विमलाबाई गरवारे प्रशाला

Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा बाबा आणि त्यांच्या मित्रांनी सर आणि एक लेडी टीचर वर्गात बोलत असताना वर्गाच्या दाराला बाहेरुन कडी लावली आणि पळून गेले. अ ओ, आता काय करायचं
<<<<<
Biggrin

बाबा आणि त्यांच्या मित्रांनी सर आणि एक लेडी टीचर वर्गात बोलत असताना वर्गाच्या दाराला बाहेरुन कडी लावली आणि पळून गेले >>>>> Proud

हे लिहायच्या आधी ईशा आणि तिच्या बाबांच्यात झालेला संवादः

ईशा: बाबा, तुम्हाला मायबोली नावाचं संकेतस्थळ माहित आहे का हो?
बाबा: नाही ग.... का?
ईशा: काही नाही..... सहजच आपलं Happy (चला... आता मी लिहायला मोकळी....) Happy

कृपया Light 1 घेणे

पीवाय्जेंचं गाणं शिकवलं गेलं होतं का तुम्हाला कोणाला ? "कार्य कराया राहू तत्पर , चला उठू या निघू कामावर " Happy
असलं रटाळ गाणं होतं! चालीत गाउन पण दाखवलं होतं त्यांनी.

मित Happy
ईशा, बाबांना बॉण्डने भरपूर मार्क दिले असतील ना? >>> मला घरुन अजून एक 'अनुभवी' टीप मिळाली होती की पी. वाय. जे. उत्तरपत्रिका नीट वाचत नाहीत. त्यामुळे जरी परीक्षेत एखादे उत्तर येत नसले तरी काही ना काही तरी लिहून यायचे. एकदा physics च्या पेपर मधे मला २ fill in the blanks येत नव्हत्या. मी प्रश्नपत्रिकेतली वाक्ये तशीच्या तशी लिहीली...blanks न भरता..आणि खरोखर सरांनी मला पूर्ण मार्क्स दिले होते. Happy
मैत्रेयी...होय..मला आठ्वतेय ते गाणं..बर्‍याच वेळा अनवलीकर सर पेटी घेउन आमच्या वर्गात गाण्यांना चाली लावायचे.

पीवाय्जेंचं गाणं शिकवलं गेलं होतं का तुम्हाला कोणाला ? "कार्य कराया राहू तत्पर , चला उठू या निघू कामावर " स्मित
असलं रटाळ गाणं होतं! चालीत गाउन पण दाखवलं होतं त्यांनी.
<< मी मैत्रेयीच्याच आवाजात ऐकलय ते गाणं Proud
पीवायजे रिटायर झाले आम्ही गरवारेत गेल्यावर.

ती तमीळ मल्याळम गाणी म्हणायचे का कोणी? इजगानसाठी यल्ल रे ओ यम्मानिकु!! Uhoh (हा काही पण प्रकार होता!)
किंवा संस्कृत (हे मस्त होते!) : कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नव संदेशम, रचयामो नवैतिहासम, घटयामो नव संघटनम! Happy कसलं भारी वाटलं हे गाणं आठवून! Happy

कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नव संदेशम, घटयामो नव संघटनम, रचयामो नवैतिहासम! कसलं भारी वाटलं हे गाणं आठवून >>>>>

आठवलं.... आम्हाला गोखलेबाई म्हणून दाखवायच्या......आणि मग म्हणवून पण घ्यायच्या Uhoh

गोखलेबाई आमच्याकडून समूह्गीते बसवून घ्यायच्या.. काही आठवतात्..'नवीन पाणी, झुळझुळ वाणी', ' उधळत शतकिरणा, उजळत जनह्रदया' वगैरे.

वाचला लेख. चांगला लिहीलाय. पण खरंच त्या टेरर होत्या बोलायला. एकदा आमच्या वर्गातील एक मुलगी आजारी होती आणि त्यामुळे २ दिवस शाळेत आली नाही. त्या २ दिवसातच बाईंनी स्वाध्यायचा घाट घातला होता. ही मुलगी तिसर्‍या दिवशी आईची चिठ्ठी घेऊन आली. तिला ह्या म्हणल्या, "अगदी स्वाध्यायचे दिवस बुडवून घरी राहायला मरायला टेकली होतीस का?" Uhoh

मस्त आहे लेख. ओक बाई आम्हाला मराठी शिकवायच्या, टि.म.वी. च्या परिक्षांचाही अभ्यास घ्यायच्या. कडक असल्या तरी एकदम आवडायच्या आम्हाला Happy

झी मराठीवर एक नवीन मालिका सुरु होतीये... माझी शाळा असा काहीसा विषय आहे.सध्या प्रोमोज मधे सलील कुलकर्णी आहे. त्याच्या हातात विमलाबाई गरवारेचं प्रगतिपुस्तक दिसतंय. तो गरवारेचा आहे माहित नव्हतं Happy

अगदी अस्सल गरवारेचा आहे सलील.
तो सारेगमप मधे स्पर्धकांना कमेंट द्यायचा किंवा काही कविता/गाणी यांचे अर्थ समजावून सांगायचा तेव्हा मला तर अनेकदा 'ओक बाईंच्या मराठीच्या तासातली, निबंधातली' वाक्य आठवायची Happy
तुम्हा कोणा गरवारेकरांना जाणवायचं का हे ? Happy

..

..

तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर तुमच्याच बॅच मधील काही जणांना या विषयी विचारले. लक्षात राहण्यासारखे ( त्यांच्या दृष्टीने ) काही नव्ह्ते असे सांगण्यात आले. नक्की काय झाले ते सांगितलेत तर ओक बाईंबद्द्ल नीट माहीती मिळून अजून प्रगति होईल Happy
धन्यवाद.

..

आम्हाला ओक बाई मराठी शिकवत असत आणी छानच शिकवायच्या.
तुमच्या विधानातली भाषा खूपच जहाल आहे. ओक बाई अजिबात न आवडणारे विद्यार्थी अर्थातच होते (माझा एक चुलत भाउ त्यात आहे) पण तुम्ही दिलेल्या पहिल्या अनुभवात त्या मुलाच्या अपयशाचं खापर उगीचच ओक बाईंवर फोडलं जात आहे असं वाटलं.
दुसरा अनुभव वाचून तर त्या दुसर्‍या विद्यार्थ्याचा अपमान होउन देखील त्याला घवघवीत यश मिळालच ना!

असो.

..

दुसरा अनुभव वाचून तर त्या दुसर्‍या विद्यार्थ्याचा अपमान होउन देखील त्याला घवघवीत यश मिळालच ना!>> शूम्पी , तो दुसरा मुलगा म्हणजे बहुतेक बेफिकीर.

माहीती बद्द्ल धन्यवाद ! Happy
दुसर्‍या अनुभवातील माहीती बद्द्ल-- ८५ च्या बॅच मधे ५ मुली बोर्डात आल्या होत्या ना ? आणि मुलांपैकी कोणीच बोर्डात आले नव्ह्ते. एक वैद्य नावाचा मुलगा ८९% मिळवून मुलांमधे शाळेत पहिला आला होता.

..

मला सहसा वादात पडायला आवडत नाही..शिवाय प्रत्येकाची शिक्षकांबद्दल त्या त्या वयात (आणि नंतरही ) मतं असतात हे सगळं जरी मान्य असलं तरी कोणत्याही शिक्षकाचा (फॉर दॅट मॅटर कोणत्याही व्यक्तीचा) 'नालायक' वगैरे शब्दात उल्लेख अजिबातच योग्य वाटला नाही.
मला स्वतःला ओक बाई एकच वर्ष शिकवायला होत्या. मग त्या रिटायर्ड झाल्या. पण माझ्याही मोठ्या भावंडांना त्या शिकवायला होत्या. त्याही पुढे जाऊन 'तत्वाकरता' ओक बाईंना 'प्रश्न करणा-यांमधे' माझ्या बहिणी होत्या...पण तरीही 'नालायक बाई होत्या' असं मी खरंच कोणाकडून ऐकलं नाही.
'मोठ्या भावंडांच्या उत्तम मार्कांमुळे, बोर्डात येण्यामुळे, किंवा स्पर्धांमधून शाळा गाजवल्यामुळे' त्याच शाळेत जाणा-या धाकट्या भावंडांकडून अपेक्षांचे किती आणि कसे 'प्रेशर' असते हे मी स्वतः पाहिले आहे.
सुदैवाने माझे आई-वडिल स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी 'ह्या अपेक्षांची झळ' आम्हाला लागू दिली नाही.
आपले मार्ग आपण स्वतः निर्माण करायची बुद्धी, कुवत, जिद्द ह्याच शाळेमुळे, शिक्षकांमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे निदान माझ्यात तरी निर्माण झाली. ह्यालाच शिक्षण म्हणतात ना ! की नुसतीच पुस्तकं पाठ करून परिक्षेत मार्क मिळवणं म्हणजे शिक्षण !!!
असो... एकूणच कोणाच्या अपेक्षा आणि त्याचं प्रेशर आणि त्याचे परिणाम ह्याची जबाबदारी 'एका शिक्षकावर टाकणे आणि त्यापुढे जाऊन त्या शिक्षकाला आज आयुष्याच्या इतक्या प्रगल्भ टप्यावर पोचलं असताना - नालायक वगैरे म्हणणं ' हे योग्य नाही असं मला वाटतं.

ह्या पोस्टला शाळेबद्दलच आणि शिक्षकांबद्दलचं प्रेम म्हणा, आदर म्हणा किंवा काहीही.
पण मत मांडल्यावाचून राहाववलं नाही हे नक्की !

Pages