सूत्रधार : हं... चला तयारी तर झाली. पण हे काय? मला तयार व्हायला सांगून बाईसाहेब अजून आल्याच नाहीत... या बायका तयारी करायला इतका वेळ का लावतात कोण जाणे!
नटी : आलेय हं मी... आणि एवढा काही उद्धार नकोय करायला. जरा ठेवणीतली वेशभूषा करायची म्हणजे वेळ लागायचाच!
सूत्रधार : ठेवणीतली? काही विशेष? नाही, मलाही अगदी खास तयारी करा असं म्हटलं होतंत...
नटी : विसरलात ना! अहोSS आपल्याला मायबोलीच्या गणेशोत्सवाला जायचंय ना! यंदा काही खास अदाकारी बघायला मिळणार आहे म्हणे! शिवाय इतरही अनेक मनोरंजक प्रवेश आहेत बरं का!
सूत्रधार : अरे वा! कोणते बरे?
नटी : सांगते ना! अहो इथे आपण सारे प्रवासी घडीचे! जो तो आपला जीव रमवत असतो, थोडा विरंगुळा म्हणून! त्यात कोणाचा कायापालट होतो, तर कोणी हा आनंदमेळा बघून इथेच रमून जातो!
सूत्रधार : पण हे सगळं कुठे? मनोरंजक प्रवेश काय... तुमचं हे आयुष्याबद्दलचं चिंतन काय... काही कळेनासं झालं!
नटी : तुम्हीही उत्सुक आहात ना? चला तर मग माझ्याबरोबर, मायबोलीनगरीचा गणेशोत्सव बघायला!
**********************************************************
टीप : कार्यक्रम आणि स्पर्धांचे विषय आणि नियम बघण्याकरता निळ्या शब्दांवर जाऊन टिचकी मारा.
**********************************************************
विसरू नका!
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, बाप्पाकरता तुम्ही स्वतः गायलेली गाणी, श्लोक, आरत्या, भजनं, रेकॉर्ड केलेल्या कॉलनीतल्या गणेशाच्या आरत्या.... आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
सगळे तुमच्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनाकरता आतूर आहेत. त्यामुळे घरच्या गणपतीचे फोटो, आरास, नैवेद्यांची प्रकाशचित्रे आणि कृती आम्हाला जरूर पाठवा. आपल्याला काही खास चित्रं पाठवायची असतील, वेगवेगळ्या अपरिचित गणपतींची ओळख करून द्यायची असेल तर स्वागत आहे.
हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.
**********************************************************
दवंडी २ : मायबोली गणेशोत्सव २०११
**********************************************************
आगामी आकर्षण : किस्न-पेंद्या प्रवेश (लवकरच येत आहे)
अल्पना, आगामी आकर्षण :
अल्पना,
आगामी आकर्षण : किस्न-पेंद्या प्रवेश (लवकरच येत आहे)
लक्ष ठेऊन रहा.
मस्त स्पर्धा, भारी पोस्टर्स,
मस्त स्पर्धा, भारी पोस्टर्स, मस्त दवंडी.
यंदा मागच्या वर्षासारखं एखादी
यंदा मागच्या वर्षासारखं एखादी थीम देऊन/ओळ देऊन केलेल्या चारोळ्यांची स्पर्धा नाहीय्ये का?
मंडळी, गणेशोत्सवाची दुसरी
मंडळी,
गणेशोत्सवाची दुसरी दवंडी झालिये बरकां
Pages