Submitted by लाजो on 17 July, 2011 - 23:29
बेत काय करावा यावर
विचार करणारी मी
आज 'काकाक'डे जेवायला जाऊ
असे हळुच सुचवणारा तु..
गुलमोहोर गल्लीतल्या त्या
५व्या वाड्यातल्या 'काकाक'डे
भाकरी अन पोळी कशी लुसलुशीत असते..
लोणचे, मुरंबा आणि चटणी डावी कडे
खमंग फोडणीची कोशिंबीर, पापड अनलिमीटेड...
चविष्ट भाजी अन वाफाळते वरण
वाटीत कधी असते गोड गोड शिकरण...
आपुलकीने सगळे आग्रह करतात
आणि पोटभर जेवल्यावर फक्कड विडाही देतात...
अहो... ऊठा... पान वाढलंय...
आज तुम्ही नुसता कढी-भातच खा..
'काकाक'डे उद्या पंचपक्वान्नांचा बेत आहे म्हणे
फोन करुन सांगितलय आमच्यासाठी जागा राखा...
.....................................................
गुलमोहर:
शेअर करा
ही काकाक म्हणजे कडी आहे त्या
ही काकाक म्हणजे कडी आहे त्या सगळ्या काकाकवर
(No subject)
व्वा ...... 'काकाक' कडची
व्वा ...... 'काकाक' कडची संतुलित अहाराची मस्त थाळी .....
ही सहीये
ही सहीये
छान !! [ 'काकाक' फक्त 'प्युअर
छान !!
]
[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज' थाळीच देतो हें मात्र कांहीसं खटकलं.
लाजोजी कही पे निगाहें कही पे
लाजोजी कही पे निगाहें कही पे निशाना.. हां?
मस्त जमलिये पण पंगत..
ह्म्म्म्म्म "लाजो"वाब आहे
ह्म्म्म्म्म
"लाजो"वाब आहे
भारी ! ए मी पण येणार
भारी ! ए मी पण येणार संध्याकाळी 'काकाक'डे ; मला कंटाळा आलाय स्वयंपाकाचा
लाजो, फक्कड जमलिये. एकदम
लाजो, फक्कड जमलिये. एकदम चविष्ट!
(No subject)
कळतात बरं कळतात टोमणे,
कळतात बरं कळतात टोमणे, लाजोबै!!!!
हं गुलमोहोराच्या दुसर्या
हं गुलमोहोराच्या दुसर्या फ्लॅट मधे गेल्या पेक्षा काका कडे जाण खुपच सोप आहे. लिप्ट ही २ र्या मजल्याचे वरचेच जास्त वापरतात ना.
मस्त !
जो मस्त जमलिये पंगत
जो
मस्त जमलिये पंगत
साजरा करू आजचा डे सगळे जाऊ
साजरा करू आजचा डे
सगळे जाऊ 'काकाक' डे !
(No subject)
धन्यवाद मंडळी काकाची थाळी
धन्यवाद मंडळी
काकाची थाळी शाकाहारीच आहे भाऊ...
गुड वन लाजो. परजीवी
गुड वन लाजो.

परजीवी पानावरचे परजीवी विचार
यम्मी....
यम्मी....
[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज'
[ 'काकाक' फक्त 'प्युअर व्हेज' थाळीच देतो हें मात्र कांहीसं खटकलं. ] >> आता बाकी 'नॉन व्हेज' पदार्थाना जागा कुठे आहे ताटात (सॉरी, पानात..)
(No subject)