खाज्याचे कानवले

Submitted by मृण्मयी on 21 October, 2011 - 12:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

सारणासाठी:
१ खोबरं डोल. काळी पाठ काढून किसलेला. (किंवा बाजारात मिळणारा खोबर्‍याचा चुरा)
अर्धी वाटी कणीक चाळून
१ डाव खसखस
वेलदोडा जायफळ पावडर (जायफळ ऐच्छिक)
कुठलाही सुका मेवा नाही (कानोला तोंडात विरघळायला हवा, त्यात सुका मेवा चावायला लागायला नको. )
साखर (प्रमाण कृतीत दिलंय)

पारी:
२ वाट्या बारिक रवा
दूध पाणी एकत्र करून (१:१)
अर्धी वाटी साजुक तूप
१ डाव लोणी
१ डाव कॉर्न फ्लावर

क्रमवार पाककृती: 

सारणाची:
* खोबरं किसून अगदी मंद आचेवर गुलाबी भाजावं. थंड करून हातानी चुरून घ्यावं
* चाळलेली कणिक साजुक तुपावर (मंद आचेवर) भाजावी. फार खरपूस नको.
* खसखस भाजून घ्यावी.
* खोबरं, कणिक आणि खसखस एकत्र करून (थंड झाल्यावर) हे मिश्रण जितकं असेल तितकीच पिठीसाखर घालावी.

पारीची कृती: हा सगळ्यात ट्रिकी भाग. पारी छान झाली तरच पापुद्रे सुटून कानोला छान होतो.
* रवा दुध्-पाण्यात घट्ट भिजवून घ्यावा. तासभर ओल्या (पण घट्ट पिळलेल्या) कापडाखाली झाकून ठेवावा.
* या रव्याच्या गोळ्याला थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थीत कुटून घ्यावं. (साधारण अर्धी वाटी साजुक तूप लागेल)
* कुटलेल्या रव्याच्या दोन पोळ्या लाटाव्या. एकीला बोटांनी खड्डे करून त्यात कॉर्न फ्लावर्-लोण्याचं मिश्रण लावावं (खड्ड्यात जरा भरपूर मिश्रण मावेल). त्यावर दुसरी पोळी ठेवून खड्डे-कॉर्न फ्लावर मिश्रण प्रकार रिपीट करावा.
* या दोन्ही पोळ्यांची लांबट गुंडाळी करून १ इंचाचे तुकडे करावे.
* प्रत्येक तुकड्याची दोन टोकं दोन्ही हातांच्या बोटात धरून उलट दिशेला अलगद फिरवावीत आणि अलगद दाबावी. हे झालं पागोटं.

* १ डाव लोणी आणि कोर्न फ्लावर एकत्र फेसून घ्यावं.

कानोला भरताना:
* पागोट्याची ओवल शेपमधे पोळी लाटावी. (फार दाब न देता, नाहीतर पापुद्रे सुटणार नाहीत). लाटताना कोर्न फ्लावर घ्यावं. लाटताना उरलेली पागोटी ओल्या फडक्याखाली झाकावी म्हणजे कोरखंडणार नाहीत.
* अर्धी पोळी हातानी झाकून उरलेल्यात सारण भरावं.
* किंचित दुधाचा हात लावून कानोला बंद करावा. कडा कातरणीनी कातरून कानोले ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे.
* ८-१० कानोले झाले की मध्यम आचेवर तुपात गुलाबी रंगावर तळावे.

karanji.jpg

फोटो सौजन्य : रंजना कर्णिक, अन्कॅनी.

वाढणी/प्रमाण: 
नगांचा आकडा आकारावर अवलंबून.
अधिक टिपा: 

कॉर्नपिठाऐवजी तांदळाची पिठी देखिल वापरतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्कॅनी, त्याचं काय आहे, खानेवालों को खाने का बहाना चैये ना, म्हणून आपलं दिवाळीचं निमित्त असतं Happy बाकी, कानवले बारा महिने उपलब्ध असतात.

अन्कॅनी, हो चालू आहे (पुण्यात).

स्वाती_आंबोळे, गेल्या दिवाळीत माबोवरच कुणीतरी ज्योक केला होता - म्हणे, रजनीकांत फक्त खाजाचे कानवले खातो Happy
(ही कानवल्यांच्या अवघड कृतीवरची प्रतिक्रिया होती बहुतेक!)

Happy
गेल्या दिवाळीत तुम्ही मायबोलीवर होतात? बरीच वर्षं मायबोलीकर आहात की. काय नावाने म्हणे?

Happy
हो, ते सहा वर्षं पाहिलं. पण या आयडीने लिखाण वा मतप्रदर्शन केलेलं पाहिल्याचं आठवेना म्हणून सहज विचारलं. असो.
तुमच्या साइटची माहिती दिलीत ते बरं झालं. मला लवकरच उपयोग होईल. Happy

मृण्मयी ,आर्च ,स्वाती_आंबोळे,नलिनी ,नीधप ,दिनेशदा,स्वाती२ .सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
नीधप -मुंबईत आले कि नक्कि घेवुन येइन तुझ्या साठि!!
अक्षर्मन - सही झालाय कानवला ,पटकन उचलावासा वाटतोय!!

मृण्मयी, किती मस्त फोटो आहे. हे पण हिट लिस्टवर आहे तेवढ लक्षात ठेवा. Proud
पुडाच्या वड्या, खा.का, झिलमिल.
भगवती, अक्कांकडे दिवाळी गटगला जा. Wink न.मुं. ची उणीव पूर्ण भरून निघेल. Happy

वा काय दिसतायत. . पुन्हा पुन्हा बघतेय फोटो. मी फक्त बघणारच मला हे या जन्मात तरी जमेल असं वाटत नाही.

Pages