चिकन चे मध्यम तुकडे २ पाउंड
एक मध्यम कांदा बारीक चिरुन
लसूण दोन पाकळ्या बारीक चिरून
आले अर्धा इंच बारीक चिरून
एक मध्यम टॉमेटो बारीक चिरून
हिरव्या मिरच्या १-२ उभ्या चिरुन
कोथिंबीर ४-६ काड्या
पुदिन्याची पाने ४-६
मीठ, हळद, तिखट,
मालवणी मसाला / दगडू तेली मसाला / शानचा बिर्यानी मसाला / गरम मसाला यापैकी एक - २ टेबलस्पून
एक कप भाज्या ( फरसबी, बटाटा, फ्लावर, गाजर, वाटाणे, फुग्या मिरच्या )
दोन वाट्या तांदूळ ( मी बासमति वापरते, पण कुठलाही बारीक , लोंग ग्रेन तांदूळ मस्त लागतो )
चिकनच्या तुकड्यांना हळद तिखट मीठ लावून ठेवा.
ओव्हन ४०० डि फॅ ला तापत ठेवा.
एका ओव्हन प्रूफ भांड्यात कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची , भाज्या पसरवा. त्यावर थोडे मीठ शिंपडा. त्यावर चिकनचे तुकडे पसरवा. त्यावर आपल्या आवडीचा मसाला शिंपडा. कोथिंबीर, पुदिना ची पाने हातानेच तोडून शिंपडा. पाहिजे तर थोडा साबूत गरम मसाला ( लवंग दालचिनी वेलची मिरे ) पण घालू शकता.
त्यावर दोन वाट्या धुतलेले तांदूळ पसरवा. त्यावर चार वाटी पाणी अगदी हलक्या हाताने ओता.
वरुन फॉइलने गच्च झाकून ४०० डि व ३५ ते चाळीस मिनिटे बेक करा
बेक करायच्या अगोदर थोडे लोणी पण घातले तर खमंग स्वाद येतो.
Arroz Con Pollo ही दक्षिण अमेरिकेतल्या बर्याच देशातली प्रसिद्ध डिश आहे. तांदूळ अन चिकन वगळता त्यांचे साहित्य अगदी वेगळे असते.
म्हणून ही डिश Arroz Con Pollo इन इंडियन स्टाइल .
छान वाटतेय रेसिपी. नेटवरचे
छान वाटतेय रेसिपी. नेटवरचे काही काही फोटोज फारच टेंप्टिंग आहेत. देसी व्हर्जनचा फोटो पहायला आवडला असता. नक्की ट्राय करणार हे वन डिश मील.
छान आहे बेक्ड बिर्याणी ची
छान आहे
बेक्ड बिर्याणी ची बहिण रेसिपी
>>ओव्हन प्रूफ भांड्यात कांदा,
>>ओव्हन प्रूफ भांड्यात कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची , भाज्या पसरवा.
म्हणजे आले लसूण पेस्ट भाज्यांना लावायची का? कळलं नाही
पेस्ट नाही लावायची. भाज्यांचे
पेस्ट नाही लावायची. भाज्यांचे तुकडे साधारण इंचभराचे अन आलं -लसूण-कांदा हिरवी मिरची हे बारीक चिरुन घ्यायचे . अन सगळे भांड्यात तळाशी पसरायचे.
प्रॅडी, ही माझी घाईच्या वेळी करायची डिश आहे. अॅक्टिव्ह कुकिंग वेळ १५- २० मिनिटे आहे. एकदा पातेलं ओव्हनमधे गेलं की अर्धा तास होमवर्क बघायला निवांत मिळतो :-). त्यामुळे फोटो काढणे होत नाही. पुन्हा केले तेंव्हा ( आठवलं तर) काढेन फोटो.