३ अंडी,
१-२ टी बॅग्ज / १ टेबलस्पून चहा पत्ती (स्ट्राँग)
१ चक्री फूल,
३-४ लवंगा,
१ मसाला वेलची किंवा ३-४ साधी वेलची
४-५ मिरी दाणे,
दालचिनीची काडी,
१ चमचा साखर
थोडा सोया सॉस
'वर्ल्ड एग डे'
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.
ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.
फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)
फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)
फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)
फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)
**************************************************************************
फंडु अंडु - २- "मार्बल्ड टी एग्ज"
'चायनीज मार्बल्ड एग्ज' किंवा 'चायनीज टी एग्ज' हा चायनामधे नेहमी खल्ला जाणारा उपहाराचा पदार्थ आहे. खासकरुन चायनीज न्यु इयरच्या वेळेस ही एग्ज खुप प्रमाणात बनवली जातात कारण अशी समजुत आहे की ही अंडी म्हणजे 'गोल्ड नगेट्सच' जणू, त्यामुळे तुम्ही जितकी बनवाल आणि दुसर्यांबरोबर शेअर कराल तितकी भरपूर संपत्ती तुमच्याकडे येते. एरवी देखिल टेकअवे शॉप्स मधे, रेस्टॉरंट्समधे ही टी एग्ज हमखास मेन्युवर असतात.
क्रमवार पाककृती:
१. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. पहिली उकळी येताच त्यात अंडी उकडायला ठेवावीत.
२. ३-४ मिनीटे अंडी उकडल्यावर डावाने/चमच्याने अंडी हलकेच बाहेर काढुन एका बोल मधे ठेवावीत व वरुन गार पाणी सोडावे.
३. अंडी हाताळण्याइतपत गार झाली की एका टीस्पूनने अंड्याच्या वरच्या कवचाला हलकेच टॅप करावे. कवचाला तडे गेले पाहिजेत पण कवच निघता कामा नये.
४. आता अंडी ज्या पाण्यात उकळली त्याच पाण्यात (खराब झाले नसेल तर) वरील सर्व मसाल्याचे पदार्थ, चहा पत्ती/बॅग्ज, साखर इ इ घालावे व त्यात ही कवच क्रॅक केलेली अंडी सोडावीत. साधारण ४० मिनीटे अंडी गरम पाण्यात राहु द्यावीत (सिमरींग टेम्परेचर).
५. साधारण ४० मिनीटांनंतर गॅस बंद करुन पातेल्यावर झाकण ठेवावे.
६. पाणी कोमट झाले की हे पाणी, त्यातला मसाला, चहा आणि अंडी एका काचेच्या बोलमधे काढुन ठेवावीत व वरुन क्लिंग रॅप लावावे. हा बोल फ्रिज मधे ठेऊन द्यावा. अधुन मधुन अंडी पाण्यात हलवावीत.
७. कमीतकमी १२ तास आणि जास्तीत जास्त ३ दिवस ही अंडी पाण्यात राहु द्यावीत.
८. अंड्याची कवचे सोलुन काढावीत. अंड्याची कवचे काढल्यावर अंड्याच्या पांढर्या भागावर सुंदर डिझाईन उमटलेले दिसेल. तसेच टरफलाच्या आतल्याभागावर सुद्धा सुंदर नक्षी दिसेल.
९. ही सोललेली अंडी सॅलड सोबत किंवा नुसतीच स्नॅक म्हणुन खावीत. या अंड्यांना चहाचा आणि मसाल्याचा एक सुंदर स्वाद / फ्लेवर यायला लागतो.
***************
- पाणी उकळताना त्यात वर दिलेल्या मसाल्यासोबत बडीशेप, थोडे धणे आणि लिंबाचे / संत्र्याचे वाळवलेले साल घालु शकता.
- ओरिजीनल रेसिपी मधे चायनीज फाईव स्पाईस (चक्री फुल, दालचिनी, शेजवान पेपर, बडीशेपेची पूड आणि लवंगा) घातले जाते. त्याचबरोबर ब्लॅक टी आणि सोया सॉस पण घालतात.
- मी साधारण आपल्या मसाल्याच्या चहाचे घटक वापरले आहेत. अंड्याला खुप सुंदर स्वाद लागला होता. खल्यानंतरसुद्धा बराचवेळ तो स्वाद जीभेवर रेंगाळत होता.
- जितका जास्त वेळ अंडी पाण्यात रहातिल तितके जास्त गडद डिझाईन अंड्यावर उमटेल आणि तितका जास्त स्वाद अंड्यात उतरेल.
- अंड्याच्या या नक्षीदार टरफलांचे काय करावे बरे????
मस्त दिसतेय ते डीझाइन. मला
मस्त दिसतेय ते डीझाइन. मला अंड्यांपेक्षा त्या टरफलावरचे डीझाइन जास्त आवडलेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आणि सोपी पाककृती. अशी
मस्त आणि सोपी पाककृती. अशी पध्दत कधी ऐकली-पाहिली नव्हती.
धन्यवाद लाजो.
मस्त आयडिया आणि प्रयोग.
मस्त आयडिया आणि प्रयोग. फोटोही छान.
मृण्मयी + 1
मृण्मयी + 1![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाय राम! ज्या कोणी ही ओरीजिनल
हाय राम! ज्या कोणी ही ओरीजिनल पाकृ शोधली असेल तिला सलाम! लाजो, अशी आगळी वेगळी पाकृ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
टरफलांवरची नक्षी कसली भारी
टरफलांवरची नक्षी कसली भारी दिसतेय.
कधीतरी करुन बघणेत येईल. निवांतपणा असेल तेह्वा.
क्लिँग रँप म्हणजे काय? बाकी
क्लिँग रँप म्हणजे काय? बाकी पाकृ मस्त वाटतेय.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Plastic_wrap
(मृण,रुनी) + १
(मृण,रुनी) + १
वेगळीच पद्धत आहे. अगदी
वेगळीच पद्धत आहे.
अगदी नाविन्यपूर्ण!
सुंदरच दिसताहेत. टरफलांचा पण
सुंदरच दिसताहेत. टरफलांचा पण काहितरी उपयोग केला पाहिजे.
टरफलांवरची नक्षी कसली भारी
टरफलांवरची नक्षी कसली भारी दिसतेय.>> +१
लई भारी दिसतंय.
वाह वाह
वाह वाह
मस्त आहे!
मस्त आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मॄण्मयी + १ ह्या पाककॄतीची
मॄण्मयी + १![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या पाककॄतीची खासियत त्याच्या वेगळेपणातच आहे पण तरी ... इतक्या वेळ गरम पाण्यात, पाण्यात असं ठेवून अंड्यातील पोषणमूल्यं कमी नाही का होणार ? हा प्रश्न इथे अप्रस्तुत वाटत असेल तर उडवेन नंतर. कारण काही पाककॄतींमध्ये पोषणमूल्यांचा विचार करायचा नसतो, त्यांची aesthetic value जबरदस्त असते त्या पैकी ही एक आहे
भारीच
भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे हा पण प्रकार! फोटो
मस्त आहे हा पण प्रकार!
फोटो सुंदर!
सुंदर दिसताहेत अंडी मस्त!
सुंदर दिसताहेत अंडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
वा, ये अंडू तो सचमुच फंडू है
वा, ये अंडू तो सचमुच फंडू है !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लाजो, 'वेन्कीज' च्या ब्रँड अॅम्बॅसिडरबद्दल काय मत आहे तुझं?
खल्लास$$$ पार्टीसाठी छान
खल्लास$$$![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पार्टीसाठी छान अॅटम. १-२ दिवस आधी करुन ठेवता येतो. आणि मेहनतही खुपच कमी
लाजो खाण्यापेक्षा ही अंडी
लाजो खाण्यापेक्षा ही अंडी दिसतायतच इतकी सुंदर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे. करून बघायला हवी.
मस्तच आहे. करून बघायला हवी. मला वाटतं ज्याना अंड्याचा तो टिपिकल वास आवडत नाही, त्याच्यासाठी ही पाकृ हिट आहे.
दक्षी+१ खरंस सही दिसतायेत ही
दक्षी+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंस सही दिसतायेत ही अंडी
एक नंबर !! सुंदरच दिसतायेत
एक नंबर !!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सुंदरच दिसतायेत अंडी!!
पण चहा नि अंड्याचं कॉम्बिनेशन कसं असेल चवीला याचा विचार कर्तेय मी!!
दिसताहेत छान पण मीसुद्धा
दिसताहेत छान पण मीसुद्धा मी_आर्यासारखा चवीचाच विचार करतेय.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
लाजो मस्त दिसतायेत. करुन
लाजो मस्त दिसतायेत. करुन पाहायला हवे. सहि आहे हे.
फारच भारी प्रकार आहे. नक्की
फारच भारी प्रकार आहे. नक्की करणार.
ब्राऊन टरफलाची अंडी आहेत, म्हणून इतकी सुंदर नक्षी आली का? पांढर्या अंड्यांच्या टरफलांवरही अशीच नक्षी येईल का?
सगळ्यांचे आभार @ अगो, आपण
सगळ्यांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अगो, आपण थोडीच ना रोज ही अंडीखानार आहोत.. एखाद्या वेळेस एखादे अंडे खाणार - पोषण्मुल्याम्चा विचार बाजुला ठेवायचा आणि स्वाद अनुभवायचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ नादखुळा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ आर्या आणि धारा.... एकबार चखके तो देखो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ पौर्णिमा - पांढरी अंडी चहाच्या मिश्रणात मुरत ठेवली की बाहेरुन चॉकलेटी होतात आणि टरफलांना आतुन अशीच नक्षी येते.
ही नक्षी टरफल वाळल्यावर खुप फिक्कट दिसत्येय. उद्या फोटो टाकेन.
सही,,,एकदम हटके! कर्के देखनाच
सही,,,एकदम हटके!
कर्के देखनाच पडेंगा!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रुनी+१
रुनी+१