ऑपरेशन ट्वीस्ट : अमेरिकेचा नवीन आर्थिक उपचार

Submitted by AmitRahalkar on 25 September, 2011 - 07:52

----
२००८ सेप्टेंबर मधे जे आर्थिक वादळ उठले त्याने पहिले न्यूयॉर्क मधील वॉल स्ट्रीट च्या बँकांचा कायपालट केला. आणि नंतर अमेरिकेच्या राजकारणाचा ही ' काया '- पालट केला ! वाचकांना आठवतच असेल की २००८ वर्ष अमेरिकेचे निवडणुकीचे वर्ष होते. दर चार वर्षांनी नोवेंबर होणार्‍या ह्या निवडणुकीमधे त्या वर्षीच्या सेप्टेंबर महिन्यापर्यंत मॅकेन महाशय पॉप्युलर पोल्स मधे आघाडीवर होते. बरे त्यात काही नवल नव्हते , कारण त्यांचे प्रतिस्पर्धी ओबामा नावाचे एक ' कृष्णवर्णीय ' महाशय होते ! पण १५ सेप्टेंबर ला लेहमान ब्रदर्स बँकेने दिवाळे घोषित केले व त्यानंतर च्या काही दिवसात मॅकेन महांशयांनी अर्थशास्त्राबद्दील पाजळलेल्या प्रांजळ मतांनी त्यांनाच चटका दिला वा ओबंमणा थेट वाइटहाउस मधे प्रस्थापित करण्यात हातभार लावला !

त्या घडामोडींना ह्या महिन्यात ३ वर्षे होतील. गेल्या हजार एक दिवसात बर्‍याच भल्या बुर्या घटना घडल्या. बुर्या च जास्ती झाल्या म्हणा! जसे की ह्या आर्थिक झंझावाताने अखक्या जगाला व्यापणे. पण एक महत्वाची भली गोष्ट मात्र अशी की अमेरिका ठेचकाळात का होईना ह्या वादळात अजुन ही तग धरून उभी आहे.

आणि ह्याचे श्रेय मुख्यत: अमेरिकेच्या सरकार ला जाते.

जुलै २००८ मधे बुश सरकारने ने "हाउसिंग अँड ईकोनॉमिक रिकवरी एक्ट" अमलात आणला. पण तो काही फारसा जम धरू शकला नाही. मग सरकारने फॅनी मे आणि फ्रेडी मॅक संस्थांचा कब्जा घेतला. ह्या संस्था तेंव्हा अख्या मोर्टगेज मार्केट च्या ४० % भागाशी निगडीत होत्या आणि ' पाणी पीत ' होत्या. त्यांना डूबण्यापासुन सरकारने वाचवले नसते तर हल्लकल्लोळ उडाला असता. मग सप्टेंबर मधे ए आई जी नावाच्या इन्षुरेन्स कंपनी ला वाचावले. आणि शेवटी ऑक्टोबर दरम्यान "ट्रबल असेट रिलीफ प्रोग्रॅम" च्या अंतर्गत अख्या बँकिंग क्षेत्राला वाचवले.

२००९ मधे ओबामा सरकारआल्या नंतर सुद्धा ही गाथा सुरुच राहिली. फेब्रुवरी २००९ मधे त्यांनी "अमेरिकन रिकवरी अँड रीईनवेस्टमेंट एक्ट" पास केला. त्यानंतर काहीं महिन्यातच कार इंडस्ट्री ला मदत पुरविल्या गेली. २०१० वा २०११ साली क्वांटिटेटिव ईज़िंग नावाचा ' उपचार ' केला गेला . हा ' उपचार ' म्हणजे गवर्नमेंट चे बॉन्ड्स फेडरल रिज़र्व विकत घेते . त्यामुळे अधिक पैसा चलनात येऊन , पैसा पैश्याला वाढवून समाजाची सर्वोननती व्हावी अशी अपेक्षा असते.

हे सारे उपचार म्हणजे पोटात दुखतय म्हणून संपूर्ण शरीरावर कीमो थेरपी चा भडिमार केल्या सारखे झाले. खर्या अपचनाचे मूळ तर बेबन्द बांधलेली , विकलेली , आणि आता टाळा-बंदी होऊन पडलेल्या घरांमधे आहे. आणि ते मूळ शाबूत आहे. ३० करोड आबादी च्या देशात १३ करोड च्या जवळपास घरे आहेत. म्हणजे अक्षरश: प्रत्येक २ माणसामागे जर एक घर एखादा समाज बांधत असेल तर होणारे अपचन सुद्धा नभुतोन भविष्यती च होणार !

आणि म्हणूनच सेप्टेंबर २१,२०११ ला फेडरल रिज़र्व ने ' ऑपरेशन ट्वीस्ट ' नावाच्या ' नवीन इंजेक्षन ' ची केलीली घोषणा हे ह्याच मुळाला उद्देशून आहे. ह्या प्रस्त्वाप्रमाणे फेडरल रिज़र्व ६ - ३० वर्षांनी मेच्यूर होणारे बॉन्ड्स विकत घेईल वा ० ते ६ वर्षा मधील मेचुरिटी चे बॉन्ड्स विकेल. म्हणजे नजीकच्या भविष्यातील बॉन्ड्स चे व्याज आणि दूरच्या भविष्यातील बॉन्ड्स च्या व्याजाचा संबंध एका अर्थे ' ट्वीस्ट ' होईल. कारण बॉंड ची जितकी जास्ती मेचुरिटी तितकी जास्ती अनिश्चितता आणि तितकेच जास्ती व्याज साधारणतः असते. सरकारने अशा तर्हेने मोर्टगेज मार्केट्स मधले दूर भविष्यातील बॉन्ड्स , जे सहसा ७ , १५ , वा ३० वर्षे मेचुरिटी असतात , घेतल्यास त्या बॉन्ड्स वरचे व्याज कमी होईल. म्हणजे लोकांना ह्या कमी दारात घरे रीफाईनांस करणे फायद्याचे पडेल. एखाद्या साधारण घराचा पी एम आय़ चा वाटा मासिक आमदानी च्या एक तृतियांश असतो आणि त्या रकमेतील निम्मा वाटा हा या व्याजाचा असतो. म्हणजे रीफाईनांस केल्यास लोकांची मासिक पगारातील बचत वाढेल , म्हणजे लोक तो पैसा दुसरीकडे खर्च करू पाहतील , जेणेकरून अर्थ व्यवस्थेतील खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढेल , पैसा पुन्हा एकदा अर्थ प्रणालीत खेळू लागेल व हळू हळू हे आर्थिक वादळ शमेल .... अशी आशा !

ही झालीअमेरिका स्वरुप रुग्णाची गाथा. आणि हा रुग्ण शाबूत असला तरी ' दवाखान्यातील ' रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. ग्रीस ला मागील वर्षी जर्मनी आणि फ्रॅन्स च्या ' डॉक्टरानी ' जीवनाचे बाळकडू देऊन कर्जापासून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला होता. तर ह्या वर्षीच्या सुरवातिपसुन च त्याचे शेजारी पाजारी म्हणजे इटली , स्पेन अ पोर्तुगाल मंडळी , रुग्णालयात गर्दी करू पहाताहेत. आणि युरोपियन कमर्षिल बॅंक नावाच्या डॉक्टर ची फे फे उडत असतांनाच गेल्या काही दिवसांपासून ग्रीस पुन्हा एकदा सलाइन लावून घ्यायला दाराशी उभा आहे!

अटलांटिक महासागराच्या अल्याड व पल्याड जमा होणारी रुग्णांची अशी ही गर्दी पाहता गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठेतून पळता पाय घेतात आहेत आणि सर्वदूर स्टॉक मार्केट्स कोसळतात आहेत ह्यात नवल नाही.

कुठल्याही जीवघेण्या रोगाचा निदान व्हायला सहसा वेळ लागतो . आणि अशा क्लिष्ट रोगावर दिलेले औषध पहिल्याच झटक्यात लागू पडेल ह्याची १०० % खात्री अगदी डॉक्टर ला ही नसते. त्यामुळे आता फक्त भविष्यालाच ठाऊक की उपचारांच्या ह्या श्रुन्खलेतिल ' ऑपरेशन ट्विस्ट ' ह्या रुग्णला परत चालता फिरता करते की अजुनच लम्बा करते !

गुलमोहर: 

हा माझा लेख काल महाराष्त्र टाइम्स मधे प्रकाशीत झाला. हा च लेख इथे हि प्रस्तुत करण्या मागे आशा अशी की वाचक प्रतिसाद देतील.
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10104792.cm
)

<

उत्सुकतेने लेख वाचायला घेतला पण अपेक्षाभंग झाला. ट्वीस्ट बाबात एक छोटा पॅरा Sad

तसेही रेट कितीही खाली गेले तरी होम अंडरवॉटर असेल तर रिफायनान्स करणे कठिण. जो पर्यंत गावागावातून लोकांना लेऑफ मिळतायत तोपर्यंत हातात रिफायनान्स केल्याने थोडा जास्त पैसा आला तरी तो खर्च करायला धीर होईलच असेही नाही. नवे घर घेतानाही जॉब किती टिकेल याचा विचार करता रेट लो असला तरी नवे कर्ज डोक्यावर घ्यायची लोकांची तयारी नाही. तेव्हा या हॉरर स्टोरीतला नवा ट्वीस्ट माझ्या गावातील इकॉनॉमी सुधारायला फारशी मदत करेल असे वाटत नाही.

त्सुकतेने लेख वाचायला घेतला पण अपेक्षाभंग झाला >> अनुमोदन.

गाथा अक्षरक्षः दोन प्यार्‍यात संपते. हा धावता आढावा पण वाटला नाही. इन फॅ़क्ट तुम्ही डेफिशिट कशी कमी करत आहेत (इतर खर्च कपाती) तो उपाय बरोबर आहे की नाही हे (म्हणजे रूग्न असल्यामुळे) त्यावरची प्रतिक्रिया काय? हे सर्व लेखात पाहिजे होते.

स्वाती२,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. हा उपचार कितपत मदत करेल शन्का आहे व म्हणुन च मार्केट धडाधङ कोसळलीत . मार्केट ला क्वान्टीटेटीव ई झिन्ग ३ चि अपेक्शा होती. पण इन्फ्लेशन ची भीती असल्याने फे ड कडे आता फारसे उपाय राहिले नाहीत.

केदार,
लेख वाचल्या बद्दल आभार.
ह्या ओपेरेशन चे आणि डेफीसीट कमी करण्याचा काही सम्भध नाही.म्हणुन त्याची माहिती ह्या लेखात नाही.
हा प्रोग्रम फेड चा आहे. डेफीसीट कमी करणे कोन्ग्रेस ची जिम्मेदारी आहे. कोन्ग्रेस ने एक समीती नेमलि आहे. जीचा अहवाल नोवेम्बेर मधे प्रस्तुत होणार आहे. त्याना १.५ ट्रीलीयन डोलर्स ची कपात (पुढल्या १० वष्रे कालावधीत) करण्यासाठी क्शेत्रे शोधायची आहेत.