१ वाटी भाजलेले दाणे स्वच्छ सोलून, १/४ (पाव) वाटी डाळं, २ कडिपत्त्याची छान मोठी पानं, ५-६ लाल सुक्या मिरच्या किंवा तेवढ्याच हिरव्या मिरच्या, १ चमचा साखर, १ चमचा जिरं, २ चमचे तेल, २ चिमूट हिंग, १ चमचा मोहरी, १ वाटी "गोड" ताक, मीठ.
एक चमचा तेल तापवून त्यात चिमूटभर हिंग, जिरं ह्याची फोडणी करावी. त्यात कडिपत्ता, मिरच्या टाकून परतून घ्यावं. त्यातच दाणे आणि डाळं घालून सगळं आणखी परतावं. सगळं छान खरपूस परतलं की गार करायला ठेवावं. गार झाल्यावर हे सगळं मिक्सरमध्ये घालून जरुरीपुरतं पाणी घालत दाटसर चटणी वाटावी. वाटतानाच चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर साखर घालावी. वाटलेल्या चटणीत ताक घालून नीट मिसळून घ्यावं.
एक चमचा तेलात हिंग-मोहोरी-एखादी लाल सुकी मिरची अशी फोडणी करुन चटणीवर घालावी. ढोकळा किंवा इडलीसोबत चापावी. गुजराथी पद्धतीच्या पांढर्या ढोकळ्याबरोबर मस्त लागते.
_ताक "गोड"च हवे.
_ही चटणी माझ्या राजस्थानी मैत्रिणीने शिकवली. पण आमच्या इथे "हॉटेल"मध्ये खमण ढोकळ्यासोबत चटणी मिळते ती अशीच लागते. बाहेरची जरा जास्तच पातळ असते. घरी तशी केली नाही तरी चालेल
छान आहे चटणी. आंध्र कडचे लोकं
छान आहे चटणी. आंध्र कडचे लोकं पण अशीच करतात ना? फक्त ते त्यात डाळं घालत नाहीत, आणी
वाटताना चिंच घालतात.
मस्त! आमच्याकडे मेथी/पालक
मस्त! आमच्याकडे मेथी/पालक पराठ्यांबरोबर पण ही चटणी खूप आवडीने खाल्ली जाते :).
मस्तच ! अशी ताकातली नव्हती
मस्तच ! अशी ताकातली नव्हती केली मी कधी. आता करुन बघेन
करणार करणार नक्की करून
करणार करणार नक्की करून पाहाणार.
भारी!
भारी!
त्या चटणीत दाणे कच्चे असतात.
त्या चटणीत दाणे कच्चे असतात. अशी करुन बघेन
दाणे म्हणजे शेंगदाणे का?
दाणे म्हणजे शेंगदाणे का?
छान वेगळीच चटणी आहे.
छान वेगळीच चटणी आहे.
दाणे म्हणजे शेंगदाणे का >>>
दाणे म्हणजे शेंगदाणे का >>> हो
दाणे म्हणजे शेंगदाणे का?
दाणे म्हणजे शेंगदाणे का?

'कांदे संस्थानात' अजून काही तिसरेच म्हणत असतील तर माहीत नाही हां...
मस्तय कृती. थँक्यु.
मस्तय कृती. थँक्यु.
गोड ताक कसे करायचे?
गोड ताक कसे करायचे?
मस्त चटणी. हि पराठया बरोबर पण
मस्त चटणी. हि पराठया बरोबर पण छान लागते.
मस्त दिसतेय रेसिपी. मी
मस्त दिसतेय रेसिपी.
मी डाळे-दाणे-कढिलिंब आणि साखर-मीठ-तिखट घालून करते कोरडीच. आता अशी करून बघेन. मोहोरी-जिरं वापरलं नाहिये या चटणीत. मस्त चव येत असणार.
सिंडरेला मस्तच ग.
सिंडरेला मस्तच ग.
गोड ताक कसे करतात मला माहिती
गोड ताक कसे करतात मला माहिती नाही. घरी अनेकदा आज ताक अजिबात आंबट नाही असे ऐकले आहे. म्हणजे गोड ताक प्रकार ह्याच ग्रहावर अस्तित्वात आहे नक्कीच.
सर्वांना धन्यवाद. बरेच जणांनी ही चटणी छान लागते सांगितलेय म्हणजे त्यांना आधीच कृती माहिती होती तर. आता मला पाककृती पोलिसांची भिती वाटायला लागली आहे
म्हणजे नेहमीचे ताकच. दुसरे
दुसरे म्हणजे दोन कडिपत्त्याची पानं म्हणजे दोन एकेकटी पानं की आख्खी संयुक्त पानं?
करून बघते ही चटणी.
गोड ताक व्हायला दही गोड हवं.
गोड ताक व्हायला दही गोड हवं. म्हणजे पर्यायाने विरजण चांगलं हवं. दही/ विरजणाचं ताक खूप आंबट असेल तर नव्याने विरजण लावताना कमी घेऊन लावायचं. तरीही दुसर्या दिवशी आंबटपणा गेला नाही तर रोज थोडं करून विरजण गोडावर आणायचं. ३-४ दिवसांत आबंटढाण चवीचं विरजण/ ताक/ दही गोड होऊ शकतं. साखर घालयची नाही
हे आईकडून.
मृदुला, मी ह्याच प्रश्नाची
मृदुला, मी ह्याच प्रश्नाची वाट बघत होते बघ

दोन मोठी पानं म्हणजे दोन आख्खी संयुक्त पानं. २०-२५ किंवा जास्तच पानुटले होतील
मग कढिलिंबाचे २ टाळे असं
मग कढिलिंबाचे २ टाळे असं म्हणायचं गं सिडे!

अरे वा, छान आहे की रेसिपी ..
अरे वा, छान आहे की रेसिपी .. गोड ताक कुठून आणायचं हा प्रश्नच आहे पण मला चटणी थोडी आंबट झाली तरी चालेल ..
गोड ताक म्हणाजे 'आंबट' नसलेले
गोड ताक म्हणाजे 'आंबट' नसलेले ताक. ताज्या कोमट दुधात एक चमचा विरजण घातले की चार तासात जे दही तयार होते त्याचे ताक गोड होते
नाहीच झाले तर थोडे दुध घालायचे आंबट पणा कमी करयला. [किंवा साखर
]
सिंडरेला धन्यवाद. ऋयाम, कांदे
सिंडरेला धन्यवाद.
ऋयाम, कांदे संस्थान कोणते? आमच्याकडे नुसते दाणे म्हणजे ज्वारीचे दाणे समजतात.
>> ह्याच प्रश्नाची वाट बघत
>> ह्याच प्रश्नाची वाट बघत होते बघ
कळलं कळलं.
मस्त वाटते आहे रेसिपी!! छान
मस्त वाटते आहे रेसिपी!! छान लागत असणार ही चटणी! नक्की करुन पाहाणार!!
खमंग असणार ही चटणी. नक्की
खमंग असणार ही चटणी. नक्की करून पाहणार.
मस्त प्रकार. पहिले मला
मस्त प्रकार. पहिले मला वाटलेले कोरडी चटणी असेल. पण इडली बरोबर नारळ न घालता खाण्याजोगी ही मस्त आहे. माझ्याकडे अर्धा नारळ पण संपत नाही व सुके खोबरे एका दिवसात खलास होते नुस्तेच खाउन.
भारतात एक जर्सी ब्रँड दही मिळते ते फार मस्त असते. जस्ट राइट त्याचे ताक बरोबर होइल. पांढरा ढोकळा मंजे अगदी हिरो आहे माझा. लैच आवड्तो.
अमा अमया, धारा: खरच खूप
अमा
अमया, धारा: खरच खूप मस्त खमंग लागते ही चटणी
मस्त वाटतेय, करुन बघणार. दोन
मस्त वाटतेय, करुन बघणार.
दोन पानं म्हणजे मला खरच दोन सुटी पानं असं वाटलं होतं. मनात म्हणालेही कि कसं काय इतकं नेमकं प्रमाण सांगायला जमतं सुगरणींना !
I little confused. In recipe
I little confused. In recipe dal used. Which dal ? chana dal or tur dal.
Pages