१ कप तांदूळ
चवी प्रमाणे मिठ
केशर
तूप/ लोणी दोन चमचे
१ मध्यम आकाराचा बटाटा
एक कप तांदूळ धुवून भिजत अर्धा तास भिजत ठेवायचा. मग त्यात मिठ घालून जरासा कच्चाच शिजवून घ्यायचा. मग गाळणीत गाळून थंड पाण्याखाली जरावेळ धरायचा.
भात शिजेपर्यंत केशर पाण्यात भिजत ठेवायचे.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप कींवा लोणी टाकून त्यावर बटाट्याच्या चकत्या पसरवून त्यावर अर्धा भात पसरवायचा. केशराचे अर्धे पाणी त्यावर टाकायचे. त्यावर राहिलेला सर्व भात पसरवायचा. राहिलेले केशर पाणी टाकायचे. जरासे लोणी वर टाकायचे. पातेल्यावर स्वच्छ रुमाल टाकून घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर १०-१५ मि. भात ठेवायचा.
जेवणापुर्वी ५ मि. आधी ताटात किंवा ताटलीवर पालथा मारायचा.
ह्यात भाताच्या मधे आवडीचे काही संपुर्ण मसाले घालता येतील जसे की दालचिनी, लवंग, चक्रीफुल. मी जेव्हा जेव्हा हा भात खाल्ला तेव्हा त्यात एक ईराणी स्पाईस असायचे. जराशी आंबट चव असायची त्याला.
नीरजाच्या लिंबू भाताच्या पानावर मी बटाटा लिंबू भाताची कृती टाकलीय. असेही आणखी काही बदल ह्यात करता येतील.
नलिनी पर्शिया भागात (सध्याचा
नलिनी पर्शिया भागात (सध्याचा इराण) असा भात करतात. बटाटा वगळता सगळी कृति हिच.
नलिनी, छान पाकृ. धागा
नलिनी, छान पाकृ.
धागा सार्वजनिक करशील का?
अ.कु, केला.
अ.कु, केला.
चांगला आहे.
चांगला आहे.
कुणीही काहीही म्हणो.......पण
कुणीही काहीही म्हणो.......पण भात आणि बटाटा, जगातले दोन सर्वोत्तम पदार्थ
वेगळीच आहे रेसिपी , आवडला
वेगळीच आहे रेसिपी :), आवडला फोटो.
छान
छान