मेधा गटग १३ ऑगस्ट २०११. इन्फिनिटी मॉलच्या फूडकोर्टात.

Submitted by नीधप on 10 August, 2011 - 09:40
ठिकाण/पत्ता: 
इन्फिनिटी मॉल, वर्सोवा, मुंबई.

मेधातै भारतात आलेल्या आहेत आणि मुंबईतल्या बर्‍याच जणांना त्या भेटू इच्छितात. तर त्यासाठी हे गटग.
वेळ - संध्याकाळी ७:०० ते ९:००
स्थळ - इन्फिनिटी मॉल, वर्सोवा, मुंबई. येथील टिजिआयएफ (TGIF) च्या बाहेरच्या पायर्‍या.
तिसरा मजला.
त्याच मजल्यावर लॅण्डमार्क आणि फूड कोर्ट आहे.

मॉलकडे जायचा रस्ता:
लिंक रोडने आल्यास लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटवरून सरळ पुढे जायचे. डावीकडे फेम अ‍ॅडलॅब्ज लागेल मग रहेजाची मोठ्ठी बिल्डींग आणि मग कॉर्नरला सिग्नलच्या इथे इन्फिनिटी मॉल.

अजून तपशीलांसाठी संपर्कातून पत्र धाडणे. Happy

माहितीचा स्रोत: 
मीच ती
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 13, 2011 - 09:30 to 11:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधातै, तुमच्या अकौंटला टाइम झोन कोलकाता सेट करा मग बरोबर दिसेल.
केदार, त्यापेक्षा तूच ये ना मुंबईला. माझ्याकडे रहा. हवंतर राखी बांधेन हो तुला.. Wink

अ‍ॅडमिनको विनंती...

नवनोंदणी धाग्यावर जी वेळ दिसते तिच्यापुढे तुमच्या माबो सदस्यत्त्वात ठरवलेल्या Time Zone ची वेळ असा Disclaimer टाकावा.. बहुतेक प्रत्येक नावनोंदणी धाग्यात हा दोन दोन वेळा दिसण्याचा घोळ झालेला आहे..

डिस्क्लेमरबद्दल अनुमोदन.
म्हणून तर कार्यक्रमाची वेळ तपशीलात लिहिलेली आहे ना. Happy
बहुतेक सगळेजण तेच करतात घोळ नको म्हणून. Happy

अर्र, मला भेटायाचे होते पण आमच्या स्वार्‍या दिल्ली मुक्कामी रक्षा बंधन करण्यास रवाना होत आहेत. अगले साल जरूर.

मलाही जमणे कठिण दिसतेय. संध्याकाळी राखीसाठी भावांच्या घरी जायचे आहे....
बाबु, तु मला येताना कंपनी देणार होतास ना?

तू येणारेस का नक्की ?
मी सकाळी निघणारे, किरु घरी आल्यावर त्याच्याबरोबर. निघताना फोन करु ?

नाही जमणार, आजची अबुधाबी-मुंबई फ्लाईट्स फुल्ल आहेत.