मी बोलावं अन तू ऐकत रहावं.. मी बोलवावं अन तू पैंजण पावलांनी थेट माझ्या समोर येऊन उभं रहावं ..
मी पापण्यांना मिटावं आणि तू ओठांनी स्पर्शावं.. मी तळहाती तुझेच घ्यावे हात.. तेव्हाच जाणवते साखर कशी विरघळते क्षणात.. ! मी म्हणजे तूझ्या स्वप्नांचा झूला, मी म्हणजे तूझ्या उमलतीची पहाट .. तू म्हणजे सहवास माझा तू म्हणजे श्वास माझा.. तू म्हणजे चांदण्यांची रात्र.. माझे फक्त उजाळलेले गात्र..
हेच, तुला कधीतरी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्याच व्यक्तीकडून शांतपणे ऐकत रहावंस वाटतं ना..? आणि हे कधीही शक्य नसलं तरी उगाच हळव्या वेदनांच्या आडोश्याला सलणार्या अव्यक्त भावना असतातच. त्या तुला कितीही दडवता येत असल्या तरी मला त्या ओळखीच्या न वाटाव्यात इतकाही मी दुर नाहीये तुझ्यापासून. कारण हा दुरावा तू ठरवलेला आहेस.. फक्त तू .. मी फक्त आणि फक्त प्रेम करायचं ठरवलंय. अगदी अगदी थेट मनापासून ते थेट मनापर्यंत. आपल्यातलं हे किचकट गणित सोडवताना तुला हातच्यांचं ओझं नकोसं वाटतं आणि मला तूझ्या 'मी' वगळून केलेल्या एकाकी बेरजेचं गणितच नकोसं वाटतं. खरंतर ते कोरं पान निरखून पाहीलंस तर तूला 'बाकी' काहीच शिल्लक दिसणार नाही जोपर्यंत तू स्वतःला त्या बेरजेत पाहणार नाहीस तोपर्यंत..
आता तू ठरवायचंस .. आणि निर्णय द्यायचास.. ! छे छे.. घाबरू नकोस,मनाच्या सक्तीनं मी जरी तुझ्यावरचं प्रेम करत असलो तरीही तूला मात्र कशाचीही सक्ती नाहीये. पण खरं सांगू, वेड्या आशेवरच्या माझ्या या जगण्याला कुठेतरी .. मिळायला हवा ना.. तू 'सोबत' असल्याचा एक वेडा 'दिलासा' आणि एक वेडीपिशी 'ग्वाही' ..!
मस्त
मस्त
सुक्या, काय रे हे? बरायस ना
सुक्या, काय रे हे? बरायस ना बाबा तु???