Submitted by अजय on 5 July, 2011 - 11:23
ठिकाण/पत्ता:
बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशनातील जेवायचा हॉल.
शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस , दुपारच्या जेवणाच्या वेळेस भेटणार आहोत. शक्य असेल तर दोन्ही दिवस या. नसेल तर एका दिवशी तरी या.
(वेळ CDT टाईमझोनमधे आहे)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, July 22, 2011 - 12:00 to 13:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शक्यता अशी की त्यानंतर लगेच उ
शक्यता अशी की त्यानंतर लगेच उ उ वि आहे.. तेव्हा तयार रहा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जेवताना "ब ब वि" आणि मग "उ उ
जेवताना "ब ब वि" आणि मग "उ उ वि". कल्पना मस्त आहे
!
मला कल्पना म्हणजे Idea असे म्हणायचे होते. निमकरांची नाही. मला तिथे फटके पडायचे नाहीतर कारण माझी बायको आणि कल्पनाचा नवरा दोघेही तिथे असतील !
(No subject)
बाकी शिकागोची मंडळी कुठे
बाकी शिकागोची मंडळी कुठे आहेत? का अधिवेशनाला जाणारे थोडेच आहेत?
शिकागोची मंडळी अधिवेशनाला
शिकागोची मंडळी अधिवेशनाला जाणार आहेत की नाही हे माहिती नाही. पण मायबोलीवरची ही मंडळी ह्या वर्षी कमी दिसत आहेत.
झक्कीबॉ नाहीत का यंदा?
संदीप चित्रे आहेत अधिवेशनाला
संदीप चित्रे आहेत अधिवेशनाला पण हल्ली मायबोलीवर येत नाहीत..
औंदा आमी न्हाई जत्रंला. तुमी
औंदा आमी न्हाई जत्रंला. तुमी (उउ/बब/पप :P) मज्जा करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही शनिवारी येतोय. मी गटग
आम्ही शनिवारी येतोय. मी गटग मधे नाव नोन्दवल आणि कळल की तुम्हि शुक्रवारी भेटताय. शनिवारी जमेल का?
मला असं वाटतंय, शुक्रवारी आणि
मला असं वाटतंय, शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवस (सकाळच्या जेवणाच्या वेळी) भेटावं म्हणजे ज्यांना जेंव्हा जमेल तेंव्हा भेटता येईल. पण हा प्लॅन अवघड वाटत असेल तर प्लीज इथे लिहा.
गेल्या वेळेस दोनदा भेटलो होतो आणि ते फारसे अवघड झाले नव्हते.
शुक्रवारी भेटण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे , ज्या मायबोलीकरांचे कार्यक्रम आहे त्याबद्दल लवकर माहिती मिळेल आणि आपण सगळे शक्य असेल तर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकू.
आमचा कार्यक्रम (उभ्या उभ्या
आमचा कार्यक्रम (उभ्या उभ्या विनोद) हा अनधिकॄत माहीतीप्रमाणे शुक्रवारी दुपारी तीन वाजता आहे.
दुपारी २ वाजता हजर व्हायचं आहे. त्याआधी म्हणजे जेवणाच्या वेळी नक्की भेटू.
भाग घेणारे मायबोलीकर : विनय , संदीप.
या कार्यक्रमाची सुरूवात संदीप आणि शेवट मी करणार आहे.. कॄपया हजर रहाच...
अमेरिकास्थित लेखकांचा सत्कारही आहे म्हणे, त्यात माझी उपस्थिती असेल, अजून वेळ कळलेली नाही..
मला दोन्ही वेळेस जमेल.
मला दोन्ही वेळेस जमेल. गुरूवारी कोणी आवाज की दुनियाला येत आहे का?
मी पण नाव नोंदवले आहे.
मी पण नाव नोंदवले आहे.
उद्या भेटू.. आत्ताच हाती
उद्या भेटू..
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार...
उउवि ३:३० वाजता Room: 351
उउवि चा कार्यक्रम पार पडला.
उउवि चा कार्यक्रम पार पडला. हेमांगी, मिनोती, अजय, भावना, मुम्बैकर, केदार, प्राजू इत्यादी मायबोलीकर भेटले. जेवणाच्या वेळातही बर्याच वेळी कार्यक्रम चालू असल्याने सगळेच एका वेळी एकत्र येऊ शकले नाहीत.
उउवि : गडाबडा लोळले असते प्रेक्षक, पण मुंगी शिरायला जागा नव्हती, तर लोळायला कुठे...?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मंडळी, सॉरी गटग ला येउ नाही
मंडळी, सॉरी गटग ला येउ नाही शकले. जामच पळापळी चालली होती. तरी अजय भेटला-कुटुंबासहीत!
केदार/मुंबैकर्--माझ्या घरी गटग करू या.
हो चालेल. नाहीतरी विथड्रॉअल
हो चालेल. नाहीतरी विथड्रॉअल सिन्ड्रोममुळे (शनि रवीच्या त्या दिर्घकालीन बैठका) गटग आवश्यक.
केदार, अजय, भावना तुम्हाला
केदार, अजय, भावना तुम्हाला परत भेटून आनंद झाला.
विनय, संदिप चित्रे, कल्पू, मुंबैकर, विन, स्वाती_दांडेकर - तुम्हाला पहिल्यांदाच भेटते आहे असे अजिबात वाटले नाही. खुपच छान वाटले सगळ्यांशी गप्पा मारून.
मिनोती डिट्टो.
मिनोती डिट्टो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजय, भावना, आभा, मिनोति (आणी
अजय, भावना, आभा, मिनोति (आणी श्री. मिनोती), स्वाती दांडेकर आणी केदार सर्वाना भेटुन आनंद झाला. (पहिल्यांदाच आणी धावती का होइना भेट झाली ) बाकी इतरांना पण भेटायला जरुर आवडलं असतं. असो, परत कधीतरी.
आता कोणीतरी वृतांत लिहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरेरेरे, मागच्या वीकेंडला
अरेरेरे, मागच्या वीकेंडला शिकागोत होतो, पण बी एम एम ला जाणं झालं नाही ... मजा केलेली दिसतेय मंडळींनी
सर्वाना भेटून खुप छान वाटल.
सर्वाना भेटून खुप छान वाटल. पहिल्यांदाच भेटले अस अजिबात वाटल नाही. अहान तर भावनाला चिकटला होता. (तसा तो खुप भावखाउ आहे)
केदार/मुंबैकर्--माझ्या घरी गटग करू या> कल्पु नक्की.
गटग ग्रूप फोटो. हा शनिवारच्या
गटग ग्रूप फोटो. हा शनिवारच्या गटगचा
![IMG_0118_A.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1/IMG_0118_A.jpg)