कदाचित ...!

Submitted by मिलन टोपकर on 13 September, 2011 - 07:12

निखळुन गेले ह्या जन्माचे दुवे .... कदाचित..!
जुळेल पुढल्या जन्मी माझे, तुझे .... कदाचित..!

जाण्याचे हे तुझे बहाणे खरे, परंतू
उंबरठ्यावर अडेल पाऊल तुझे .... कदाचित..!

तडफडतो पण प्राण न जातो, ते गेल्यावर
धारदारही नसतिल त्यांचे सुरे .... कदाचित..!

पापणीस बघ येतो माझ्या गंध सुखाचा
येणे झाले स्वप्नामध्ये तुझे .... कदाचित..!

प्राणांचेही मोल तयांना कमीच वाटे
खरेच असतील गंभीर माझे गुन्हे .... कदाचित..!

जन्मभरी मी मुकाट काटे झेलत गेलो
उधळतील ते, मी गेल्यावर, फुले ....कदाचित..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तडफडतो पण प्राण न जातो, ते गेल्यावर
धारदारही नसतिल त्यांचे सुरे .... कदाचित..!

पापणीस बघ येतो माझ्या गंध सुखाचा
येणे झाले स्वप्नामध्ये तुझे .... कदाचित..!
'''''''''''''''''''''''''''''''''क्या बात!!!

वा वा वा!

गझल आवडलीच!

उंबरठ्यावर अडेल पाल तुझे .... कदाचित..!

खरेच असतिल गंभिर माझे गुन्हे .... कदाचित..!

बहुधा असे करावे लागेल, नीट वाचलेले नाही/ रदीफ छान निभावली आहे. गझल आवडली.

येणे झाले स्वप्नामध्ये तुझे .. कदाचित - हा शेर दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.

धन्यवाद! अजून येऊद्यात!

-'बेफिकीर'!

व्व्वाह!!!

रदीफ छान निभावली गेली आहे...

अवांतरः बर्‍याच ठिकाणी र्‍हस्व दीर्घाच्या तडजोडी कराव्या लागल्या की मजा जाते...
अशावेळी सरळ गझलेचे लेबल काढून टाकावे! हेमावैम.

वा.. गझल अत्यंत आवडली. एखादा शेर कोट करणार नाही, सगळेच चांगले आहेत.

धारदार नसतील तयांचे असा बदल करून पाहिला. असो.
शक्यतो विरामचिन्हांचा अतिवापर टाळावा, असे सुचवतो.

धन्यवाद आणि पुलेशु.