गाजरं, फरसबी, मटार दाणे, फ्लॉवर, उकडलेले बटाटे, ब्रेड, ओटमील, गरम मसाला (शक्यतो बादशहा रजवाडी गरम मसाला), हळद, तिखट, मीठ, आलं-लसणाची पेस्ट
तळणीकरता तेल.
हवा असल्यास पुदिना / कोथिंबीर चिरून.
आवडत असल्यास बीट उकडून.
कटलेटस बरेच जणं बरेचदा करत असणार. पण यावेळी मी जे बनवले ना ते कटलेटस विथ अ ट्विस्ट होते. मुळात मी कटलेटस बनवायला घेतलेच नव्हते - मी करत होते सूप. एवढे दचकू नका. मी काही इतकी कुगृहिणी नाही. पण काये की, लेकीला क्लीअर सूप खुप आवडतं. म्हणून छानपैकी गाजरं, मटार, फरसबी आणि फ्लॉवर बारीक चिरून त्यात भरपूर पाणी घालून, झाकण ठेऊन मग बराच वेळ मंद आचेवर ठेवलं. पाणी अर्धं झाल्यावर त्यात मीठ घालून तिला ते क्लीअर सूप प्यायला दिलं. हेल्दी आणि चविष्ट! हवं तर मॅगी क्युब्ज घालून अधिक चविष्ट बनवता येतं.
तर सूप पूर्णपणे गाळून घेतल्यावर भांड्यात खाली शिजलेल्या भाज्या तशाच होत्या. मग एक चमकदार आयडिया आली. त्याच भांड्यात ब्रेड्चे ४-५ स्लाईस, ओटमिल (३-४ चमचे), उकडलेले बटाटे, घरात होती ती पुदिन्याची चटणी, बादशहाचा रजवाडी गरम मसाला, चवीप्रमाणे आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट घातले आणि हाताने छान कुस्करून एकत्र करून घेतले. ब्रेड आणि ओटमिल मुळे मिश्रण घट्टही झाले.
मग छोटे चपटे गोळे करून तव्यावर शॅलो फ्राय केले. अतिशय चविष्ट कटलेटस तयार! मुलांकरता दुपारच्या खाण्यास एकदम योग्य. सॉस, हिरवी चटणी याबरोबर छान लागतात. यातच उकडलेलं बीट मिसळलं तर काहीशी गोड आणि अधिक पौष्टिकही होतात. रंगही छान दिसतो.
विचार करताना जाणवले काही पदार्थांची जोडगोळी बनू शकते त्यातला हा पदार्थ आहे. म्हणजे एक पदार्थ तयार होत असतानाच त्यातून दुसर्या पदार्थाचा मुख्य कच्चा माल मिळणे. त्यापैकीच हे - क्लीअर सूप-व्हेज कटलेटस. दुसरे उदाहरण म्हणजे पुरणपोळी-कटाची आमटी. इतरही उदाहरणं असतील पण ती माझ्या मर्यादित माहितीच्या आवाक्याबाहेरची आहेत. कोणाला माहित असल्यास सांगा.
१. यातच मी क्लिअर सूपाची रेसिपीसुध्दा दिली आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.
२. या कटलेटस मध्ये काजू (कच्चे वा तळून), बेदाणे इ. पदार्थ ही घालू शकता.
३. पाहिजे असल्यास कच्च्या रव्यात घोळवून तव्यावर शॅलो फ्राय करू शकता.
४. भाज्या उकडून सरळ कटलेटस करण्यापेक्षा त्याआधी क्लीअर सूपाची मजा घेता येते.
मामी, काय चाणाक्ष गृहिणी
मामी, काय चाणाक्ष गृहिणी आहेस गं तु... एका दगडात आय मिन भाज्यांत दोन पक्षी आय मिन डिशेस... कल्पना आवडली.
धन्स ग साधना.
धन्स ग साधना.
मामी, मस्त आहे ग आयड्याची
मामी, मस्त आहे ग आयड्याची कल्पना. व्हेज क्लीयर सुप विथ कटलेट्स. मिनी लंच झालाच की
मामी मस्त गं, अजुन एक उदाहरण
मामी मस्त गं,
अजुन एक उदाहरण मटकीची/मुगाची उसळ आणि कळण. कळण जास्ती पौष्टिक होत उसळी पेक्षा.
मामी,तुस्सी ग्रेट हो व्हेज
मामी,तुस्सी ग्रेट हो
व्हेज कटलेट, आल्या (गेल्याचं) डेझर्ट
आशुतोष ...
आशुतोष ...
अनु छान की. भात आणि तांदळाची
अनु छान की.
भात आणि तांदळाची आंबिल पण जोडगोळी होईल ना?
मामी फक्त नाचणीची आंबिल
मामी फक्त नाचणीची आंबिल माहिती आहे, तांदळाची कशी करतात?
पण मला वाटतं पूर्वी भात
पण मला वाटतं पूर्वी भात चुलीवर किंवा गॅसवर करताना तो शिजताना जास्त पाणी घालून ते काढून टाकायचे. ते पाणी रात्रभर मडक्यात ठेवले तर आंबते. ती आंबिल सकाळी प्यायचे. थंड असते, उन्हाळा बाधत नाही.
मामी मला शिष्य करुन घेणार काय
मामी मला शिष्य करुन घेणार काय ?
(ते चुलीवरचे म्हणशील तर चण्याचे सूप तसे करत. चण्याची उसळ करायची आणि मग त्या पाण्यात थोडासाच गरम मसाला घालून ते लहान मूलांना झोपायच्या आधी द्यायचे. थंडी बाधत नाही आणि सर्दी जाते.)
कशाला गरीबाला लाजवताय,
कशाला गरीबाला लाजवताय, दिनेशदा!
छान आयडिया!
छान आयडिया!
मस्त ... दोन पदार्थ एकाच
मस्त ... दोन पदार्थ एकाच वेळी.... छान च
मस्त
मस्त
मामे माझे 'फोटो' शिवाय भागणार
मामे माझे 'फोटो' शिवाय भागणार नाय.....:फिदी:
मस्ट कटलेट्स. मात्र तु ज्या
मस्ट कटलेट्स. मात्र तु ज्या पद्धतीने केलेस म्हणजे क्लिअरसूपसाठी भाज्या जास्त पाणी घालून शिजवल्यास त्या प्रक्रियेत सगळंच पोषणमूल्य निघून जातं. तेव्हा यात सोया ग्रॅन्यूल्स सुद्धा घालावे अशी माझी आपली एक सजेशन. मी बरेचदा एरवीही घालते.
मामी, मस्तच! शर्मिलाची
मामी, मस्तच!
शर्मिलाची आयडिया छान आहे
मामी एकाच घटकांपासुन वेगवेगळे
मामी एकाच घटकांपासुन वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवणे म्हणजेच खर्या अर्थाने सुगरण ग. मस्त. मला आयडीया आवडली.
सहीच की. ओटमीलची आयडीया आवडली
सहीच की.
ओटमीलची आयडीया आवडली