Submitted by बेफ़िकीर on 18 October, 2011 - 02:43
स्वप्न पडले की सफल होते असे नाही
शब्द आले की गझल होते असे नाही
खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही
सोबतीला कोण आहे हे महत्वाचे
छान जागीही सहल होते असे नाही
माणसाचे मन ठरवते रंग दुनियेचा
सूर्य आला की धवल होते असे नाही
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही
--------
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
वावा.. फार आवडली
वावा.. फार आवडली
अतिशय सहजसुंदर गझल… सलाम…
अतिशय सहजसुंदर गझल…
सलाम…
वैभव फाटक यांच्याशी सहमत.
वैभव फाटक यांच्याशी सहमत. सहजसुंदर आणि अभिवादनयोग्य गझल.
-गा.पै.
मास्टरपीस !! जबरदस्त आवडली ..
मास्टरपीस !!
जबरदस्त आवडली ..
Pages