लसुण मिर्‍याची चटणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 August, 2011 - 13:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी सुके खोबरे किसुन.
१०-१२ लसुण पाकळ्या
१ चमचा मिरी दाणे कुटून
अर्धा लहान चमचा मिठ

क्रमवार पाककृती: 

वरच सगळ जिन्नस एकत्र करा आणि मिक्सरमध्ये चटाणी करा. जर टिकाउ चटणी हवी असेल तर खोबरे जरा भाजुन घ्या.

ही आहे तयार चटणी

केवढिशी ही पाककृती पण पौष्टीक, झटकेपट, रुचकर आहे.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी १ चमचा.
अधिक टिपा: 

ही बाळंतीणीसाठी पौष्टीक चटणी आहे.

जर घरी मोठा खलबत्ता असेल आणी श्रम करण्यास सवड असेल तर ही कुटूनही करता येते. तशी अधिक रुचकर लागते.

हिच चटणी मिरी ऐवजी मिरचीपुड घालुनही करता येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे ही चटणी. जागू, इतके सगळे प्रकार करायला तुला वेळ कसा ग मिळतो.
घरात अगदी लाडकी असशील सगळ्यांची. Happy

हो दिनेशदा माझ्याकडे आहे दगडी छोटा खलबत्ता.

अखी Happy

बिल्वा अग जो आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना तो मी हा अश्याप्रकारे काढते. कारण ही माझी आवडच आहे. आणि आवड आणि किचन सांभाळण ह्यांची वेळ एकातच निभाउन जाते. मी मुलीला घेउन ६ वाजता घरी जाते. त्यानंतर मी नॉनस्टॉप किचनमध्ये असते. माझी लेकिलाही त्यामुळे ती आवड निर्माण झाली आहे. ती पण वेगवेगळया जिन्नसांची नासधुस करत असते. पण मी तिला ओरडून जास्त निराश करत नाही. काही प्रमाणात करुन देते. तिचा अभ्यासही असतो मधे मधे. कधी स्पिचेस तयार करुन घ्यायचे असतील तिच्याकडून तेंव्हा मग अशा वेळखाउ पदार्थांना दांडी मग पुलावावर भागवते. कित्ती लिहु अजुन खुप लिहावेसे वाटते पण तुम्ही बोअर व्हाल. म्हणून इथेच थांबवते. Lol

माझ्या लेकीने केलेला हा नमुना.
माझ्याच स्टाईलमध्ये तिचीही पाकृ
प्रथम वड्याचे पिठ घ्या त्यात पाणी घालुन ते कालवा (त्याच्यातील घटक ती रोज बदलते. कधी कधी हाताला मिळाले तर राई, जिर, आळीव, चहापावडर मेथी काहीही टाकते.)

हे आहेत तयार भोकाचे वडे. तिने तळायची फर्माइशही केली होती. पण माझ्या नशिबाने ती वडे वळून झोपली.


मागच्या वर्षीच्या कोंबडीवड्याच्या पिठावर तिने कब्जा केला आहे. आणि त्यापासुन ती रोज वेगवेगळे पदार्थ घरातल्या वाट्या वगैरे घेउन बनवत असते. मग ती तिच्याच रेसिपिज बनवते. मधुन मधुन टिव्हिवरील आम्ही सारे खवय्ये सारख्या कार्यक्रमांचे कधी सुत्रसंचालन तर कधी रेसिपी बनवणारी सुगरण होते.

ज्ञानवर्धक व नावीन्यपूर्ण! करून पाहावेच असे! आणि वडेसुद्धा तसेच! Happy

तिखट अतिशय आवडत असल्याने हा धागा पाहिल्याचा खूप फायदा झाला.

(अवांतर - चटणीत नारळाचे प्रमाण कमी केल्यास चालेल का?) Happy

अखि, प्राजक्ता लेकीतर्फे धन्यवाद.

बेफिकिर तुम्हाला तिखट आवडते म्हटल्यावर खोबर कमी केल तरी चालेल. मग ती झणझणीत आणि अजुन ओली होइल.

कौतुक आहे तुझं जागू. लेक तुझ्या हाताखाली चांगलीच तयार झालेली दिसतेय आत्ताच. आईचा कित्ता गिरवणार ती नक्की.

जागु मस्तच . अग हिच चटणी मला क्धीपासून करायची आहे आता तुझी रेसिपी आली म्हणजे नक्की करेन लाल मिरची घालून .

जागू, मस्त लागते ही चटणी! कुटुन जास्त छान लागते.
ज्यु. जागुतैना सांग आम्ही आलो की असे वडे करा हं नक्की!

मस्त. मी ही चट्णी बाळंतपणातच खाल्लेली आहे. एकदम चव जिभेवर आली. अभ्यास घेत घेत स्वयंपाक हा एक अमुल्य वेळ आहे आईमूल नात्यातला. जागुतै तुम्ही बाळंतिणीसाठीचे खास पदार्थ असा एक लेख लिहा. त्यात हे सर्व लिंक द्या म्हणजे ही माहिती उत्तम संकलित व संक्रमित होईल. आज करून बघेन. नणंदबाई लकी आहेत. Happy

हो मामी तो संयुक्तामध्ये चालु करायचा विचार चालू आहे माझा.

नुतन, वर्षा धन्यवाद.

वत्सला ती पहीला चपातीच्या पिठाचे मोदक करायची आणि मला तळायला सांगायची तव्यात.

काळीमीर्‍या ऐवजी हीरव्या मिरच्या टाकल्या तर चालतील का...:स्मित:
जशी कैरीची चटणी करतात त्या प्रमाणे

जागू मस्तच.. आमच्या आईने कुटून कुटून केली होती माझ्यासाठी निमोच्या वेळी जामची बरणी भरून... एरव्ही तिखट खाणारी मी.. नि मला तिखट खाऊ नको सांगणारी आई (सा.बा.) ह्यांचा रोलच उलट झाला होता.. मला जाम तिखट लागत होती नि आई तेवढी बरणी संपव.. चांगली असते म्हणून मागे लागली होती.

आता मला तिखट खाता येतय चांगल पण परत कुटून मागायची हिम्मत नाहीये.. कारण काही कारण नाहीये Wink

छान

अरुंधती, जागोमोहन धन्यवाद.

वेताळ हिरव्या मिरच्यांऐवजी सुकलेल्या लाल मिरच्या वापरतात. म्हणजे सुकी होऊन टिकतेही आणि चवही अप्रतिम.

जाईजुई Happy

हो मामी तो संयुक्तामध्ये चालु करायचा विचार चालू आहे माझा << संयुक्तामधे नको करु. ज्या संयुक्ताच्या मेंबर नाहीयेत त्यांना सुद्धा उपयोगि पडेल