चिंचा धुवुन आख्ख्याच त्या बुडतील इतक्या पाण्यात थोडावेळ उकडत ठेवा. उकळल्या की चिंचांची साले आपोआप फुटतात.
उकडलेल्या चिंचांची जमतील तेशी साले काढून घ्या म्हणजे गाळायला जास्त त्रास होणार नाही. मग साले काढली की चिंचा चांगल्या खुळून घ्या आणि हे पाणी एका भांड्यात गाळून घ्या. चोथा टाकुन द्या कारण त्यात असणार्या चिंचांच्या सालांची कच लागते.
१ चमचा मोहरी, मेथी आणि तिळ वेगवेगळे भाजून एकत्र मिक्सरमध्ये पुड करा.
कढई चांगली तापवा व त्यात तेल गरम करुन अर्धा चमचा राई, जिर, हिंग ची फोडणी द्या. त्यात मिरच्या घाला. जर लोणचे लगेच खायचे असेल तर मिरच्या थोड्या जास्त वेळ ठेउन नरम शिजवा आणि जर २-३ दिवसांनी खायचे असेल तर थोडा वेळ ठेउन थोड्या कडक शिजवल्यात तरी चालेल. नंतर गॅस बंद करुन त्यात मिक्सरमधुन काढलेली पुड, मिठ, गुळ (ऑप्शनल) घाला.
हे सगळे मिश्रण चिंचेच्या रसात ओता. मिश्रण रसात चांगले ढवळून घ्या आणि खायला सुरुवात करा.
वरच्या फोटोतील बाऊल खोलगट असल्याने लोणचे कमी दिसत आहे. पण भरपुर झाले होते. अर्धा कोलोची बरणी भरली होती.
ही रेसिपी मायबोली आयडी सारीका हिच्या सासुबाईंनी मला फोनवर दिली. त्यासाठी सारीका आणि तिच्या सासुबाईंचे धन्यवाद.
सारीकाने मला काही दिवसांपुर्वी सांगितले होते की तिच्या सासूबाई वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवतात. अनायसे आमच्याकडे १६ तारखेला साखरचौथीचा गणपती होता. काहीतरी स्पेशल करायचे म्हणून कोथिंबीरवडी आणि सारीकाच्या सासूबाईंना विचारून एखादे वेगळे लोणचे करु असे मनात ठरवले. सारीकाने तिच्या सासुबाईंच्या हातात फोन सुपुर्द केला आणि माझ्याकडे एक हटके लोणच तयार झाले.
हे लोणचे आमच्याकडे सगळ्यांना वेगळे व इतके चविष्ट लागले की सगळ्या पाहूणे मंडळींच्या तोंडात ह्या लोणच्याचीच स्तुती होती. सगळ्यांनी परत परत मागीतले. विशेष म्हणजे माझ्या मुलीने त्याचा रस प्रत्येक वेळी जेवताना मागुन घेतला. सगळ्यांनी मला लोणच्याची रेसिपी विचारली. लोणचे भरलेली बरणीने पहील्याच दिवशी तळ गाठला. ह्याचे सगळे श्रेय सारीकाच्या सासूबाई व सारीका ह्यांना.
कच्च्या चिंचा मिळणे हल्ली कठीण काम झाले आहे. माझ्या आईकडे झाडे आहेत म्हणून मी माझ्या वहीनीला फोन केला. जवळच्या झाडाला नव्हत्या म्हणून तिने गवतात असणार्या भागात जाऊन माझ्यासाठी चिंचा काढून आणल्या त्यासाठी तिलाही चिंचांचे श्रेय.
आता ह्या लोणच्याच्या सारीकाच्या सासुबाईंनी दिलेल्या काही टिपा.
कुटातली राई भाजली नाही तरी चालेल. पण मला पुड करताना सगळेच भाजायची सवय असल्याने मी भाजली.
तिळ हे जास्तच घ्यायचे अगदी ४ चमच्यांच्या वर घेतले तरी चालतील त्यामुळे लोणच्याला दाटपणा येऊन चांगली चवही येते.
सारीकाने सांगितले होते की गुळ आजिबात नको घालू पण माझा हात ऐकायला तयार नाही. मी थोडा घातलाच चवीपुरता अगदी थोडा.
हे लोणचे नेहमी फ्रिज मध्ये ठेवायचे. १५-२० दिवस टिकू शकते.
जागू , लोणचं अमेझिंग
जागू , लोणचं अमेझिंग दिसतेय !!! फोटोज ( कहर म्हणजे हिरव्या चिंचेचा रस ) पाहून तर तोंडाला जब्बरद्स्त पाणी सुटलंय .
सारिका , तुला आणि सासूबाईंना मोठ्ठे धन्यवाद . पण आता मात्र अजून अशाच भरपूर रेसिपीज पाहिजेत हं .
जागु, इतक्या उचक्या लागल्या
जागु, इतक्या उचक्या लागल्या आहेत..!
ही पुर्ण रेसीपी जागुमय आहे..
संपदा धन्यवाद. सारीका
संपदा धन्यवाद.
सारीका सा.बांना दाखव ग फोटो.
व्वा मस्तच....करुन बघावे
व्वा मस्तच....करुन बघावे लागेल
धन्य ! सारीका, सारीकाच्या
धन्य ! सारीका, सारीकाच्या साबा आणि जागू, जागूची वहिनी यांना धन्यवाद हे अफाट लोणचे दाखवल्याबद्दल.
जागू, चिंचांसाठी वाट्टेल ते !
रेसिपि चांगली आहे हे आम्हाला
रेसिपि चांगली आहे हे आम्हाला कच्च्या चिंचा भेटल्यावरच म्हणाणार
जागू, चिंचांचा फोटो न
जागू, चिंचांचा फोटो न टाकल्याबद्दल तुझे आभार!
जागु, त्या तुला फोन करणारच
जागु, त्या तुला फोन करणारच आहेत..
नाहीतर लाळगळती सुरु झाली असती
नाहीतर लाळगळती सुरु झाली असती सगळ्यांकडे.
खरंच छान. कच्च्या चिंचा आता
खरंच छान. कच्च्या चिंचा आता बाजारात पण नसतात.
मी अलिकडेच एक बर्मीज प्रकार वाचला, त्यात चिंचेचा कोवळा पाला आणि सुकट वापरले होते.
जागू, ट्राय करणार का ?
हो हो दिनेशदा माझी आई चिंचेचा
हो हो दिनेशदा माझी आई चिंचेचा पाला ऋषीच्या भाजीतही घालते.
सारीका चालेल. मला अजुन रेसिपीज मिलतील. धन्स.
स्मीतू धन्स.
अश्विनी हो ग.
वर्षा, मंजूडी तो फोटो वर अपलोड झाला नाही पण इथे टाकते आता.
वा वा.. मस्त मस्त... तों. पा.
वा वा.. मस्त मस्त... तों. पा. सु.
आहाहा, चिंचेच्या रसातले
आहाहा, चिंचेच्या रसातले लोणचे. साहित्य सापडले तर नक्कीच करून बघणार.
धन्यवाद जागू.
सारीका, तुमच्या सासुबाईंच्या अजून लोणच्याच्या रेसेपीज इथे द्याल का?
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
यम्मी...... पण त्या हिरव्या
यम्मी......
पण त्या हिरव्या चिंचा कुठुन आणायच्या आता आम्ही
ज ब र द स्त प्रकार! जागुतै,
ज ब र द स्त प्रकार! जागुतै, दंडवत! रच्याकने, तुला माझ्या साबांना भेटवलं पाहिजे! त्यांच्याकडे रेसिपीज मिळणार नाहीत फारशा पण त्यांचा उत्साह तुझ्यासारखाच दांडगा आहे शिवाय निसर्गाच्या गप्पा! सारीकाच्या साबांचे आभार!
मस्त! सध्या फक्त फोटोतल्या
मस्त!
सध्या फक्त फोटोतल्या चटणीवरच समाधान मानयचे.
चिऊ, स्वाती,सायो, नलिनी
चिऊ, स्वाती,सायो, नलिनी धन्यवाद.
लाजो तु कधी येणार आहेस ?
वत्सला मला आवडेल तुमच्या सा.बांना भेटायला.
सारीका तुझे आणि तुझ्या
सारीका तुझे आणि तुझ्या साबाईंचे आभार. जागू इथे सचित्र कृती टाकल्याबद्द्ल खूप आभार. लहानपणीच्या इतक्या आठवणी या लोणच्याशी निगडीत आहेत!
जागू भारीच आहेस गं! आता
जागू भारीच आहेस गं! आता हिरव्या चिंचा शोधायला जाते.
हे थोडं शिजवलेल्या मिरच्यां
हे थोडं शिजवलेल्या मिरच्यां सारखं आहे. पण हिरव्या चिंचेच्या कोळात छान लागत असेल. शिजवलेल्या मिरच्याही रुनीने चिंचेच्या कोळात करुन पाहिल्यात.
मानुषी धन्स. नाही लालू तो
मानुषी धन्स.
नाही लालू तो वेगळा प्रकार आहे. रुनीने केलेल्या मिरच्या आमच्याकडे गणपतीत किंवा लग्नांच्या जेवणात करतात.
चिंचांचा फोटो न टाकल्याबद्दल
चिंचांचा फोटो न टाकल्याबद्दल तुझे आभार! >>>> अनुमोदन
वेगळंच लोणचं आहे.
नाव वाचल्या पासूनच
नाव वाचल्या पासूनच तों.पा.सु.. .. मिर्ची-चिंच- लोणच्याचा खार.. slurp.. नुसतेच फोटो.. ये न्याय नै अन्याय है..!
भारीच रेसिपी. एकदम यम्मी
भारीच रेसिपी. एकदम यम्मी दिसतेय
एकदम मस्त प्रकार दिसतो आहे.
एकदम मस्त प्रकार दिसतो आहे. पण कच्य्या चिंचा नाही मिळाल्या तर काय करायचे आम्ही पामरांनी?
सिंडरेला, सावली धन्स.
सिंडरेला, सावली धन्स.
दिपांजली
लिना हेच लोणचे लिंबाच्या रसातही करता येते.
तोंपासू.... कसल मस्त दिसतय.
तोंपासू.... कसल मस्त दिसतय. लिंबाच्या रसातले लोणचे लगेच करण्यात येईल.
हे बघ मी केल. मस्त झालंय. २ लिंबांचा रस टाकला पण अजून थोडा टाकावा लागेल.
अखी मस्तच दिसत आहे ग.
अखी मस्तच दिसत आहे ग.
जागू, काल चिंचेचे लोणचे केले,
जागू, काल चिंचेचे लोणचे केले, गुळ नाही वापरला, मोहरीचा कूट थोडा जास्त घातला आहे.. चव अप्रतिम झाली आहे..
Pages