Submitted by पियापेटी on 15 September, 2011 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
2 कप बासमती तांदुळ,
2 कप दूध,
1 चमचा साखर,
1/2 चमचा जीरे,
3 लवंग,
1 तेज पान,
3 वेलची
दालचीनी,
2 चमचा तुप,
मीठ
ड्राय फ्रुट्स
आणी छोट्या आकारात कापलेली फळ [सफरचंद, द्राक्ष, पपई, अननस,डाळींब]
क्रमवार पाककृती:
पुलाव करायच्या अगोदर तांदुळ अर्धा तास भिजत ठेवावे.दुध साखर एकत्र करुन ठेवा.
कढईत जीरे , लवंग, तेज पान, वेलची,दालचीनी तुपावर गलाबी परतुन घ्या.
त्यावर भिजत ठेवलेले तांदुळ ३-४ मिनीटे परता. मग दुध-साखर , मिठ आणी अर्धा कप पाणी वाढवुन शिजवा. गॅस बंद केल्यावर ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळांनी सजवा..
[पुलाव केल्यावर फोटो टाकेन .. ]
वाढणी/प्रमाण:
४ जण
अधिक टिपा:
- यात भाज्या पण घालु शकतो [शक्यतो वाटाणे, फरस्बी, गाजर ]
- जर भाज्या घालायच्या असतिल तर वरील प्रमाण ६ जणासाठी होईल.
- वेलची आवडत नसल्यास २ दालचीनी घ्यावी.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आज बनवणार... जमलं तर फोटो
आज बनवणार... जमलं तर फोटो टाकेन...
मी करते हा पुलाव. छान लागतो.
मी करते हा पुलाव. छान लागतो. मी tinned fruits घालूनही करते.
मस्त रेसिपी. करून बघणार.
मस्त रेसिपी. करून बघणार.
मस्त रेसिपी. करून बघणार.
मस्त रेसिपी. करून बघणार.
छान रेसिपी. नक्की करुन बघणार.
छान रेसिपी. नक्की करुन बघणार.
tinned fruits चांगले असते
tinned fruits चांगले असते का?
ईथे भारतात पण मिळतात ..मी अजुन घेतले नाहीये
Tinned fruits चांगले
Tinned fruits चांगले असतात्.मी fruit salad साठी पण वापरते. फक्त expiry date पाहून आणायचे.