अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.
"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...
इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.
"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.
"अभिजीत." हॅलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"
"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"
"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.
अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.
"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.
"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."
आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"
अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?
"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."
"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बिदाईच्या सीनला रायटर लागत नाय रे. बादलीभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...
सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.
भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...
सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते. पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...
खरंतर सावरीबद्दल अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.
अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.
"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"
"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लॉप दिलेत.
तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.
"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदरार्थी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"
मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हातातल्या कागदावरचे डायलॉग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.
सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.
"हॅलो मॅडम"
"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.
"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.
"आझमी, मी तुला एक विचारू?"
"विचार ना!"
"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"
आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?
अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.
मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."
"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "
मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"
अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करत असतील त्यामधे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार?.
तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.
सीरीयलसाठी लिहिणार्या तीन चार लोकांकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरी प्यारी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....
तितक्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.
पुढे ?????????????????
काजल गाडीतून उतरते न उतरते तोच मेनका तिच्याजवळ धावत गेली. ’मॅडम....’ तिला पुरतं बोलूही न देता काजल म्हणाली ’मेनका, हम बादमे बात करेंगे’ आणि मग अभिजितकडे वळून म्हणाली ’अभिजित, मेरे साथ चलो’.
’मॅडम, मी घेऊ का तो खोका? जड दिसतोय’. अभिजितने विचारलं.
’नको, माझ्याकडेच राहू देत. महत्त्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे तुझ्यासोबत’.
सेटवरच्या मेकशिफ़्ट ऑफ़िसमध्ये दोघे गेले. काजलने तो खोका टेबलवर ठेवला आणि दरवाजा बंद करून घेतला. अभिजितला कळेना काय चाललंय काय.
"अभिजित, तू पेपर वाचतोस?"
"अं, मॅडम, वाचतो कधीकधी."
"तब शायद तुमने ये न्यूज न पढी हो, पहले ये पढ लो" असं म्हणून पेपराचं एक कात्रण तिने अभिजितला दिलं.
मोठ्या उत्सुकतेने अभिजीतने ती बातमी वाचायला सुरुवात केली. पाकिस्तानातल्या सनातनी लोकांना तिथल्या जनतेवर भारतातल्या सिरियल्सचा वाढणारा प्रभाव खटकू लागला होता. शादीत होणारे सात फ़ेरे, हिंदू उत्सवांचं सणांचं होणारं दर्शन ह्या गोष्टींमुळे पाकिस्तानातली तरुण पिढी बहकत चालली आहे अशी भीती त्यांना वाटत होती.
अभिजितचं वाचून झालंय हे लक्षात येताच काजलने एक कागद त्याच्या हातात दिला. वरती For Your Eyes Only असं ठळक अक्षरात लिहिलं होतं.
अल-कायदा आणि जैश-ए-मोहमद ह्या संघटनांनी भारतातल्या सिरियलचा वाढणारा प्रभाव कमी करायला काय करायचं हे ठरवायला तातडीची गुप्त बैठक घेतली होती असं त्यात नमूद केलं होतं. सर्वानुमते ह्या दोन्ही संघटनांच्या प्रमुख अधिकार्यांनी ह्या सिरियल्स स्वत: पहाव्यात म्हणजे पुढली उपाययोजना ठरवता येईल असा निर्णय झाला होता.
अभिजितने काजलकडे पाहिलं. ’हा कागद तुमच्याकडे कसा मॅडम?’
’I can tell you but then I will have to kill you' हाताने पिस्तुलाची गोळी झाडल्याची अॅक्शन करत काजल म्हणाली. अभिजीत धसकला. ’हे काय चाललंय? आपण स्वप्न तर बघत नाही ना?’
’ओह....’ त्याच्या तोंडून एव्हढंच बाहेर पडलं. त्याने तो कागद तिच्याकडे परत दिला आणि खिशातून लायटर काढून तिने त्या कागदाला आणि कात्रणाला आग लावली. अभिजीतला तर घामच फ़ुटला.
त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करत काजलने खोका उघडला. आत अनेक बाडं होती. तिने ती भराभर बाहेर काढायला सुरुवात केली.
अभिजितने त्यांच्याकडे एक नजर टाकली तेव्हा त्याला दुसरा धक्का बसला. कसम्हसे, केकुसुम, कहानी घर घर की वगैरे जुन्या अश्रूधारावाहिकांच्या पटकथांची ती बाडं होती.
’मॅडम, ये सब आपको कहासे मिला?’ न रहावून त्याने विचारलंच.
’तुम सवाल बहोत करते हो अभिजित. आम खाओ, गुटलिया क्यो गिन रहे हो? आता नीट ऐक. आणि जे ऐकशील ते ह्या खोलीच्या चार भिंतींबाहेर जाता कामा नये. नाहीतर काय होईल ते मलाही सांगता यायचं नाही. ऎम आय क्लिअर?’
अभिजितने मान डोलावली. आता त्याचे सगळे प्राण कानात (आणि घशात!) गोळा झाले होते.
"आपल्याला एक वेगळीच सिरियल बनवायची आहे - जी अल-कायदा आणि जैश-ए-मोहमद च्या प्रमुख अधिकार्याना दाखवली जाईल. ह्या सिरियलच्या सीडीज त्यांच्याकडे कश्या पाठवायच्या त्याची चिंता तू करायची नाहीस. ते ’Need-to-know basis’ वर आहे. तुला जेव्हढं कमी माहित तेव्हढंच तुझ्या दृष्टीने बरं. ही बाडं बघतो आहेस ना? ती सगळी वाचायची आणि त्या सगळ्याची भेळ करून एक सिरियल बनवायची आहे - अगदी शेंडा-बुडखा नसलेली.’
अभिजितच्या तोंडावर आलं होतं ’मग ह्यात नवं काय आहे? आपल्या सगळ्या सिरियल्स तशाच असतात की’. पण त्याने ते शब्द गिळले. उगा ’धर्म करता कर्म’ व्हायला नको.
"म्हणजे केकुसुममधला नवर्याच्या पत्रिकेतला मृत्य़ूयोग, सरोगेट मदर, कसम्हसेमधला बायकोच्या मानाने वयस्कर नवरा, त्यांच्यातले शंभरएक गैरसमज, कहानी घर घर कीमधलं एकत्र कुटुंब आणि नात्यांची गुंतागुंत, नायिकेची स्मृती जाणं, तिची स्मृती परत आली की नायकाची स्मृती परत जाणं, नायिकेला ब्रेन ट्यूमर, नायकाला ब्रेन, आपलं ब्लड कॅन्सर, दसरा, दिवाळी, नवरात्री, गणेशोत्सव, करवा चौथ, बालविवाह, सती, हुंडाबळी, अपघात, खून, अंडरवर्ल्ड, स्मगलिंग काय असेल नसेल तो सगळा मसाला ह्या एका सिरियलमध्ये कोंबायचा आहे आपल्याला. कळतंय का?"
अभिजितला हे ऐकूनच गरगरायला लागलं. ज्यांना कधीही पहायची सुतराम शक्यता नाही अश्या त्या अल-कायदा आणि जैश-ए-मोहमद च्या प्रमुख अधिकार्यांची त्याला कीव येऊ लागली. लादेन नशीबवानच म्हणायचा. गोळ्या खाऊन मेला. बाकीच्यांच्या नशीबी एक तर ’ठार वॆडेपण’ होतं नाहीतर ’कुत्तेकी मौत’!
मग त्याच्या डोक्यात एक प्रश्न आला ’हो. पण मॅडम, आपला नेहमीचा रायटर...’
’मैने तुम्हारा नाम इस कामके लिये रेकमेन्ड किया था अभिजीत."
आपलं नाव रेकमेन्ड केलं? काजलमॅडमने? आपण हिला ओळखण्यात चुकलोच.
’क्या सोच रहे हो? Now is your chance to do something for mother India'
हे ऐकताच मात्र अभिजीतला स्फ़ुरण चढलं. ’जहा डाल डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा’, ’भारत हमको जान्से प्यारा है’, ’अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ वगैरे १५ ऑगस्ट फ़ेम गाणी त्याच्या मनाच्या एफ़एम रेडिओवर वाजून गेली. आपण लिहिलेल्या सिरियलचे एपिसोडस पाहून अल-कायदा आणि जैश-ए-मोहमद चे लोक बेगॉन मारल्यावर झुरळ ठायीठायी मरून पडतात तसे पटापट मरून पडताहेत अशी दृष्यं त्याला दिसायला लागली. आणि त्याची सिगरेट पिऊन पिऊन खोका झालेली छाती फ़ुगली.
’मॅडम, आझमीसेभी बात करनी होगी’
’आसावरी इज टेकिंग केअर ऑफ़ दॅट. त्याला काय स्टोरी सांगायची ते तिला चांगलंच माहित आहे. आणि हो, ह्या सिरियलमध्ये मेन व्हॅम्पचा रोल मेनका करणार आहे. तिच्याशी बोलायचंच आहे मला. १०-१२ आयटम सॉन्ग्ज आहेत तिची. एखाद्या मालिकेत एव्हढी आयटम सॉन्ग्ज असायची ही पहिलीच वेळ आहे म्हणून ती खुश आहे’
मेनकाला ह्या सिरियलमध्येही झेलावं लागणार म्हणून अभिजीत थोडा हिरमुसला.
’अरे, ऐसे उदास मत हो. तुम्हे एक और खुशखबर देनी है. बताओ तो सिरियलमे लिड हिरॉइनका काम कौन कर रहा है?’ काजलमॅडमने हसत विचारलं.
अभिजीत नुस्ताच बघत राहिला.
"आसावरी." काजलमॅडमने आता चक्क डोळा मारला. ’मुझे मालूम है अब तुम पूरी लगनसे काम करोगे’ हेही वर. अभिजीत तीन ताड उडाला.
’चलो, अब मै निकलती हू, मेनकासे बात करनी है’ असं म्हणून अभिजीतला रूममध्ये सोडून काजलमॅडम निघाली. जाताना क्षणभर दरवाज्याजवळ थांबली आणि गुणगुणली:
"ओ मोरी प्यारी सावरिया".
स्वप्ना भारीच आहे तु केलेला
स्वप्ना भारीच आहे तु केलेला शेवट
मी म्हटलं नव्हतं. स्वप्नाचीच
मी म्हटलं नव्हतं. स्वप्नाचीच कथा आहे ही
कसा परफेक्ट शेवट जुळवून आणलाय....
___/\___ नंदिनी तू काहीही
___/\___
नंदिनी तू काहीही लिहिलस तरी माझा डाऊट तुझ्यावरच रहाणार
तो वरचा नमस्कार ओ स्वप्नातै
तो वरचा नमस्कार ओ स्वप्नातै तुमच्यासाठी आहे बर्का
लादेन नशीबवानच म्हणायचा.
लादेन नशीबवानच म्हणायचा. गोळ्या खाऊन मेला. बाकीच्यांच्या नशीबी एक तर ’ठार वॆडेपण’ होतं नाहीतर ’कुत्तेकी मौत’!
>>>> भारी आहे...
मस्त!
मस्त!
छळ करुन मारणार तर...
छळ करुन मारणार तर...
मस्तच
मस्तच
वा वा
वा वा
भारीए...
भारीए...
मस्त.
मस्त.
वाचत आहे.
वाचत आहे.