Submitted by ह.बा. on 8 July, 2011 - 09:33
****************************
खोल खोल आतवर तुझी नजर (तरही)
****************************
राहिली मनात या करून घर
खोल खोल आतवर तुझी नजर
जीव लावतो तिला गुलाबही
रोज रोज ओढतो तिचा पदर
जंगली जनावरे मधेच अन
माजले सभोवती किती शहर
रसरशीत दोन पाकळ्यातुनी
केवढे जहाल प्यायलो जहर
बाग लावण्या अधीच पाहिजे
आजकाल माणसास का बहर?
कोपच्यातल्याच मैफिली इथे
बा हबा जरा हळूच लाव स्वर!
- हबा
**************************************
**************************************
गुलमोहर:
शेअर करा
ह. बा ....आवडलं बा.
ह. बा ....आवडलं बा.
सुरेख तरही.
एक से बढकर एक ,सगळे शेर आवडले
एक से बढकर एक ,सगळे शेर आवडले .
बाग लावण्या अधीच पाहिजे आजकाल
बाग लावण्या अधीच पाहिजे
आजकाल माणसास का बहर?>>> छान!!
सर्वांचे आभार!!! ह. बा
सर्वांचे आभार!!!
ह. बा ....आवडलं बा.>>> कसली सॉलिड शाब्दीक कोटी केलीत. सॉलिड टॅलेंटेड दिसताय. आवडलं आपल्याला!!!
Pages