मसाल्यासाठी साहीत्य-
तेल ४ टी स्पून
सुक्या लाल मिर्च्या १५
हरबरा डाळ २ टेबल स्पून
उडीद डाळ २ टेबल स्पून
धने: १ टेबल स्पून
जिरे २ टी स्पून
मेथी ८ दाणे
मिरे १८ दाणे
दालचिनी ४ छोटे तुकडे
लवंग ६
सुके किसलेले खोबरे १/२ (अर्धी) वाटी
शिजवण्यासाठी साहित्य-
चिंचेचा लिंबा एवढा गोळा
तुर डाळ १ वाटी
तांदुळ १ १/२ (दिड) वाटी
३ कांदे मध्यन आकारत चिरून
शेंगदाणे १/२ वाटी (ऐच्छीक)
हळद १ टी स्पून
हिंग १/२ टी स्पून
मीठ चवीनुसार
गुळ चवीनुसार
साजुक तुप ४ टेबल स्पून
मोहरी जिरे हिंग कढीपत्ता फोडणी साठी
काजू १० ते १२
सजावटीसाठी-
ओल्या नारळाचा चव
चिरलेली कोथिंबीर
मसाल्याची कृती
१) मसाल्यासाठी सर्व प्रथम एका कढईत तेल घेऊन लाल मिर्च्या थोड्या परतून डीश मधे काढून घ्याव्या, त्याच तेलात हरबरा डाळ थोडा वेळ परतून, त्यातच उडीद डाळ टाकुन परतावे. दोन्ही डाळी लाल झाल्या की त्यातच धने टाकून थोडे परतावे, त्यानंतर जिरे टाकून परतावे, नंतर मेथी दाणे, मिरे, दालचिनी, लवंग टाकून अजून थोडेसे परतावे. सर्वात शेवटी किसलेले सुके खोबरे घालुन मिश्रण चांगले परतून घ्यावे..
हा मसाला थंड झाल्यावर मिक्सर मधुन बारिक पावडर करून घेणे.
२) १ वाटी पाण्यात चिंच अर्धा तास भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.
३)कढईत अथवा जाड बुडाच्या पातेल्यात (मी कुकरच वापरला) तुरीची डाळ धुवून ६ वाटी घेऊन त्यात हळद हिंग घालून शिजत ठेवावी, डाळ अर्धी शिजल्यावर त्या धुतलेले तांदुळ, कांदा, चवीनुसार मीठ व गुळ घालावा.. तयार केलेला मसाल्यातील अर्धा मसाला पाण्यात कालवून घालावा. (मसाल्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून पाण्यात कालवून घालतात.) मिश्रण शिजू द्यावे.
भांड्याच्या बुडाला लागू नये म्हणून मधे मधे मिश्रण पळीने ढवळावे.
डाळ तांदुळ शिजल्यावर त्यात चिंचेचा कोळ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे..
गरजेनुसार गरम पाणी टाकत जावे.
४)साजुक तुप गरम करून त्यात शेंगदाने काजू थोडे परतून त्यातच मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून ती फोडणी भाताला द्यावी..
मिश्रण चांगले ढवळावे.
ताटात वाढुन वरून ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून वाढावे..
याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.
१) हा मसाला साधारण पणे दोन वेळच्या भातासाठी पुरतो.
उरलेला मसाला काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमधे ठेवावा.
२) हा भात जास्ती शिजलेला मऊसर आसट करतात..
३) याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.
४)ही रेसीपी जागूच्या आग्रहास्तव लिहीली आहे.. धन्यवाद जागू..
५) यातील सजावट दिनेशदांच्या रेसीपींच्या सजावटीवरून प्रेरीत
(दिनेशदा, यासाठी तुम्हाला रॉयल्टी देणार नाही हं..!)
मस्त दीसतेय थाळी.
मस्त दीसतेय थाळी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पाककृती. एकदम ऑथेंटिक.
मस्त पाककृती. एकदम ऑथेंटिक. फोटो पण मस्त आहे.
यात गाजर, मटर, ढोबळी मिरची, शेंगा अशा भाज्या घालून पण झकास चव येते.
अगदी ओरिजीनल रेसिपी. (नाव
अगदी ओरिजीनल रेसिपी. (नाव बहुतेक बिसि बेळे हुळी अन्ना.. असे काहितरी आहे ना ?)
अगदी बरोबर दिनेशदा.. या
अगदी बरोबर दिनेशदा..
या भाताला तेलुगू मधे बिसबिली भात म्हणतात..
मस्त पाककृती. एकदम ऑथेंटिक.
मस्त पाककृती. एकदम ऑथेंटिक. फोटो पण मस्त आहे.
यात गाजर, मटर, ढोबळी मिरची, शेंगा अशा भाज्या घालून पण झकास चव येते.>>
अनुमोदन
धन्स सारीका
धन्स सारीका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कानडी प्रकार अन कानडी नाव आहे
कानडी प्रकार अन कानडी नाव आहे - बिसी ( गरम) बेळे ( डाळ) हुळी ( आंबट) अन्ना ( भात ) .
ऑथेंटिक रेसिपी हविच होती मला.
ऑथेंटिक रेसिपी हविच होती मला. मी सांबार मसाला घालुन करायचे.
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव्..एक्दम तोंपासु
वॉव्..एक्दम तोंपासु प्रकार..
तुम्ही वाटलेल्या मसाल्यापैकी अर्धा वापरलाय म्हणून विचारलं.. हा मसाला करून, बाटलीत स्टोअर करून ठेवता येतो का??
हो वर्षू , हा मसाला काचेच्या
हो वर्षू , हा मसाला काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये स्टोअर करता येतो.
सारीका रेसिपीबद्दल खुप खुप
सारीका रेसिपीबद्दल खुप खुप धन्यवाद. मी नक्की करून बगणार बिसीबेळीहुळीअन्ना!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अन ते ६ वाटी पाणी घ्यायच का? ते जरा स्पष्ट केलंस तर बरं होइल. बाकी डिश बघून एक्दम तोंपासु. आज उप्वास!
मस्त भात - आवडला
मस्त भात - आवडला
टोकु, तुरीची डाळ शिजण्यासाठी
टोकु, तुरीची डाळ शिजण्यासाठी ६ वाटी पाणी घ्यायचेच, अजुन भात शिजतानाही गरजेनुसार गरम पाणी अॅड करायचे.. हा भात थोडा पातळसर छान लागतो..
हा तेलुगु(पण) पदार्थ आहे हे
हा तेलुगु(पण) पदार्थ आहे हे माहित नव्हते. आमच्याकडे कानडी स्पेशल समजला जातो हा प्रकार.
या भातामधे शेंगदाणे (फोडणीतच नाही तर भात शिजताना) घालतात. तसंच गाजर्/बीन्स/मटार अशा वेगवेगळ्या (किंवा एकत्र) भाज्या घालून करता येतो. वन डिश मिल असल्याने सोबत लोणचं पापड अस्लं तरी पुरेसं होतं. आणि हा भात साधारण पळीवाढा करायचा असतो.
अगदीच कमी वेळेत बनवायचा असला तर एम टी आरचा तयार मसाला मिळतो. अगदी घरगुती चव येत नाही पण मस्त लागतो.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
सारीका.. मस्त यम्म यम्म यमी
सारीका.. मस्त यम्म यम्म यमी झालाय मसाला.. स्टोअर करून ठेवता येतो हे फारच छान ..आता भात केला की टाकीन फोटू ही ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स!!!
रेसिपी शेयर केल्याबद्द्ल
रेसिपी शेयर केल्याबद्द्ल धन्यवाद ! मला खूप आवडतो आतापर्यंत मी तो माटूंग्याच्या नायक कॅफेमध्ये खायचे आता घरी बनवून बघेन.
वा एकदम मस्त रेसिपी आहे
वा एकदम मस्त रेसिपी आहे सारीका. धन्स शेअर केल्याबद्दल. गुरुवारी करेन म्हणते.
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खुप
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झाला होता हा भात. मसाला
मस्त झाला होता हा भात. मसाला घरी केल्यामुळे तिखटावर ही कंट्रोल ठेवता आला. आमच्याकडे (माझ्यासकट ) सगळ्यांना गरमागरम कालवून समोर आलेला वरणभात आवडतो म्हणून हल्ली मी कुकरमध्ये एकाच भांड्यात डाळ-तांदूळ शिजवते. कुकरमधून काढल्यावर फक्त घोटून घेतला की झालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर ह्या रेसिपीसाठी ही आळशीपणा म्हणून असाच वरणभात शिजवत लावला आणि तो होत असताना गाजर, मटार, फरसबी, बेबीकॉर्न, काजू, चिंच-गूळ, मसाला घालून भाजी करुन घेतली आणि मग तयार भात त्यात मिसळून घेतला. वरुन साजूक तूप घालून खाल्ला. ऑथेंटिक चव आली की नाही माहीत नाही पण खूप चविष्ट आणि तॄप्त करणारा प्रकार झाला हे नक्की. पळीवाढाच केला होता.
धन्यवाद सारीका