मागे झपाटल्यासारख्या पेंटब्रशमधे मी साड्यांची चित्रे काढली होती. पेंटब्रशच्या मूळ सुविधाच मी वापरत
होतो आणि मनासारखी डीझाईन्स जमतही होती. पण मूळ सुविधा वापरुन कापडाचा पोत काही जमत नव्हता.
सगळ्या साड्या सपाट (फ्लॅट) वाटायच्या. तलमपणा वा पोत नजरेला जाणवत नसे,
इथले पहिले काहि नमुने तसेच आहेत. शिवाय रंगाची हवी ती छटाही मिळत नसे, माझे प्रयत्न चालूच होते.
मग अचानक एका नव्या तंत्राचा शोध लागला, आता मला पोताचा साधारण अभास जमू लागला.
मग काहि नमूने तसेच केले.
आणि मग काही भरतकामाचा भास होईल असेही नमूने जमू लागले. (म्हणजे मला असे वाटले खरे.)
इथले नमुने प्रगतीच्या टप्प्याच्या क्रमानेच दिले आहेत.
भाऊंसारखे कसबी कलाकार हे तंत्र वापरुन बरेच काही चितारू शकतील. माझी कुवत नक्कीच तोकडी
पडलीय.
2 हा नमुना पण जुन्याच तंत्राने
3 इथे तंत्र तोकडे पडले असे जाणवले
7 इथे जरा पोतावर जास्त प्रयोग केले
8 मग साधे डिझाईन, नव्या तंत्रात
13 मग थोड्या बुट्ट्या करुन बघितल्या
दिनेशदा ! अशा करिगरिने
दिनेशदा !
अशा करिगरिने "बयकांच्या 'अपेक्षा' आणि पुरुषांचा ' न्युनगंड ' का काय म्हणतात तो ? या दोन्ही गोषटी वाढ्तील " !!!. पण, तुमची डिझाईन्स सोsssलीssssड
दिनेश दा... खुपच मस्त आहेत
दिनेश दा... खुपच मस्त आहेत डीझाइन्स

............/\.............
छान. १४चा पोत, रंग आणि बॉर्डर
छान. १४चा पोत, रंग आणि बॉर्डर छानच जमली आहे. अगदी फोटो काढावा अशी.
छानच! १३,१४,१५ खूप आवडल्या
छानच! १३,१४,१५ खूप आवडल्या
सुरेख जमलय.
सुरेख जमलय.
दिनेशदा - तुम्ही तर जन्मजात
दिनेशदा - तुम्ही तर जन्मजात कलाकार आहात...........
सलाम........
दिनेशदा, तुम्ही विश्वास
दिनेशदा, तुम्ही विश्वास दाखवलात म्हणून रांगड्या 'ब्लँकेट'पासून प्रयत्नाना सुरवात केली आहे. कदाचित हळू हळू थोडं जमेलही. कान पिळायला तुम्ही अहातच ! -
३, ११ आणि १३ नं. च्या साड्या
३, ११ आणि १३ नं. च्या साड्या फारच आवडल्या. ब्लँकेट ही छान.
मस्त
मस्त
सही$$$
सही$$$
भाऊ, स्प्रे गन वापरली नसती
भाऊ, स्प्रे गन वापरली नसती तरी चालले असते. ती वापरली तर हात झरकन फिरवावा लागतो नाहीतर एकाच जागी तो रंग बसतो.
दिनेशदा , काय फोटो
दिनेशदा ,
काय फोटो काढ्लेत !!! कुठ्ल्या ही angle ने पाहीले तरी Paint Brush चा वापर केलाय हे पटणारच नाही.
मी स्वता: Paint Brush चा वापर project Conceptual drawings for Client साठी करतो, पण हे फोटो
पाहील्या वर सर्व अभिमान गळून पडला.
मला एकही फोटु दिसत नाहीये
मला एकही फोटु दिसत नाहीये
बाहेर स्टोअर केलेल्या फोटोन्ची लिन्क दिल्यास मला काहीच दिसत नाही
विवेक, प्रतिक्रिया वाचून धन्य
विवेक, प्रतिक्रिया वाचून धन्य धन्य वाटले.
लिंबू, कसे केले तर दिसेल ? फेसबुक वर टाकू का ?
<< स्प्रे गन वापरली नसती तरी
<< स्प्रे गन वापरली नसती तरी चालले असते >> खरंय, दिनेशदा.
खुपच छान,३,११,१३व१४ खुप
खुपच छान,३,११,१३व१४ खुप आवड्ल्या.
१४ नंबरची लय भारी
१४ नंबरची लय भारी है....
दिनेशदा ग्रेट!!
१० नंतरच्या सगळ्या सुंदर
१० नंतरच्या सगळ्या सुंदर आहेत. अगदी ख-या वाटतात, पटकन हात लावुन पोत बघाव्याश्या
नाही दिनेशभौ, बाहेरच्या
नाही दिनेशभौ, बाहेरच्या कोणत्याही साईट्स ब्यान आहेत आमच्या इथे
तर दिसेल ते
२०० केबी च्या आतील लहान प्रत बनवुन माबो वर अपलोडकरुन इथेच टाका ना!
लिंबू, नव्या बीबीवर एक देतो
लिंबू, नव्या बीबीवर एक देतो तशी.
Pages