मायबोलीवरील दिशाभूल करणारी शीर्षके

Submitted by मामी on 3 September, 2011 - 09:21

ही शीर्षके वाचून सगळ्यात आधी मनात काय आलं माहिते?

तुझा खेळ सारा
घरात मुलाने पसारा कसा केलाय याचं आईनं केलेलं वर्णन

वन बीचके फ्लॅट भाड्याने, साड्यांचा सेल लागलाय!!!
छोट्या जाहिराती चुकून नविन लेखनात आलेल्या दिसतायत!

पलाट साडेबाराचा
ते शाळेत असताना 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर १ तास' असे निबंध लिहायचो ना? त्याचच एक व्हेरीएशन - 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री साडेबारा वाजता'

हरवलेले शब्द
अल्झायमर झालेल्या रूग्णाची रोजनिशी

काय गुण सांगू माझ्या सालीचे
नारळातील खोबर्‍याने आपल्या कवचाबद्दल गायलेले स्तुतीकाव्य

आंबोली सुंदर नाही - अस्मिता
अस्मिता नावाच्या आंबोलीत राहणार्‍या आयडीने पर्यटकांना रोखण्यासाठी लिहिलेला लेख

कळेना खरे ओळखावे कसे?
लहानपणी लग्न झालेल्या सौ खरे आपल्या पतीच्या घरी पहिल्यांदा गावाहून एकट्याच मुंबईत आल्या आहेत. हातात फक्त लग्नातला श्री खर्‍यांचा फोटो आणि पत्ता. त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन. (शेवट अर्थात गोड!)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सग़ळेच Rofl

मी पण काही शोधायचा प्रयत्न केला. हे काही Proud

(नविन लेखनमधुन डायरेक्ट कॉपी पेस्ट Wink )

माझं काय चुकलं?
गैरफायदा : संपुर्ण "विशाल कुलकर्णी "

>>> म्हणजे यांचे काहीही चुकले नाही. विकुने गैरफायदा घेतलाय Light 1

प्रत्येक मनात नवीन manjiri sirdeshmukh >>> Uhoh

एक पोरटेली नार ..... नवीन बेफ़िकीर >>> Light 1

वाळू नवीन पाषाणभेद >>> दगडाची वाळु झालीये Lol

खुद्द ह्या लेखाचे शीर्षक असे वाचता येत होते.

विनोदी मायबोलीवरील दिशाभूल करणारी मामी
लेखन शीर्षके.

दिवे घ्या मामी.

ओरिसा: आळूपोटळं तरकारी>> पोटाच्या तक्रारी नवीन मेम्बराने लिहीताना (किंवा कदाचित त्याच तक्रारींमुळे) टायपो झालाय असे वाटणे Happy

तुंदिलतनु तरी... - साजिरा संयोजक मायबोली गणेशोत्सव २०११

साजिर्‍याची तनु तुंदिल असुनही मायबोली गणेशोत्सव २०११ चा संयोजक कसा काय झाला? असेच काहीतरी असेल असे वाटले.

वर्षा_म, अश्विनीमामी, गंगाधर मुटे ... तुम्हाला प्वाईंटाचा मुद्दाच कळला न्हाई वो! Proud
या करता वेगळा धागा आहे. तिथे टाका.

फारएण्डा .... स्पॉट ऑन!

एका शब्दाची अंगाई

हे शीर्षक वाचून आतमध्ये फक्त एकच शब्द - "झोप!" - लिहिला असणार असं वाटलं, खरंच. तर तिथे एक पूर्ण लांबलचक कविता आहे की! Proud आणि संबंधितांना Light 1

Lol

हे वाचलच नव्हत आधी....

माझ्या नजरेतून - जॉली एल एल बी नवीन

मग आधीचा जून झाला का? की नजरच बदलली Uhoh

तुमची मदत हवी आहे कुणाला तरी न्यायासाटी....!

कुणाला कुठे न्यायचय??? गाडी हवी की ट्रक की खांदा?? Proud

आतमध्ये फक्त एकच शब्द - "झोप!" - लिहिला असणार असं वाटलं, >>>> Lol
पोटाच्या तक्रारी नवीन मेम्बराने लिहीताना (किंवा कदाचित त्याच तक्रारींमुळे) टायपो झालाय >> Lol

मामी Rofl

सहजीवनाचा अर्थ सांगणारा 'अनुमती'
यातील सहजीवनाचा अर्थ वगैरे मुळे मला हा वंदना बर्व्यांचा नवीन बाफ वाटला Happy

मामी, 'झोप', 'ओरिगामी' वगैरे महान Lol

माझं काय चुकलं? .... लालू Proud

चिंतामुक्त गझल ...... नवीन कार्ल्यातली हडळ Proud

संथ चालती ह्या मालिका फारएण्ड संपण्यासाठीच संथ चालत असतील

टाळू कशी कुणाला - लहान मुलांची टाळू कशी भरावी याची माहिती ( ज्याच्याकडे तो टाळू म्हटले जाते त्यांना कदाचित असे वाटणार नाही शीर्षक वाचून)

Pages