Submitted by UlhasBhide on 2 September, 2011 - 15:41
मायबोली-शीर्षकगीत
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली
साहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║
सार्या कलागुणांना, दे वाव मायबोली
सार्या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║
सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║
.... उल्हास भिडे (२-९-२०११)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अत्यंत समर्पक गीत
अत्यंत समर्पक गीत आहे......
उकाका तुम्हाला एक जादुकी झप्पी
भरुन आलं.. खरच...
भरुन आलं.. खरच... अप्रतिम...!!!
उल्हासकाका आणि योग यांच्या पायचे फोटो टाका..
खरच भरुन आलं.
खरच भरुन आलं.
व्वा भिडेशेठ, काय भारी झालं
व्वा भिडेशेठ, काय भारी झालं आहे, शीर्षकगीत.
आत्ताच ऐकायलाही मिळालं. दोन्हीही केवळ जब्रा. ग्रेट.
-दिलीप बिरुटे
Pages