस्त जमलेत.रेसिपी एकदम पर्फेक्ट आहे.मी लाडू बेसन वापरले.तुला आणि तुझ्या काकूला धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सशल, ३-४ दिवसांपूर्वी हे लाडु
सशल, ३-४ दिवसांपूर्वी हे लाडु केले आणि आज संपले सुद्धा. ह्यावेळी चांगले ५ तास मुरले मग वळायला घेतले. पाक करताना फेस कमी झाल्यावर १ मिनीटात रवा-बेसन मिश्रण ओतले. रेसिपीसाठी धन्यवाद!
अरे मी केलेले लाडू फसले..
अरे मी केलेले लाडू फसले..
माझे लाडु फसले. मिश्रण खुप
माझे लाडु फसले. मिश्रण खुप चिकट झाले. पाक जास्त झाला असे वाटते. बघते अजुन १-२ तास ठेउन. वड्या पडतात का पाहते.
सशल आत्ताच रवा बेसन लाडु
सशल आत्ताच रवा बेसन लाडु केले पण पाकासाठी १ कप पाणी घेण्याऐवजी चुकुन २ कप घेतले. आता लाडु (शिरा?) तर मऊ झाले आहेत , चवीलाही छान लागतायत. पण टीकतील का? काय करावे?
मी एक्सपर्ट वगैरे नाही
मी एक्सपर्ट वगैरे नाही त्यामुळे उपाय सुचवू शकणार नाही पण फ्रीजमध्ये ठेवून बघा .. नक्कीच जास्त टीकतील ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फायनली माझ्याकडून फोटो ..
फायनली माझ्याकडून फोटो ..
अह्हाहा... भारीच दिसताय्त
अह्हाहा... भारीच दिसताय्त लाडू.... लग्गेच उचलुन खावासा वाटतोय....
अगदी अहाहा च ... रंग कसला
अगदी अहाहा च
... रंग कसला सुरेख आला आहे.
फारच सुबक दिसतात लाडू. खूप
फारच सुबक दिसतात लाडू. खूप आवडले.
मस्तच!
मस्तच!
Pages