Submitted by -शाम on 10 September, 2011 - 12:51
अमुची मायबोली
मायमराठी नव्या युगाचा
साज नवा हो ल्याली
रंग मराठी उधळत आली
अमुची मायबोली.....||धृ||
गुलमोहराचे बहर जणू हे
कथा कविता गझला
रंगबिरंगी लेखमालिका
अवघा धागा सजला
हितगुज करती एकमेकीशी
कला गुणांच्या वेली....||१||
कुणी दाखवी पाककला तर
कुणी दाखवी किल्ले
कुणी चालवी अपुला धागा
इथे झेलुनी हल्ले
लुटूपुटूची शब्द लढाई
हसू उमटते गाली......||२||
गंध मातीचा मराठमोळा
नसानसांनी भिनला
दूर विदेशी अता मराठी
आवाज हो दुमदुमला
अम्ही लेकरे सरस्वतीची
बोलू तिचीच बोली......||३||
. .............................................................शाम.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !
मस्त !
खूपच छान!
खूपच छान!
सुंदरच.
सुंदरच.
मनापासून आवडली रचना, शाम!!
मनापासून आवडली रचना, शाम!!
धन्यवाद दोस्तानु!!!
धन्यवाद दोस्तानु!!!
छान लिहिलंय, मायबोलीची
छान लिहिलंय, मायबोलीची वैशिष्ट्यं छान वर्णन केली आहेत.
छान. आवडली कविता.
छान. आवडली कविता.
छान. छान. मस्त जमलय.
छान. छान. मस्त जमलय.
फार सुंदर कविता.
फार सुंदर कविता.
व्वा.. छानेय एकदम
व्वा.. छानेय एकदम
व्वा श्याम...जबरदस्त.
व्वा श्याम...जबरदस्त.
मस्त
मस्त