आधार

Submitted by bnlele on 8 October, 2011 - 02:08

आधार

नवा उपक्रम-शासन देणार,
कागदावर जनतेला आधार !
फार्म भरा-महिन्याने मिळणार !
करून असले सोपस्कार-
फायदा कुणाला मिळणार ?
नक्की कळेल त्यांनाच- गुप्त विचार,
कोण कधि दंड थोपटणार -अन्‌,
बंदोबस्त कसा त्याचा होणार.
सर्वत्र तेच आवश्यक असणार.
अजून माजणार भ्रष्टाचार ! !
अर्जुन संभ्रमात असता-
भगवंत सांगती गीता, अन्‌ आता,
संभ्रमात जनता-अन्‌ एकटे अण्णा !
हजारे- नव्हे प्रत्यक्षात ते असंख्य-
लवकरच होणार, नक्कीच होणार

गुलमोहर: 
शब्दखुणा: