Submitted by विदेश on 20 August, 2011 - 14:08
(चाल: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले-)
रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले
मनीं हे ' फस्त करू ' म्हटले .. |धृ|
जाय उभी ही गाडी करुनी
पुढ्यात, भैया पाहे वळुनी -
हॉटेलवाले शांत बिचारे गल्ल्यावर सुकले .. |१|
पाणी भयंकर सुटता तोंडी
खमंग बनते शेव पापडी
रिक्षामधले प्रणयपाखरू खुषीत का हसले .. |२|
तुमची ' माया ' - माझी किमया
कृतार्थ झालो , म्हणतो भैया -
भेळकचोरीसाठी गिऱ्हाईक खोळंबुन बसले .. |३|
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
(No subject)
तुमची ' माया ' - माझी
तुमची ' माया ' - माझी किमया
कृतार्थ झालो , म्हणतो भैया - >> मस्त जमलेय
आईशप्पथ! खुपच मस्त.
आईशप्पथ! खुपच मस्त.:)
(No subject)
पाणीपुरीच्या चवीची
पाणीपुरीच्या चवीची किमया
पाहिली आम्ही टिवीवर भैया
तांब्या तुमचा नळही तुमचा ठाण्यामध्ये दिसले.
हा हा हा, लै भारी
हा हा हा, लै भारी